श्रद्धा कुंभोजकर,लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नव्या वाटा धुंडाळण्यासाठी नवा विचार करावा लागतो. तो करण्यासाठी जुन्याची मोडतोड अपेक्षित असते. ती करणाऱ्या कलाकाराकडे धाडस असावं लागतं आणि ती स्वीकारणाऱ्या रसिकाकडे सहिष्णुता.. या पातळीवर आज आपण कुठे आहोत?
सीता – खरं जर म्हणशील तर त्रिजटे, स्वतंत्रतेचा एक क्षण पारतंत्र्याच्या अनंत काळाबरोबर आहे.
त्रिजटा – म्हणूनच दासांनी दास्यत्वाचे दिवस कडक पावित्र्यानं व मनोनिग्रहानं कंठून दास्यमुक्ततेचा मार्ग शोधीत असावं. सर्व पृथ्वीवर अनर्थ करून राक्षसी अनाचारांनी निरपराध्यांना त्रस्त करायचे पापी व स्वार्थी विचार राक्षसांच्या जरी मनात असले तरी पण सीताबाई! जगन्नियंत्या परमेश्वराची इच्छा काही निराळी असते बरं.
‘संगीत सीताशुद्धी’ या १९०९ मध्ये प्रकाशित नाटकात परस्वाधीन जगण्याबद्दलचा हा संवाद प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिला होता. इंग्रजी दडपशाहीच्या सावटात असतानाही जनमानसातल्या सीतामाईंच्या रूपानं भारतमातेची प्रतिमा दर्शवण्याचा हा धाडसी प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचं भारतीय जनतेच्या मनात असणारं अढळ स्थान लक्षात घेऊन अनेक साहित्यिक, कलाकारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीनं आपापली कहाणी सांगायसाठी या काव्यांचा वापर केलेला आहे. जनतेच्या परिचयाचं कथानक असल्यानं वर्तमानाची बंधनं न बाळगता गतकालातल्या कथानकांच्या चौकटीत नव्या आशयाचे रंग भरण्याची प्रयोगशीलता गेली किमान अडीच हजार वर्ष भारतीय संस्कृतीनं जपली आहे.
महाकवी भासानं दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी दुर्योधनाला, कर्णाला आणि कैकयीला खलनायकी स्वरूपात न रंगवता आपल्या नाटकांतून नायकत्व बहाल केलं होतं. त्यानंतरही ‘जांभूळ आख्यान’सारख्या अस्सल या मातीतल्या प्रयोगांमध्ये महाकाव्यांच्या कथानकाचा लवचीक वापर केलेला दिसतो. असं असताना ललित कला केंद्रामधल्या ‘जब वी मेट’ नावाच्या प्रहसनावरून विद्यापीठात घडलेल्या घटनाक्रमाची गुंतागुंत समजून घेणं गरजेचं ठरतं.
महाकाव्यांवर आधारित कलाप्रकारांचं सादरीकरण हे प्रयोगजीवी कलांच्या बाबतीत अगदी नेहमी घडणारी गोष्ट आहे. ललित कला केंद्रातच २२ जानेवारीला अयोध्येतील कथागायन परंपरेवर आधारित ‘कथा कहे सो कथक’ हा कार्यक्रम सादर झाला होता. त्यामुळे खास करून रामायणाविषयी काही दुष्प्रचार या केंद्रातून नेहमी केला जात असल्याचा हेत्वारोप खोटा ठरतो.
‘‘विद्यापीठ म्हणजे मानवकेंद्री विचार, सहिष्णुता, विवेक, वैचारिक धाडस आणि सत्याच्या शोधाचं स्थान असतं. अधिकाधिक प्रगल्भ ध्येयांकडे भरारी घेणं हा विद्यापीठांचा उद्देश असतो. या गोष्टी जर विद्यापीठांत सुरळीतपणे सुरू असतील, तर राष्ट्र आणि त्यातील लोकांचं सगळं बरं चाललंय असं मानता येतं.’’ असं जवाहरलाल नेहरूंना का म्हणावंसं वाटलं असेल? विद्यापीठांचं वर्तमान आणि राष्ट्राचं भविष्य हे जुळलेलं असतं हे त्यांना अधोरेखित करायचं असावं.
विद्यापीठ म्हणजे अशी जागा, की जिथे धोपटमार्गापेक्षा वेगळा, नवा विचार करता यावा यासाठीची मोकळीक सर्वाना असायला हवी. जुन्याच पद्धतीनं विचार करत राहिलं तर मेकॉलेला हवे होते तसे आज्ञाधारक कारकून तयार होतील. पण नवे शोध, नव्या पद्धती, नवे उपक्रम असं नवं जग उभं करायचं असेल तर वैचारिक धाडस हवं. त्यासाठी दुसऱ्यानं केलेल्या वेगळय़ा विचारांना सहन करण्याची सहिष्णुता हवी. या सगळय़ातून माणसाचं जगणं अधिक सुसह्य होतंय की नाही याचा विवेक हवा.
‘जब वी मेट’ हे प्रहसन सादर करणाऱ्यांना ज्या प्रेक्षकवर्गापुढे आपण आजच्या जगण्यातल्या काही विसंगती मांडतो आहोत, त्यांच्या मन:स्थितीचा अंदाज आला नसावा. रामलीलेत काम करणाऱ्या नटांच्या मेकअप रूममधल्या गप्पांचं चित्रण या प्रहसनात होतं. प्रहसन, विनोद हे ज्या विसंगतीवर बोट ठेवतात, ती विसंगती रंगमंचावरच्या आणि समोरच्या माणसांना पटली, तरच विनोद निर्मिती होते. मात्र या प्रहसनाच्या प्रयोगाची वेळ आणि अयोध्येतील राम मंदिराच्या निमित्ताने समाजात असणाऱ्या उत्कट प्रतिमा यांचा मेळ बसणं अवघड होतं. आत्ताआत्तापर्यंत ‘जाने भी दो यारों’, ‘वस्त्रहरण’, अगदी ‘आदिपुरुष’ सारख्या चांगल्या-वाईट कलाकृतींच्या बाबतीत बऱ्यापैकी सहिष्णू राहिलेल्या समाजाची मनोभूमिका आता बदललेली आहे हे वास्तव विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं नसावं.
प्रेक्षकांच्या मनाचा अंदाज चुकला तर एखाद्या निर्मात्याला या चुकीची काय शिक्षा सामान्यत: मिळते? ती कलाकृती लोक नाकारतात. त्यातली आर्थिक, भावनिक गुंतवणूक वाया जाते. पुढे कामं मिळत नाहीत. पण ललित कला केंद्राला वेगळय़ाच अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं. विभागप्रमुखांसह विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. क्षुब्ध जमावानं केंद्राच्या गुरुकुलाच्या इमारतीवर हल्ला केला. विद्यापीठात शिकणाऱ्या तरुण मुलामुलींची मनं भीतीनं कोमेजली. विद्यापीठातलं मोकळिकीचं वातावरण तंग झालं. समाजमाध्यमांत विद्यापीठावर संदर्भविहीन टीका झाली. स्वयंघोषित संस्कृतिप्रेमींनी विद्यापीठ हे स्वैराचारी असल्याचे शिक्केही मारले. अपराध आणि शिक्षा यांचं प्रमाण फारच व्यस्त झालं.
प्रत्यक्षात विद्यापीठात काय स्वरूपाचं संशोधन, अभ्यास चालतो याची माहिती न घेता एका प्रहसनावरून मोठी शोकांतिका घडली. आज या विद्यापीठातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक विभागांमधून कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते परिसरातल्या देशी वृक्ष आणि प्राणीपक्ष्यांच्या जगण्याबद्दल अनेक गोष्टींवर नव्या वाटा धुंडाळणारं संशोधन सुरू आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये समाजाच्या विविध स्तरांमधल्या लोकांचं जगणं, त्यांचं दुखणं-खुपणं, त्यांच्या इतिहास-भविष्याचे अभ्यास सुरू आहेत. काव्यसंमेलनापासून ते भूगोलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंत विविध कार्यक्रम आपल्या समाजाचा वैचारिक धांडोळा घेत असतात. समाजाच्या तळपातळीपासून सर्व स्तरांचा अभ्यास करून शासनाची धोरणं तिथपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी विद्यापीठात होणाऱ्या अभ्यासांचं महत्त्व अनन्य आहे.
हे काम एका विद्यापीठातच घडतंय असं नाही. भारताच्या उच्च शिक्षणाच्या राष्ट्रीय अहवालानुसार देशात सर्वाधिक संख्येनं विद्यार्थी हे राज्य शासन अनुदानित विद्यापीठांमध्ये शिकतात. असं असताना आपल्याच समाजातल्या विचार करणाऱ्या, शिकणाऱ्या तरुणाईला वैचारिक झेप घेण्याचं बळ समाजानं द्यायला हवं. विद्यापीठातले विद्यार्थी, संशोधक हे सज्ञान नागरिक असतात. त्यांना मतदानाचा हक्क असतो. म्हणजेच विवेक आणि कार्यकारणभाव समजून घेणाऱ्या या तरुणांच्या प्रगल्भतेचा समाजानं आदर करायला हवा. त्यांनी मांडलेल्या विचारांत काही विसंगती आढळली, अवाजवी धाडस आढळलं, तर चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या विचारात परिवर्तन करण्याचे प्रयत्न करणं हे समाजाच्या प्रगल्भतेचं लक्षण ठरेल. हल्ले करून, धाकदपटशा दाखवून आणि विद्यापीठांच्या स्वायत्त विचार करण्याच्या क्षमतेवर घाला घालून दीर्घकालीन प्रगती होणार नाही. उलट आज आपल्या देशाला अत्याधिक गरज असलेल्या उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेची कायमची हानी होईल.
‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर, ज्ञान जेथा मुक्त, जेथा गृहेर प्राचीर’ या कवितेतून रवींद्रनाथ टागोरांनी लहानसहान अंगणात समाधान न मानता विशाल अशा पृथ्वीवर ताठ मानेनं निर्भीडपणे, मोकळिकीनं ज्ञान मिळवण्याचं स्वप्न बाळगलं होतं. आजच्या तरुण पिढीला हे स्वप्न पाहता येण्यासारखी परिस्थिती आपण घडवायला हवी.