मुंबईतील हवेच्या प्रदूषणामुळे मुंबईत मुखपट्टी लावणे बंधनकारक करण्याचे वृत्त जेवढे काळजीचे आहे, तेवढेच भविष्यातील संकटाची चाहूल सांगणारेही आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील आणि देशातील शहरांच्या प्रदूषणाचा प्रश्न सतत चर्चेत येत आहे. दिल्लीतील प्रदूषण हा तर तेथील नागरिकांसाठी अस्तित्वाचाच प्रश्न होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत वायुप्रदूषणाचा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. पर्यावरणीय प्रदूषणाने या देशाला वेढले असून, वायू, जल, कचरा, प्लास्टिक यांच्या प्रदूषणाने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत धड श्वासही घेता न येण्याची वेळ येणे, हे अधिकच त्रासदायक. गेल्या काही दिवसांत मुंबईतील हवेचे प्रदूषण अतिधोकादायक पातळीपर्यंत पोहोचले. अगदी मध्यरात्रीही हवेतील धूळ सहज लक्षात यावी इतकी असते. मुंबईची हवा गेल्या आठवडय़ाभरात चर्चेत आली, पण या देशातील किमान चौदा कोटी नागरिक स्वच्छ हवेच्या मानांकनाच्या दहापट अधिक प्रदूषित हवा शरीरात घेतात, असे काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाहणीत निष्पन्न झाले होते. जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील २१ शहरांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा