‘फौजदारी प्रक्रिया संहिते’च्या १२५ व्या कलमानुसार घटस्फोटित मुस्लीम स्त्री पतीकडे तिच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी मागू शकते, असा निवाडा देत, सर्वोच्च न्यायालयाने जवळपास तब्बल ४० वर्षांनी जणू ‘शाहबानो’लाच न्याय दिला आहे. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात घडलेल्या ‘शाहबानो’ या प्रकरणाने त्यापुढच्या काळात देशाचे राजकारण संपूर्णपणे बदलून टाकले हा इतिहास कधीच, कुणालाच विसरता येत नाही. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ व्या कलमानुसार सर्व भारतीय स्त्रियांना असलेला पोटगीचा अधिकार शाहबानो या वृद्ध स्त्रीला नाकारण्याच्या दबावापोटी १९८६ मध्ये कायदेबदल करण्यात आला आणि भारतातील फक्त मुस्लीम स्त्रियांना पोटगी नाकारण्यात आली. या दुर्दैवी निर्णयामुळे झालेल्या घुसळणीचे पडसाद भारतीय राजकारणात आणि समाजकारणात दीर्घ काळ कसे उमटत राहिले, हे नव्याने सांगायची गरज नाही. पण भारतीय मुस्लीम स्त्रियांनाही पोटगीचा अधिकार आहे, हे मान्य करून आणि तो देऊन न्यायालयाने सामाजिक न्यायाच्या बाबतीत न्यायव्यवस्था प्रत्यक्षात राज्यव्यवस्थेच्या नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे, हेच पुन्हा एकवार सिद्ध केले आहे.
अन्वयार्थ : ‘शाहबानो’ला न्याय
‘फौजदारी प्रक्रिया संहिते’च्या १२५ व्या कलमानुसार घटस्फोटित मुस्लीम स्त्री पतीकडे तिच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी मागू शकते,
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2024 at 01:35 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alimony for muslim women supreme court verdict on maintenance to divorced muslim zws