यंदा देशांतर्गत गहू उत्पादनात घट होणार असल्याचे लक्षात येताच, केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीला मागील वर्षी घातलेली बंदी कायम ठेवली असून मोठय़ा प्रमाणात गहू खरेदीला सुरुवात केली आहे. ऐन करोनाकाळात केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला करोना गेल्यानंतरही मुदतवाढ देण्यामागे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळय़ासमोर आहेत, हे तर उघडच आहे. त्यामुळे आजमितीस सरकारने सुमारे १९५ लाख टन गहू खरेदी केला आहे. गेल्या वर्षांच्या खरेदीपेक्षा (१८० लाख टन) यंदा एप्रिलअखेरच खरेदी वाढवण्यात आली आहे. देशाच्या गोदामात सुमारे ४०० लाख टन एवढय़ा गव्हाची साठवणूक करणे आवश्यक असते. ही खरेदी जून महिन्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत आणखी गहू खरेदी होणे अनिवार्य आहे. गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात उत्पादन होणाऱ्या सुमारे ११०० लाख टन गव्हापैकी १४० कोटी जनतेची भूक भागवण्यासाठी निम्म्याहून अधिक उत्पादन उपयोगात येते.
अन्वयार्थ: मग गहू निर्यातबंदी का?
यंदा देशांतर्गत गहू उत्पादनात घट होणार असल्याचे लक्षात येताच, केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीला मागील वर्षी घातलेली बंदी कायम ठेवली असून मोठय़ा प्रमाणात गहू खरेदीला सुरुवात केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2023 at 01:20 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyarth decline in domestic wheat production why wheat export ban amy