बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला दिलेल्या दणक्यातून सावरत असतानाच, या वादळामुळे सर्वात कमी मनुष्यहानी झाल्याचे श्रेय प्रशासनाच्या सुरक्षा व बचाव यंत्रणेच्या नियोजनाला द्यायला हवे. सुमारे तीस हजार रहिवाशांना वेळेत सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याने हे घडू शकले. या चक्रीवादळाची तीव्रता सर्वात जास्त असली तरी ते प्रत्यक्ष धडकण्यास अधिक वेळ लागल्याने प्रशासनाला तयारीला वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी यंत्रणा कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी जी वेगवान हालचाल करावी लागते, ती वेळेत झाल्यामुळेच हे घडू शकले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेल्या चक्रीवादळांमध्ये आता बिपरजॉय वादळाचा समावेश झाला आहे. अरबी समुद्रामधील आग्नेय भागात ६ जून रोजी पहाटे साडेपाच वाजता बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले आणि त्यानंतर सुमारे दहा दिवसांनी ते गुजरातच्या जखाऊ बंदराच्या परिसरात धडकले. हा काळ प्रशासनासाठी अतिशय महत्त्वाचा होता. अचानक आणि कमी वेळेत येणाऱ्या चक्रीवादळांमध्ये मनुष्यहानी होण्याची शक्यता नेहमीच अधिक असते. ती टाळण्यासाठी यापुढील काळात सातत्याने काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा