छत्तीसगडमध्ये नाराज नेते टी. एस. सिंगदेव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने केल्यावर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समझोता घडविण्यात आला. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमधील पक्षांतर्गत वाद मिटविण्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भर दिला आहे. गेहलोत आणि पायलट यांच्यात एकी घडविण्याचे यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले पण ते सारे निष्फळ ठरले होते. परिणामी उभयतांमध्ये नव्याने करण्यात आलेला समझोता निवडणुकीपर्यंत कायम राहील याची अजिबात शाश्वती देता येत नाही. राजस्थानमध्ये निवडणुकीनंतर सत्ताबदल होण्याची गेली अनेक वर्षे पडलेली परंपरा यंदा खंडित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी पक्षांतर्गत गटबाजी ही मोठी समस्या आहे. काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही गटबाजीची डोकेदुखी आहे. सत्ता गमाविल्यापासून गेली चार वर्षे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची कोंडी करण्यात आली होती. पण वसुंधराराजे मागे हटण्यास तयार नाहीत. प्रसंगी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची तयारी त्यांनी मध्यंतरी केली होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची त्यांची मागणी मान्य झाली असली तरी नवे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी हे वसुंधराराजे यांना फार अनुकूल अशी भूमिका घेत नाहीत. अलीकडेच राजस्थानमध्ये झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वसुंधराराजे यांचे कौतुक केल्याने भाजपमधील समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू झाली. वसुंधराराजे यांना पर्याय म्हणून केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. वसुंधराराजे यांच्याशिवाय पर्याय नाही, अशीच भाजपची अवस्था दिसते. तेवढय़ा ताकदीचा दुसरा नेता भाजपपाशी नाही. त्यातच काँग्रेस सरकारच्या विरोधात तेवढी नाराजी नसल्याचे भाजपने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. यामुळेच भाजपला सावधतेने पाऊल टाकावे लागत आहे.
अन्वयार्थ : गेहलोत यांना वेसण?
छत्तीसगडमध्ये नाराज नेते टी. एस. सिंगदेव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने केल्यावर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समझोता घडविण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-07-2023 at 00:03 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha congress chief minister ashok gehlot and sachin pilot in rajasthan ysh