डोनाल्ड ट्रम्प, रिसेप तय्यिप एर्दोगान, जाइर बोल्सेनारो, बिन्यामिन नेतान्याहू यांसारख्या नेत्यांमध्ये एक अत्यंत विशेष असा गुण असतो. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल; यांची सत्ताकांक्षा अक्षय असते. किंबहुना बाह्य परिस्थिती हा यांच्यासाठी सत्ताकांक्षा गुंडाळून ठेवण्याचा निकष नसतोच. सत्ताग्रहण हा जन्मदत्त अधिकार असल्याच्या मानसिकतेत ही मंडळी सदासर्वदा वावरत असतात. आता लोकशाही देशांमध्ये सत्ताग्रहणाचा मार्ग एकच असतो. तो म्हणजे निवडणुका. त्यामुळे सत्तेवर येण्यासाठी निवडणुकांचा आधार घेणे क्रमप्राप्त असते. पण यातून आपला विजय झाला, तर आणि तेवढय़ाचपुरते निवडणुकांचे पावित्र्य. आपण हरलो, तर निवडणुकाच दूषित आणि कलुषित ठरवण्यात ही मंडळी आघाडीवर असतात.

पुन्हा निवडणुकांची शिडी चढून सत्ताग्रहण साधले, तर लोकशाही मूल्ये पाळण्याचे फिजूल दायित्वही संपते. कारण लोकशाहीच्या पवित्र चौकटीत राहून आरंभलेल्या हुकूमशाहीला, खुद्द लोकशाहीदेखील काही करू शकत नाही! हे ज्यांना बरोब्बर कळले, त्यांचे ट्रम्प हे शिरोमणी. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकेचे ‘अतिपोक्त’ अध्यक्ष जो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला ‘तेजतर्रार’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडून तडाखा मिळेल, असे अंदाज बांधले गेले. कारण या निवडणुकांमध्ये सहसा व्हाइट हाऊसमधील सत्तारूढ पक्षाला मतदार मोठय़ा प्रमाणात नाकारतात असा इतिहास आहे. शिवाय या निवडणुकांमध्ये ट्रम्प यांनी वैयक्तिक लक्ष आणि धन अर्पित केले होते. प्रत्यक्षात सेनेटचा ताबा डेमोक्रॅट्सकडेच राहिला आणि प्रतिनिधिगृहात रिपब्लिकनांना काठावरचे बहुमत प्राप्त झाले. त्याहीपलीकडे जाऊन, ट्रम्प यांनी जाहीर पािठबा दिलेले उमेदवार सेनेट, प्रतिनिधिगृह आणि गव्हर्नर अशा तिन्ही महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पराभूत झाले. या पराभूतांमध्ये, ट्रम्प वि. बायडेन ही अध्यक्षीय निवडणूकच नाकारणारे गणंगही होते. तरीदेखील १५ नोव्हेंबर रोजी निवडणुकांचे चित्र पुरेसे प्रतिकूल ठरल्यानंतरही ट्रम्प यांनी २०२४ अध्यक्षीय निवडणुकीसाठी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकली. वास्तविक त्यांचा उन्माद उतरवण्यासाठी मध्यावधी निवडणुकांची आकडेवारी पुरेशी आहेच. शिवाय फ्लोरिडा राज्याचे पुनर्निर्वाचित गव्हर्नर रॉन डेसांटिस हे ‘अध्यक्षपदासाठी अधिक योग्य उमेदवार’ ठरतील, या निष्कर्षांप्रत अनेक रिपब्लिकन नेते आले आहेत. ट्रम्प यांनी एकतर्फी उमेदवारी जाहीर केलेली असली, तरी त्यांना पक्षाकडून ती अधिकृतपणे मिळेलच असे नाही.

Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
america election
समोरच्या बाकावरून : आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

ट्रम्प यांचा प्रभाव ओसरत चालल्याचे स्पष्ट संकेत विद्यमान निवडणुकांनी दिले आहेत. त्यांच्यामागे गतवर्षी ६ जानेवारी रोजी रिपब्लिकन समर्थकांनी केलेल्या कॅपिटॉल इमारतीवरील हल्ल्यास चिथावणी दिल्याप्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू आहेच. मार ए लेगो येथील त्यांच्या निवासस्थानी आढळलेल्या गोपनीय कागदपत्रांप्रकरणी चौकशी सुरू आहे. या कोणत्याही प्रकरणात काँग्रेस किंवा न्यायखात्याने त्यांच्यावर अधिकृत ठपका ठेवल्यास, अशा कलंकितामागे पुन्हा उभे राहण्याची इच्छा रिपब्लिकनांपैकी अनेकांना होणार नाही. मात्र त्यांच्या प्रभावाला अद्याप सरसकट दुर्लक्षिण्यासारखी परिस्थिती नाही. श्वेत वर्चस्ववाद, आत्मकेंद्री व्यापारधोरणे, स्थलांतरितविरोधी मानसिकता, चीनचा दुस्वास, अमेरिकी आत्ममग्न राष्ट्रवाद या मुद्दय़ांना अजूनही तेथील वैचारिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यात मोठय़ा प्रमाणावर स्वीकारार्हता आहे. हे जोपर्यंत जाणवण्याइतक्या प्रमाणात आहे, तोपर्यंत ट्रम्प यांचे चलनमूल्य कमी होणार नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.