‘शक्यच नाही!’, म्हणून ज्या कल्पनांची खिल्ली उडविली गेली, त्या पुढे शास्त्राच्या कसोटीवर सिद्ध झाल्याची, स्वीकारल्या गेल्याची आणि प्रस्थापित झाल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या प्रांतात आढळतात. अवयव प्रत्यारोपण ही त्यापैकीच एक कल्पना. ती मांडून हसे करून घेणाऱ्या आणि तरीही शेवटपर्यंत पाठपुरावा करत, ती सिद्ध करून दाखविणाऱ्या, अनेकांना नवजीवन देणाऱ्या रॉय कान या ब्रिटिश संशोधकाचे नुकतेच निधन झाले.

१९५०च्या सुमारास रॉय वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांच्या रुग्णालयातील त्यांच्याच वयाचा एक रुग्ण मूत्रिपड निकामी झाल्यामुळे दोन आठवडयांत मृत्युमुखी पडणार असल्याचे त्यांना कळले. ऑटोमोबाइल इंजिनीअरचा मुलगा असलेल्या रॉय यांनी बालपणीच बाबांकडून गाडयांचे निकामी भाग बदलून नवे लावून वाहन पुन्हा नव्यासारखे करण्याची कौशल्ये अवगत केली होती. हेच तंत्र मानवी अवयवांनाही लागू होऊ शकते असा त्यांचा तर्क होता. त्यांनी ही कल्पना वरिष्ठांपुढे मांडली, मात्र वरिष्ठांनी भोळसटपणाचा शेरा मारून ही शक्यता फेटाळली. परंतु रॉय यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
sunny deol bobby deol live
सनी देओल व बॉबी देओल यांची LIVE मुलाखत, वैयक्तिक आयुष्य, फिल्मी करिअर अन् बरंच काही!
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

त्यांच्यापुढे दोन प्रश्न होते. एक- निकामी अवयव  काढून नवा अवयव कसा लावावा आणि दुसरा- शरीरात बाह्य घटकाचा प्रवेश होताच त्याविरोधात कामाला लागणाऱ्या प्रतिकारशक्तीवर नियंत्रण कसे मिळवावे. त्यांनी उंदीर, डुक्कर, कुत्रा अशा प्राण्यांवर मूत्रिपड प्रत्यारोपणाचे प्रयोग केले. प्रतिकारशक्ती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेडिएशनचा वापर करून पाहिला, मात्र त्यामुळे प्राणी मृत्युमुखी पडले. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी रॉय यांच्याविरोधात आघाडीच उघडली. एकाने चक्क त्यांच्या घरी बॉम्ब पाठविला. १९५९मध्ये मात्र त्यांना एक आशेचा किरण गवसला. त्यांनी कुत्र्याच्या शरीरात मूत्रिपड प्रत्यारोपण करताना ‘६-कॅप्टोप्युरिन’ या रक्ताच्या कर्करोगावरील औषधाचा वापर केला. हा कुत्रा एक महिना जगला.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : मुनव्वर राणा

ब्रिटनमध्ये रॉय यांचे हे प्रयोग सुरू होते, तेव्हा १९६७मध्ये अमेरिकेतील थॉमस स्टार्झल् या शास्त्रज्ञाने पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. हे जगातील पहिले यकृत प्रत्यारोपण! पुढच्याच वर्षी रॉय यांनी केम्ब्रिजमध्ये यकृत प्रत्यारोपण यशस्वी केले. त्यांच्या १७ वर्षे सुरू असलेल्या धडपडीला यश आले. हे युरोपातील पहिले यकृत प्रत्यारोपण ठरले.

१९७०च्या सुमारास त्यांनी ‘सायक्लोस्पोरिन’ हे औषध अवयव प्रत्यारोपणाच्या रुग्णांना दिले. त्यामुळे रुग्ण एक वर्ष जगण्याची शक्यता ५० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे अभ्यासांती सिद्ध झाले. १९८६मध्ये रॉय आणि सहकारी संशोधक वॉलवर यांनी एकत्रितपणे एकाच रुग्णावर हृदय, फुप्फुस आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. १९८६ साली ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ ही पदवी बहाल केली. वैद्यकीय क्षेत्रात नोबेलनंतरचे स्थान असलेल्या ‘लास्कर अवॉर्ड’ने २०१२ मध्ये रॉय आणि स्टार्झल यांना गौरविण्यात आले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: सुनंदा पटवर्धन

‘विज्ञान शाप की वरदान’ हा प्रश्न रॉय यांनाही एका टप्प्यावर पडला. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवाचे आयुष्य लांबत चालले असून त्यामुळे लोकसंख्येत प्रचंड भर पडत असल्याविषयीची चिंता त्यांनी ‘टू मेनी पीपल’ या पुस्तकातून व्यक्त केली. निष्णात शल्यचिकित्सक, अभ्यासू संशोधक असलेले रॉय संवेदनशील कलाकारही होते. लंडनमध्ये शिकत असताना ते नियमितपणे तेथील कलासंग्रहालयांत जात. तेथील कलाकृती पाहून अनुकरणाचा प्रयत्न करत. १९८८मध्ये त्यांनी जॉन बेलनी या स्कॉटिश कलाकारावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. बेलनी यांनी आयसीयूमध्येच आत्मचित्रे (सेल्फ पोर्ट्रेट) काढण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील कालावधीत त्यांनी तब्बल ६० आत्मचित्रे काढली. रॉय यांनी बेलनी यांच्याकडून चित्रकलेचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. या दोघांनी परस्परांची अनेक व्यक्तिचित्रे काढली. पुढे रॉय स्वत:च्या रुग्णांची विशेषत: लहान मुलांची चित्रे साकारू लागले. या व्यक्तिचित्रांची आणि अवयव प्रत्यारोपणाविषयी जनजागृती करणाऱ्या चित्रांचीही अनेक प्रदर्शने भरविली गेली. त्यांच्या निधनाने एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व हरपले.

Story img Loader