बऱ्यापैकी सरसकटीकरण झालेल्या स्मार्ट फोन क्षेत्रात ॲपल या कंपनीचा दबदबा मात्र अजूनही टिकून आहे. त्याची महत्त्वाची कारणे दोन : अत्युच्च दर्जा आणि विदा सुरक्षितता. साहजिकच जशी त्यांच्या कोणत्याही नव्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाची चर्चा होतेच, तशी आयफोन-१६ बद्दलही होणार, हे ओघानेच आले. या आयफोन १६ मालिकेची तांत्रिक वैशिष्ट्ये – उदाहरणार्थ, विदा साठवणूक क्षमता, बॅटरी, कॅमेरा याची तर चर्चा होतेच आहे. भारतापेक्षा ते अमेरिकेत कसे स्वस्त पडणार आहेत, याचेही अनेकांनी हिशेब मांडून झाले आहेत. त्यानुसार, त्याची खरेदी-विक्री होत राहील. मात्र, आपल्यासाठी देश म्हणून या पलीकडे जाणारा एक महत्त्वाचा मुद्दा असा की, अॅपल या अमेरिकी कंपनीच्या जगभरातील एकूण आयफोनपैकी १४ टक्के आयफोनची जोडणी आता भारतात होऊ लागली आहे! यामुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत आपले स्थान चार क्रमांकांनी सुधारले असून, त्याचा अंतिमत: फायदा भारताच्या उत्पादन क्षेत्राबद्दलची प्रतिमा सुधारण्यास होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा