वसई-विरार ते टिटवाळा किंवा डोंबिवली-बदलापूर ते नेरुळ-खारघर आदी मुंबईच्या टोकापासून (ते जवळच्या सर्व भागांतून) गेल्या १५ वर्षांपासून लोकलचा किमान दीड ते साडेतीन तासांचा प्रवास करीत ‘मुंबई लिटफेस्ट’ साजरा करण्यासाठी येणाऱ्यांसाठी खरेच हा साहित्याचा उत्सव असतो काय?

म्हणजे गेल्या १५ वर्षांत ‘भगत’ संप्रदायी आंग्लभाषिक लेखकांची सद्दी वाढल्यानंतर, ‘किलो’च्या आकाराने इंग्रजी पुस्तके खरेदी करण्याची प्रदर्शन-पर्यटनबाजी रुळल्यानंतर आणि ‘जयपूर लिटफेस्ट’ची आंतरराष्ट्रीय भावंडे देशभर (केरळ, चंडीगढ, ओदिशा, कोलकाता, नागपूर, पुणे, इ.) विस्तारत गेल्यानंतर मुंबईसारख्या बहुभाषक वाचनसंस्कृती असलेल्या शहरात अशा साहित्यमेळ्याची गरज लक्षात घेण्यासारखी.

Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta natyarang play don vajun bavis minitani written by Neeraj Shirwaikar and directed by Vijay Kenkare
नाट्यरंग: दोन वाजून बावीस मिनिटांनी…; भासआभासांचं कृतक भयनाट्य
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”
एडम जे ग्रेव्स आणि सुचित्रा मट्टई यांनी दिग्दर्शित केलेल्या'अनुजा'मध्ये एका ९ वर्षीय मुलीची कथा आहे. (Photo Credit - Youtube Screen Shot)
खऱ्या आयुष्यात केली बालमजुरी, आता थेट Oscar नॉमिनेटेड शॉर्ट फिल्ममध्ये ‘ही’ मुलगी साकारतेय मुख्य भूमिका; जाणून घ्या सजदा पठाणची गोष्ट

यंदा या अडीच दिवसीय महोत्सवात १३ देश, १२५ लेखक आणि हजारोंच्या संख्येने वाचणाऱ्यांचा समूह मुंबईच्या एका समुद्रटोकावर म्हणजेच ‘एनसीपीएत’ दाखल झाला. त्याच्या पहिल्याच दिवसापासून या परिसरातले ‘स्टेट्स रेस्टॉरंट’, ‘आरे स्टॉल्स’, एक नंबर गेटपासून एक्स्प्रेस टॉवर्सच्या ९० अंशात असलेल्या चहा-सिगारेट्सच्या टपऱ्या यांच्याजवळ अभूतपूर्व गर्दी जमत होती. कारण फक्त पाच ते दहा मिनिटांचा उशीर झाला तरी दर्दी वाचक-गृह तुडुंब भरून जाई. मग दोन-तीनशे श्रवणोत्सुकांचा तांडा निराशाशमनाचे मार्ग अरबी समुद्राच्या कठड्यावर किंवा या क्षुधाशांतिभवनांमध्ये शोधू लागे. खरेतर हा दरवर्षीचा शिरस्ता. पण प्रेक्षक- श्रोत्यांप्रमाणेच टंगळ्या-मंगळ्यांची गणना वर्षागणिक वाढत चाललीय. असे असले, तरी ओंजळीभर मौलिक वाट्याला येते, हेही नसे थोडके.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : मूल्यमापनाची ‘परीक्षा’

पहिल्याच दिवशी प्रेक्षकखेचू चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांची मुलाखत ताज्या दमाचा चित्रकर्ता इम्तियाज अली घेणार, त्यामुळे या दोघांच्यासमवेत सेल्फीच्छुकांनी टाटा थिएटरची विक्रमी आसनक्षमता फोल ठरवली. सभागृह भरून उर्वरित दोन-तीनशेच्या संख्येने रांगेत उभे असलेल्यांना सायंकालीन समुद्री वारे दर्शनासाठी उरले. तिकडे आत घईंचे आत्मचरित्र ‘कर्माज चाइल्ड’ प्रकाशित होताना बॉलीवूडमधील त्यांच्या ३०-४० वर्षांच्या कारकीर्दीची उजळणी झाली. त्यानंतर काफ्का याच्या लेखनाचे अभिवाचन रंगता रंगता दूरवर रेल्वेने पांगणारी गर्दी कमी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच विख्यात लेखक महेश एलकुंचवार यांच्या ‘त्रिबंध’ पुस्तकाच्या ‘द नेक्रोपोलिस ट्रायॉलॉजी’ या अनुवादग्रंथाचे प्रकाशन झाले. अनहिता उबेरॉय यांनी त्यांची मुलाखत घेतली. एलकुंचवारांच्या लिखाणातून थेट सामाजिक भाष्यापेक्षा जे शाश्वत सामाजिक शल्य वाचकाला भिडते, ते या मुलाखतीतून भिडलेच. दोन धर्मीयांतील वैरभाव कुठेतरी दडून असतो आणि प्रसंगी तो उफाळून येतो, असे फाळणीच्या काळात झाले असेल, हे शल्य ओठांवर आल्यानंतर एलकुंचवार म्हणाले- ‘‘माणूस म्हणून एकमेकांचा आदर करायला आपण कधी शिकणार, हा प्रश्न मला पडला म्हणून लिखाणाचा घाट घातला, असे काही झालेले नाही. पण हा प्रश्न माझ्या त्या वेळच्या वास्तवाचा एक भाग होता. तो आताही आहे.’’ ब्रिटिश लेखक पिको अय्यर यांचा सकाळचा गोदरेज थिएटर येथील कार्यक्रम आसनमर्यादेपार गेला. पण तरी कार्यक्रमानंतर वाचकांनी त्यांना ‘सहि’ष्णू ठरवत अर्ध्याहून अधिक तास गुंगवत ठेवले. ‘आजच्या डीजिटल युगात लेखनकला ही अधिकाधिक अवघड बनत चालल्याचे त्यांनी संध्याकाळच्या मुलाखतसत्रात स्पष्ट केले. लेखनदमसासाबद्दल आणि ‘टाइम’ साप्ताहिकातील लेखनाबद्दलच्या आठवणी रंगविल्या. तिसऱ्या दिवशी जयवंत दळवी यांना ‘सलाम’ करणारा कार्यक्रम आणि नव्वदवर्षीय जेन गुडाल यांच्या ‘लेक्चर’ने गर्दी खेचली. ‘जयपूर’ महोत्सवानंतर नावाजल्या जाणाऱ्या या महोत्सवाचे नियोजन उत्तम असले, तरी आसनांच्या मर्यादेची समस्या ‘स्पीकर्स’ अथवा ‘स्क्रीन’द्वारे सोडवण्याची खरी गरज आहे. अन्यथा पुढल्या वर्षी टंगळ्या-मंगळ्यांची संख्या या वर्षाहून अधिक दिसेल, हे भाकीत चुकीचे ठरणार नाही.

Story img Loader