भारताच्या इतिहासात १९८४ या वर्षाची ओळख केवळ राजीव गांधींच्या काँग्रेसला ‘४०० पार’ जागा देणारे वर्ष एवढीच नाही- तशी असूही नये. याच वर्षात ‘निरमा’, ‘जयपॅन’ अशा मध्यमवर्गाला परवडणाऱ्या नाममुद्रांची सुरुवात झाली; पण दुसरीकडे फ्लॉपी डिस्कची पहिली भारतीय कंपनी ‘अॅमकेट’, ‘एचएमटी’ या सरकारी कंपनीच्या घड्याळांना शह देणारी ‘टायटॅन’, औषधनिर्मितीचे संशोधनही भारतात करू पाहणारी ‘डॉ. रेड्डीज’ अशा उद्याोगांची वाटचालही याच वर्षीपासून सुरू झाली. आज चाळिशीच्या होऊन देशभर सुपरिचित झालेल्या या भारतीय नाममुद्रांपैकी एक म्हणजे ‘नॅचरल्स आइस्क्रीम’! शहाळे, सीताफळ, अंजीर, फणस… या फळांच्या स्वादाचे आइस्क्रीम खाण्याची सवय भारतात रुजवली ती ‘नॅचरल्स’ या आइस्क्रीम-विक्रेत्या दुकानमाळेचे जनक रघुनंदन कामत यांनी. या कामत यांचे निधन १८ मे रोजी झाल्याचे जरा उशिरानेच जगाला कळले, पण ‘ते गेले तरी त्यांच्या आइस्क्रीमची चव तीच राहील’, असा विश्वास कैक चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: छेत्रीनंतर कोण?

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
WATCH Radhika Merchant and Anant Ambani’s fun Turkish ice cream moment in Dubai goes viral
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी फिरत आहेत दुबईत! Turkish आइस्क्रिम खाताना राधिकाचा मजेशीर Video होतोय Viral
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या

एवढा विश्वास संपादन करणारी संस्था उभारणे, हे रघुनंदन कामत यांचे खरे कर्तृत्व. आइस्क्रीम लोकांपर्यंत गेल्याशिवाय खपणार नाही, हे ओळखून जुहू कोळीवाड्यातल्या दुकानाखेरीज अन्य ठिकाणी त्यांनी आइस्क्रीम-दुकाने काढली… सगळीकडे चव एकसारखीच मिळेल, ताजेपणाही राखला जाईल, हे व्यावसायिक पथ्य त्यांनी पाळले. मधुमेहाचा विकार सांभाळून, ‘नॅचरल्स’च्या कामात ते ध्यासमयतेने मग्न राहिले होते. ‘आमच्या काही स्वादांना मागणी कमी असते, ते आम्ही कमीच प्रमाणात करतो. ‘प्रसादम्’ किंवा ‘तिळगूळ’ स्वादाचे आइस्क्रीम सर्वांना हवेच असते असे नाही; पण आम्ही हे प्रयोग करत असतो म्हणून आमचा मान राहातो! चित्रपट उद्याोग किती वाढला तरी ‘आर्ट फिल्म’ आपला आब राखून असतातच ना? तसेच हे!’ अशा गप्पा मारल्यासारख्या मुलाखती देणारे कामत हे पहिल्या वर्षीची गुंतवणूक आणि त्या वर्षीचे उत्पन्न यांचे आकडेही सहज सांगत- साडेतीन लाख आणि पाच लाख! पण ‘दूध-फळे आणि साखर’ यांखेरीज एखादा घटक ‘नॅचरल्स’मध्ये असतो का? किंवा, दुकानांची फ्रँचायझी (विकानमक्ता) देताना कोणकोणत्या आधारे निवड करता? ती सारीच दुकाने टिकून कशी काय राहातात? ही गुपिते मात्र त्यांच्या कुटुंबातच, दोन मुलांकडेच राहिली आहेत. मंगळूरच्या एका खेड्यातून शिक्षण सोडून, मुंबईला भावाच्याच उपाहारगृहात काम करताना रघुनंदन व्यवहारज्ञानी झाले. वडील आंबेविक्रेते, त्यामुळे ‘खऱ्या, ताज्या फळांच्या चवीचे आइस्क्रीम’ करण्याची आकांक्षा त्यांना अगदी मिसरूड फुटल्यापासून होती. पण या इच्छेला पंख मिळाले ते २९ व्या वर्षी, अन्नपूर्णा यांच्याशी विवाह झाल्यावर! त्यानंतरची ‘नॅचरल्स’ची भरभराट आज ४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.