डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मदअली जीना, जमशेदजी कांगा, नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरीमन या विविध पिढ्यांतल्या नावांमधले साम्य म्हणजे, या साऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची कारकीर्द केली… वकील किती यशस्वी यापेक्षा किती न्यायप्रिय आहे यावरच वकिली कारकीर्दीचे मोजमाप होत असते, याची जाण पुढल्या पिढीनेही जपली. इक्बाल छागला हे त्या पुढल्या पिढीपैकी ज्येष्ठ. पण वकिलीच्या उज्ज्वल कारकीर्दीत जे आदल्या पिढ्यांमधील कुणीही केले नाही, ते करण्याची धमक या इक्बाल छागलांनी दाखवली- उच्च न्यायालयातले न्यायाधीशही भ्रष्ट असू शकतात, अगदी मुख्य न्यायाधीशही पैशाच्या मोहात अडकू शकतात… अशा भ्रष्टांनी पदावरून हटलेच पाहिजे, असा ठाम आग्रह इक्बाल छागला यांनी धरला. ‘छागला’ हे आडनाव उच्चारताच अनेकांना ‘रोझेस इ डिसेंबर’ (मराठी अनुवाद : ‘शिशिरातील गुलाब’) या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायमूर्ती मोहम्मदअली करीम ऊर्फ एम.सी. छागला आठवतात, ते या इक्बाल छागलांचे वडील. त्या पुस्तकातल्या प्रसंगांतून सारासार विचाराचे, विवेकाचे जे धडे वाचकांना मिळतात, त्यांपैकी अनेक प्रसंगांचे इक्बाल हे साक्षीदार. वडिलांप्रमाणेच इक्बाल छागलांनाही न्यायमूर्तीपद मिळणार होते, तेही सर्वोच्च न्यायालयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा