मराठीत साठोत्तरी कविता जशी बदलत गेली, तशी युरोप-अमेरिकेत साठोत्तरी चित्रकला, शिल्पकलाही वेगाने नवनव्या रूपांत प्रकटू लागली आणि ‘दृश्यनिर्मिती’ हाच तिचा स्थायीभाव होऊन ‘दृश्यकला’ म्हणवली जाऊ लागली. त्यातच, १९५० च्या दशकानंतर अमेरिकेची ‘सर्वच क्षेत्रांत महान’ बनण्याची आकांक्षा राबवणारे लोक भरपूर असल्यामुळे अमेरिकी चित्रकार, शिल्पकारांना १९६० च्या दशकात तर अगदी मुक्त वाव मिळाला. असा वाव मिळालेले आणि त्यातून सौंदर्यदृष्टीच पालटून टाकू पाहणारे ‘मिनिमलिस्ट’ किंवा सारवादी शिल्पकार म्हणजे रिचर्ड सेरा. त्यांच्या २६ मार्च रोजी झालेल्या निधनानंतरही त्यांचे स्थान काय राहील?

हेही वाचा >>> अन्वयार्थ : अस्थानी त्रागा..

indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
khopte bridge loksatta latest news
उरण : खोपटे पुल दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबूतीकरण
In Jammu And Kashmir, PM Modi Assures All Promises Will Be Fulfilled
सर्व आश्वासने पूर्ण करणार! बोगद्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांची जम्मूकाश्मीरच्या जनतेला ग्वाही
mumbai police busts gang printing and selling fake Indian currency notes
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
Tilak Street , Pune, vehicle broke door shop ,
पुणे : टिळक रस्त्यावर मध्यरात्री थरार, भरधाव मोटार दुकानाच्या दरवाजा तोडून आत शिरली
pune gold jewellery stolen loksatta news
पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी

 १९६८ मधली त्यांची एक कलाकृती, मोठया पुठ्ठयातून हाताने झिरमिळयांसारख्या फाडलेल्या पट्टयांसारखी दिसणारी होती.. पण त्या कलाकृतीसाठी वापरले होते शिसे.. म्हणजे सर्वात जड धातू. त्यातून त्यांनी सहज फाडलेल्या पट्टयांसारखी दिसणारी दृश्यनिर्मिती केली होती. कुणाला त्या पट्टया पाहून अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाची आठवण झाली, तर कुणाला आणखी कसली. पण सेरा हे ‘राष्ट्रध्वजाला मी वंदनीय मानत नाही- राष्ट्रप्रेम दाखवलेच पाहिजे असे काही नाही. मी मुक्तच आहे’ अशी मते व्यक्त करू लागले. रूढ संकेतांना मी धक्का देणारच, ही आधुनिकतवादी चित्रकारांनी पूर्वापार दाखवलेली ऊर्मी १९७० च्या दशकानंतरही – म्हणजे तिकडे युरोपात ‘पोस्टमॉडर्न’ चित्रकला सुरू झाल्यानंतरही- कशी काय टिकवायची हा प्रश्न कदाचित सेरांना पडला असावा. तोवर यश- कीर्ती- पैसा मिळाला होताच, मग सेरा यांच्या कलाकृतींचा आकार अवाढव्य होऊ लागला आणि प्रक्रिया न केलेल्या पोलादाचा वापर ते करू लागले. अशा पोलादाची १२० फूट लांब आणि १२ फूट उंच भिंतच त्यांनी न्यू यॉर्कच्या फेडरल पार्कमध्ये उभारली, तेव्हा मात्र या उद्यानात येणाऱ्या नागरिकांनीच तक्रारी करकरून ती तिथून हटवली. शहरी, संस्कारित निसर्गाच्या सान्निध्यात राकट, रासवट पोलादी सौंदर्य उभे करण्याचा सेरांचा – तसेच त्यांना अशा कलकृतींसाठी प्रायोजित करणाऱ्यांचाही- उत्साह यामुळे विरला मात्र नाही. कतारच्या वाळवंटात २०१४ साली त्यांनी प्रत्येकी आठ ते दहा फूट रुंदीच्या आणि तब्बल ४८ फूट ते ५४ फूट उंचीच्या चार प्रचंड पोलादी फळया एका किलोमीटरमध्ये, सरळ रेषेत दिसतील अशा प्रकारे रोवल्या! हे शिल्प मग अन्य आखाती देशांतही ‘डेझर्ट लॅण्ड आर्ट’ला चालना देणारे ठरले. सेरांच्या मृत्यूनंतरही, त्यांनी वापरलेल्या पोलादाचा रासवटपणा आठवत राहील,  पाश्चात्त्य सभ्यपणाशी फटकून असणारी सौंदर्यदृष्टी त्यांनी देऊ केली, रांगडेपणाच्या सौंदर्यशास्त्राला ते मदतगार ठरले, याचीही नोंद राहील.

Story img Loader