गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगलीतील पीडितांच्या न्यायालयीन लढ्याचा चेहरा बनलेल्या झाकिया जाफरी यांच्या निधनाने गेली २३ वर्षे न्यायासाठी सुरू असलेल्या अविरत संघर्षाला न्यायाविनाच पूर्णविराम मिळाला आहे. तो दिवस होता, २२ फेब्रुवारी २०२२. गोध्राजवळ साबरमती एक्स्प्रेसमधील दोन डब्यांच्या जळीत प्रकरणानंतर गुजरातमध्ये पेटलेली दंगल ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना. दंगलखोरांनी ठिकठिकाणी विशिष्ट समूहातील लोकांना लक्ष्य केले होते. अहमदाबादमध्ये मुस्लीमबहुल गुलबर्ग सोसायटीत राहणारे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी ६८ जणांसह या दंगलखोरांचे लक्ष्य ठरले. जीव वाचवण्यासाठी एहसान जाफरी यांच्या घरी जमलेले सगळे जण बाहेरच्या जमावाने लावलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दंगलीत वाचलेल्या झाकिया जाफरी न्यायासाठी सर्वसत्ताधीशांविरोधात उभ्या राहिल्या आणि लढल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा