भांडवली बाजाराने सोमवारी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकावा अशी भीतीदायी गटांगळी अनुभवली. हे असे यापूर्वीही अनेकदा घडत आल्याने सोमवार हा बाजारासाठी घातवार ठरलाय की काय, असे वाटावे. सेन्सेक्स-निफ्टी हे आपल्या बाजाराचे सूचक निर्देशांक या पडझडीत जवळपास तीन टक्क्यांपर्यंत लोळण घेताना आढळून आले. जगभरातील बाजारात सुरू असलेल्या पडझडीचेच हे प्रतिबिंब. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग अथवा अमेरिकेच्या एस अॅण्ड पी ५०० अथवा नॅसडॅकमधील गेल्या काही सत्रांतील घसरणीची मात्रा पाहिली, तर त्या तुलनेत आपली स्थिती बरी म्हणावी. पण हे समाधान वरवरचेच. उलट आपल्याला भीती अधिक हवी, कारण तेजीचे जोमदार वारे वाहणे सुरू असतानाच अकस्मात जबर धक्का बसतो आहे. म्हणजेच धावपटूने वेग पकडत इतरांपासून मोठी आघाडी घ्यावी आणि अंतिम रेषेला तो गाठणार इतक्यात पाय ठेचकाळून त्याने तोंडावर पडावे असा हा घाव! त्या धावपटूला परत उठण्याची संधी मिळेल की नाही हा प्रश्न जितका गहन, तितकाच बाजारातील पडझड सोमवारपुरती तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाची की, ती पुढेही काही काळ सुरू राहील आणि राहिली तर कुठे जाऊन थांबेल, हे सध्या उत्तर अवघड असलेले प्रश्नही तितकेच सर्वांगाने गंभीर. त्यामुळे सोमवारच्या झडीची कारणे आणि त्यामागील सैद्धांतिक मांडणी, यापेक्षा पडझडीची नेमकी वेळ काय, हे लक्षात घेणे अधिक उपयुक्त. तसे केले तरच मग कुणी कमावले आणि कुणी गमावले हा हिशेबही स्पष्टपणे पुढे येईल. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकेत आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून तेथील बाजार आपटणे हे चिंतेचे कारण आहेच. पण हे अगदी अनाकलनीय होते किंवा अकस्मातपणे घडून आले असेही नाही.
अन्वयार्थ : अटळ बाजारझड; पण नुकसानही अपरिहार्य?
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकेत आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून तेथील बाजार आपटणे हे चिंतेचे कारण आहेच.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-08-2024 at 01:14 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article analysis reason behind stock market crash zws