‘आई जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकली होती… पण लग्नानंतर कॅनव्हासवर चित्रं रंगवणं सोडलंच तिनं’- असे सांगणारे स्त्रीपुरुष आता वयाने ४५-५० च्या आसपास असतात. गोगी सरोज पाल यांचा मुलगा हयात असता, तर तोही आज याच वयाचा असता. पण तीन दशकांपूर्वीच त्याचे अकाली निधन झाले तेव्हाही गोगी या चित्रकार म्हणून प्रख्यात होत्या… २०११ मध्येच त्यांचे सिंहावलोकनी प्रदर्शन भरले होते, त्या निमित्ताने त्यांच्या कलाकृतींचा आढावा घेणारे पुस्तकही निघाले होते. परवाच्या २७ जानेवारीस हे जग सोडून गोगी मुलाकडे गेल्या. तेव्हा त्यांच्या राहत्या दिल्ली शहरापासून ते चेन्नईपर्यंतचे चित्रकार हळहळले असतील ते चित्रकार किती मनस्वी असावा याची एक खूण आपण गमावल्यामुळे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : अशोक सराफ

उत्तर प्रदेशातल्या नेवली या गावात १९४५ मध्ये जन्मलेल्या गोगी सरोज यांनी लखनऊच्या कला-महाविद्यालयातून चित्रकलेचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी त्या दिल्लीत आल्या आणि तिथल्याच झाल्या. इथेच त्यांना चित्रकार वेद नायर हा जोडीदार गवसला. दिल्लीचे ज्येष्ठ चित्रकार भाबेशचंद्र सन्याल हे लाहोरमध्ये शिकलेले. तिथून सुरू झालेल्या गोलाईदार रेषेच्या मानवाकृतींना सतीश गुजराल, मनजीत बावा या पंजाबी चित्रकारांनी आपलेसे करण्याच्या काळातच गोगी यांच्या रेषाही गोलाईदार होत होत्या. पण स्त्रीदेहाचे त्यांनी केलेले चित्रण मात्र इतरांपेक्षा- पुरुष चित्रकारांपेक्षा निराळे ठरले. या स्त्रियांच्या शरीरावर वस्त्र नसले तरी अधिक लक्ष जाई ते बोलक्या डोळ्यांकडे… शरीर चितारताना प्रमाणबद्धतेपेक्षा लयीला महत्त्व दिले आहे, याकडे. मुद्राचित्रण, कॅनव्हासवरील तैलचित्रे आणि कागदावर अपारदर्शक रंगांची चित्रे, सिरॅमिक- मातीकाम इथपासून ते दागिन्यांचे डिझाइनही गोगी यांनी केले. यापैकी रंगचित्रांमध्येच त्या अधिक रमल्या. ही चित्रे भारतीय आधुनिक कलेच्या इतिहासातल्या स्त्रियांचे स्थान बळकट करणारी होती. ‘लोकसत्ता’च्या ‘रंगधानी’ या सदरात नूपुर देसाई यांनी (३० सप्टेंबर २०१७) नोंदवले होते : “गोगी सरोज पाल स्त्रियांच्या इच्छा, आकांक्षांचं आणि त्यांची दखल न घेतली जाणं याचं चित्रण करतात. ‘बीइंग अ वुमन’, ‘कामधेनू’, ‘किन्नरी’, ‘नायिका’सारख्या चित्रमालिकांतून त्या स्त्रीबद्दलच्या त्यागाच्या, सहनशीलतेच्या, स्त्रैणभावाबद्दल तयार झालेल्या मिथकांना छेद देतात किंवा ‘हठयोगिनी-काली’ मालिकेतून आजपर्यंत अस्तित्वात नसलेली स्त्रीची प्रतिमा तयार करतात. त्यांची नायिका ही स्त्रीच्या सुप्त जाणिवांना सादर करते. ‘स्त्री ही सतत इतरांसाठी जगत असते. माझ्या नायिका या स्वत:साठी जगतात,’ असं गोगी म्हणतात.” – हे स्वत:साठी जगणे आता थांबले आहे.