वयाच्या आठव्या वर्षी मैफलीत साथ करण्याची संधी, वयाच्या बाराव्या वर्षी कर्नाटकशैलीचे व्हायोलिनसम्राट द्वारम् वेंकटस्वामी नायडू यांच्या एकलवादनाला मृदुंगसाथ आणि त्यानंतर अनेक प्रख्यात गायक-वादकांसह वादन, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याआधीच राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून, अ. भा. आंतर-विद्यापीठीय स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट कलाकारा’चे पदक… पण पदवी-शिक्षण पूर्ण होतानाचे वय २७… वरदा कमलाकर राव यांच्या आयुष्यातली, १४ ते २२ ही वर्षे कुठे गेली होती? त्या वाढत्या वयातच मृदंगम् – वादक म्हणून त्यांची सैद्धान्तिक बैठक तयार होत होती. या वाद्याचे धडे दोन गुरूंकडून घेतल्यानंतर तिसरे गुरू, पद्माश्री पालघाट मणि अय्यर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने कमलाकर राव शिकू लागले होते. अय्यर यांनीही राव यांना पुत्रवत मानून त्यांना सारी विद्या दिली आणि मृदुंगमवादनाचे एकल कार्यक्रम करण्याइतपत तयार तर केलेच, पण कर्नाटक संगीतासह हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातही साथ करण्यासाठी राव यांना सिद्ध केले. अशी चतुरस्रा मृदुंगविद्या घेऊन वडिलांच्या आग्रहाखातर महाविद्यालयात येईस्तोवर, वयाची एकविशी उलटून गेलेली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा