अरूण कोलटकर, दिलीप चित्रे, आदिल जस्सावाला हे कवी ज्यांना माहीत असतात, ते अरविंद कृष्ण मेहरोत्रांचं नाव घेतलं की कान टवकारतात! मेहरोत्रा हे कवी, संघटक आणि प्रकाशकसुद्धा आहेत आणि ‘अरूण’ (रू दीर्घच, हृस्व रु नाही!) किंवा ‘दिलीप’प्रमाणे डाव अध्र्यावर सोडून जगातून न जाता, आज पंच्याहत्तरी उलटूनही हिंडतेफिरते असल्यानं जगभरच्या काव्यरसिकांपर्यंत स्वत: पोहोचताहेत. अगदी नव्याकोऱ्या ‘अ बुक ऑफ रहीम अ‍ॅण्ड अदर पोएम्स’ या ८० पानी काव्यसंग्रहाच्या निमित्तानं अलाहाबादहून दिल्लीमार्गे प्रवासही करू लागले आहेत. काय आहे हे पुस्तक? हा ‘रहीम’ कोण?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘साध्या शब्दांतून असाध्य आशयाकडे’ ही एरवीच्या मेहरोत्रा-कवितांची ‘चाल’ पाळणारंच हे पुस्तक आहे. त्यातला रहीम म्हणजे ‘अब्द अल-रहीम खान-ए-खानान’ (जन्म १५३०- मृत्यू १६२७). हा अकबर आणि जहांगीर या मुघल बादशहांच्या काळातला कवी, अकबरानं त्याला राजकवीचा दर्जा दिला होता. मूळचा तुर्कस्तानी असलेल्या या रहीमनं ब्रजभाषेतही रचना केल्या आणि त्याला संस्कृत भाषाही अवगत होती. त्याच्या किताबखान्यात म्हणे पंच्याण्णव कर्मचारी होते.. असा उल्लेख एका कवितेच्या खाली करताना मेहरोत्रा विचारतात? हू वेअर दे.. कोण होते ते? सुलेखनकार असतील, कागजनवीस असतील, आणखी कोणीकोणी असतील, किताबखान्याच्या प्रांगणातल्या चौकोनी हौदात, कमळांमधून उरलेल्या डहुळत्या पाण्यात, आपापलं प्रतिबिंब क्षणभर पाहात असतील.. मग कुठे गेले ते? कोण होते ते?

मेहरोत्रा नावाचा कवी या प्रश्नाचं उत्तर देतो : ते होते तू आणि मी!

आणखी कविता वाचायच्या असतील तर एक जरा असुरक्षित लिंक आहे. तिच्यावर या संग्रहाची पहिली १७ पानं मिळू शकतात.

तो दुवा असा :

Click to access arvind-krishna-mehrotra-book-of-rahim-sampler.Pdf