एखादे प्रवासी विमान शत्रूदेशाचे मानले गेल्यामुळे ‘चुकून’ लक्ष्य बनल्याची आणि दुर्घटनाग्रस्त झाल्याची उदाहरणे अलीकडच्या इतिहासात दुर्मीळ आढळतात. अत्याधुनिक रडार यंत्रणा, जीपीएससारखी उपकरणे, उच्च क्षमतेची छायाचित्रण क्षमता हाती असल्यामुळे शत्रू- मित्र- त्रयस्थ ओळख पटवणे तितकेसे अवघड राहिले नाही. तरीदेखील अशी अत्याधुनिक उपकरणे २५ डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानातील ३८ जणांचे प्राण वाचवू शकली नाहीत. कारण ‘चुकून’ विमान पाडले गेल्याचे बहुतेक सर्व प्रकार युद्धखोरी आणि संशयभावनेतून घडतात. काही वेळा अशा कारवाया हेतुत: होतात. नंतर सारवासारव केली जाते. अशी सारवासारव प्रस्तुत विमानाच्या बाबतीत दस्तुरखुद्द रशियाधीश व्लादिमीर पुतिनच करते झाले. त्यातून संशयच अधिक वाढतो. पुतिन यांनी अझरबैजानची माफी मागितली; पण रशियाचे या प्रकरणातील दायित्व थेटपणे कबूल करण्याचे टाळले. हे विमान अझरबैजानचे, निघाले होते रशियाकडे, पण दुर्घटनाग्रस्त झाले कझाकस्तानमध्ये. विमानात ६३ प्रवासी होते, त्यांतील २५ बचावले. विमानाचे दोन्ही ‘ब्लॅक बॉक्स’ हस्तगत झाले असून त्यातून येत्या दोन आठवड्यांत नेमक्या घटनाक्रमाचा छडा लागू शकतो. किंवा, कदाचित लागणारही नाही! कारण हा संपूर्ण युरेशियन टापू एक युद्धक्षेत्र बनला आहे. तरीदेखील त्यावरील रशियाची दहशत आणि प्रभाव कमी झालेला नाही. किंबहुना तो वाढलेला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका तिसऱ्याच देशाच्या विमानास चौथ्या देशात बसला. इंग्रजीत ज्यास ‘कोलॅटरल डॅमेज’ किंवा समांतर विध्वंस म्हणतात, त्याची दुर्दैवी अनुभूती या विमान दुर्घटनेने पुन्हा एकदा आली.

हेही वाचा : भूगोलाचा इतिहास : देणे भूगोलाचे!

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Washington DC Plane Crash USA
US Plane Crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, ३० मृतदेह सापडले
ISRO satellite launch , Sriharikota, andhra pradesh, 100th successful flight,
ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Russia-Ukraine war Putin Trump
Vladimir Putin: ‘ट्रम्प २०२० साली हरले नसते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं मोठं विधान
DRDO scramjet test loksatta
डीआरडीओची स्क्रॅमजेट चाचणी काय होती? भारताची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता लवकरच अमेरिका, रशिया, चीनच्या तोडीची?
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा

सर्वप्रथम मूळ घटनेविषयी. अझरबैजान एअरलाइन्सचे एम्ब्रेअर १९० बनावटीचे प्रवासी विमान २५ डिसेंबर रोजी सकाळी रशियातील ग्रॉझ्नी येथे निघाले. परंतु ग्रॉझ्नीस जाण्यापूर्वीच ते कॅस्पियन समुद्र ओलांडून कझाकस्तानच्या हवाई हद्दीत शिरले आणि त्या देशात जाऊन कोसळले. ग्रॉझ्नी विमानतळावर दाट धुके असल्यामुळे विमानास इतरत्र जाण्याविषयी सांगितले गेले. परंतु इतरत्र जाण्याऐवजी ते कॅस्पियन समुद्र ओलांडून पार कझाकस्तानात का गेले, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. रशियाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीस विमान अपघाताचे कारण पक्ष्यांची धडक असे सांगितले. पण कोसळलेल्या विमानाच्या अवशेषांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसृत झाल्यानंतर, पक्ष्यांची धडक हे कारण फेटाळले जाऊ लागले. या छायाचित्रांमध्ये विमानाच्या शेपटीकडील भागावर मध्यम वा मोठ्या आकाराच्या बंदुकीच्या गोळ्यांच्या आघाताने होणारी छिद्रे स्पष्टपणे दिसून येतात. विमानावर विमानविरोधी यंत्रणेकडून मारा झाला असावा, अशी शक्यता यानंतर बहुतांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे ती वर्तवणाऱ्यांमध्ये रशियामित्र आणि विरोधक अशा दोन्हींचा समावेश आहे. त्यांचे अंदाज आणि पुतिन यांचे निवेदन यातून काही संगती लावता येते. ग्रॉझ्नी आणि आसपासच्या भागांवर युक्रेनकडून ड्रोनहल्ले सुरू आहेत. ते परतवून लावण्यासाठी या भागात रशियाची क्षेपणास्त्र आणि विमानविरोधी यंत्रणा सक्रिय आहे, असे पुतिन यांनीच म्हटले आहे. याचा अर्थ रशियाच्या विमानविरोधी यंत्रणेने अझरबैजानच्या विमानाचा ड्रोन समजून वेध घेतला असावा, असे अनेक विश्लेषक सांगू लागले आहेत. एम्ब्रेअर हे छोट्या प्रकारातील विमान होते. बोइंग किंवा एअरबस प्रकारातील बहुतेक विमानांसारखे मोठे नव्हते. काही विश्लेषकांनी, रशियाच्या पँतसीर – एस यंत्रणेने विमानाचा वेध घेतला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजे पक्ष्यांची धडक ही शक्यता जवळपास संपुष्टातच येते.

हेही वाचा : अन्यथा : ‘जीन’थेरपी!

जगात अनेक ठिकाणी संघर्षमय परिस्थितीमुळे प्रवासी विमानांसाठी अवकाश किती असुरक्षित बनले आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले. रशियाचा प्रवासी विमानांच्या बाबतीत इतिहास अतिशय सदोष आहे. क्रायमिया संघर्षाच्या काळात मलेशियाचे प्रवासी विमान युक्रेनस्थित रशियन बंडखोरांनी पाडले होते. १९८०च्या दशकात दक्षिण कोरियाचे भरकटलेले प्रवासी विमान रशियाकडून असेच पाडले गेले. सध्या विविध संघर्षांमुळे पश्चिम आशियातील विशाल टापू, उत्तर-मध्य आशिया आणि पूर्व युरोप; सीरिया, येमेन आणि युक्रेनसारखे देश, तैवान आणि कोरियन आखात, काही आफ्रिकी देश यांच्या हवाई हद्दींमध्ये प्रवासी विमानांचे उड्डाण जोखीममूलक मानले जात आहे. पुढील काही काळ यात बदल होण्याची चिन्हे नाहीत. यास सर्वाधिक जबाबदार रशियासारख्या मोजक्या देशांची युद्धखोरीच आहे.

Story img Loader