‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ आणि ‘ओ हेन्री प्राइज स्टोरीज’ या अमेरिकी लेखकांच्या कथाखंडांचा वितरण आवाका प्रचंड. म्हणजे भारतातल्याही इंग्रजी ग्रंथदालनांत न चुकता मिळणारा आणि भरपूर खरेदी केला जाणारा. कॅनडा आणि अमेरिकी मासिकांमध्ये वर्षभरात आलेल्या शेकडो-हजारो कथांमधून निवडलेल्या वीस कथांचा हा संग्रह बिलकूल निराशा करीत नाही, इतका यातल्या कथांचा दर्जा उत्तम असतो. (संपादकाच्या सोम्या-गोम्या मित्र-मैत्रिणींनी लिहिलेल्या या निकषांवर या कथा ठरत नाहीत.) तर यंदा या पुस्तकमालिकांचा, म्हणजेच निबंध-रहस्यकथा-विज्ञानकथा या ग्रंथाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलण्यात आला असून कलात्मक मुखपृष्ठांची भर त्यात पडली आहे. जे नियमित हे खंड खरेदी करतात त्यांना आणखी एक वाचनसुख मिळेल ते लॉरेन ग्रॉफ या कथालेखिका आणि कादंबरीकार असलेल्या संपादिकेने लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे. ‘कथा’ या प्रकाराचा दीडशे-दोनशे वर्षांचा इतिहास तिने रंजकतेने मांडला आहे. या प्रकाराची उणे-अधिक वैशिष्ट्ये सादर केली आहेत. त्यांत कथा लिहिण्याच्या जागतिक नादाचीही चर्चा केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या लेखनप्रकाराच्या काठीण्यपातळीबद्दलही बरेच काही सांगितले आहे. १९२९ साली एफ. स्कॉट फिझगेराल्ड या लेखकाला सॅटरडे इव्हिनिंग पोस्ट हे एका कथेसाठी ४००० डॉलर इतके मानधन देत होते. त्याची २०२४ सालातील बरोबरी ७२ हजार ५०० डॉलर अथवा अमेरिकी शहरातील उत्तम घराच्या नोंदणीची रक्कम असल्याचा तपशीलही ग्रॉफने उकलला आहे. इंटरनेट, ऑनलाइन /ऑफलाइन नियतकालिके, प्रयोगशील कथने छापणारी नियतकालिके, वृत्तपत्रांच्या आठवडी पुरवण्या यांमधून जिवंत राहिलेल्या कथा या प्रकाराबद्दल या समग्र विश्लेषणानंतर मग लॉरेन ग्रॉफने या प्रकारावरील आपले अल्पचरित्र मांडले आहे. वर्षात न्यू यॉर्करमधून एक-दोनदा झळकण्याचे पराक्रम या लेखिकेने केले आहेत. तिचे पहिले प्रेम कवितेवरचे. नंतर कथा आणि त्यानंतर कादंबरीवरचे. अर्थात या तिन्ही प्रकारांवर लिहिणाऱ्याचे प्रेम असायलाच हवे, ही तिची भूमिका. गेल्या वर्षी लॉरेन ग्रॉफ ‘ओ हेन्री प्राइज स्टोरीज’साठी संपादन करीत होती. सलग या दोन महत्त्वाच्या खंडाचे संपादन करण्याचा मान मिळविणारी ही पहिलीच लेखिका असावी. पण या दोन वर्षांत कथाभ्यास जोरकस झाल्याने तिची निरीक्षणे धारदार आहेत.
तिचे म्हणणे हे आहे की ‘प्रथमपुरुषी कथानकांची सुनामी या विश्वात आली आहे. कथेतले तृतीय पुरुषी निवेदन हरवत चालले आहे.’ या विधानाचे संदर्भांसह उत्तम स्पष्टीकरण तिने अमेरिकी भवतालापुरते शोधले आहे. प्रथमपुरुषी निवेदनातील बलस्थाने आणि मर्यादांवर तिने भाष्य केले आहे. जे मूळ वाचणे चांगलेच, शिवाय आपल्या साहित्यिक भवतालात डोकावण्यासाठी प्रवृत्त करणारेदेखील. म्हणजे साठोत्तरीतील कैक लेखकांच्या प्रथमपुरुषी नायकांना डोक्यावर नाचवत, देव्हाऱ्यात ठेवून त्यांच्यासमोर वाजवत बसलेल्या आपल्याकडच्या वाचकांचे नेमाडेंचे कोसलावरील प्रेमाधिक्य हे प्रथमपुरुषी निवेदनामुळे तर नसेल ना? अन् भाऊ पाध्येंच्या राडा, बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर यांच्यासह कित्येक तृतीयपुरुषी निवेदनाच्या कादंबऱ्यांना तुलनेने ‘साइडट्रॅक’ करण्यात त्यांतले निवेदन कारणीभूत नसेल ना? निवेदनाचा विचार आपल्याकडले वाचक आस्वादनात करतात काय?
लॉरेन ग्रॉफची प्रस्तावना वाचून आपल्याला खरेच असले प्रश्न पडायला सुरुवात होते. तृतीयपुरुषी निवेदनातील किती कथनसाहित्य आपण ताज्यातले वाचले हेही आठवायला सुरुवात होते. तूर्त दिवाळीअंकांच्या कथापैसात आपण किती प्रथमपुरुषी निवेदने आणि किती तृतीयपुरुषी निवेदने वाचतो, हे पडताळून पाहता येईल. त्यानंतर ‘तृतीयपुरुषी निवेदन हे अस्तंगत होत चाललेल्या प्रकारात मोडते’ या लॉरेन ग्रॉफच्या दाव्यातील तथ्य उमगू लागेल.
पहिलीच कथा भारतातली!
‘बेस्ट अमेरिकन’च्या यंदाच्या कथानिवडीतील पाच ते सहा नावे परिचित आहेत. बाकी सर्व अज्ञात प्रदेशातून हुडकून काढलेली. संग्रहात छापली जाणारी पहिली कथा ही संपादकाला सर्वात आवडीची असते. यंदाची कथा ही भारतीय वाचकांनाही फार अपरचित असलेल्या शास्त्री अकेला या भारतीयाची असून ती चक्क भारतात घडणारी आहे. ‘द मॅजिक बॅन्गल’ या कथेतील कार्तिक नावाचा तरुण हा कथेचा प्रथमपुरुषी निवेदक मुलींऐवजी मुलांमध्ये स्वारस्य असणारा. वडिलांना त्याच्या या ‘पौरुषहौशी’ वृत्तीचा छडा लागतो. त्यानंतर त्याला घरातून तंबी मिळते ती वर्षभरात सुधारण्याविषयी. त्यानंतर (सुबक-ठेंगण्या) मुलीशी लग्न लावून दिले जाणार असल्याची.
हे ‘पौरुषहौशी’ पोर मग आपल्याच शहरात पर्यटकासारखे वावरू लागते आणि बंडाचे सौख्य मिळवते. ‘फेअरी टेल रिव्ह्यू’मध्ये छापण्यात आलेली ही कथा ‘भारताचे प्रतिनिधित्व करते का?’, ‘भारतीय तरुणाईचे प्रतिनिधित्व करते का?’ असले प्रश्न देशाच्या विकासाच्या पताका जगभर मिरवणाऱ्यांना पडू शकतात. लॉरेन ग्रॉफच्या निवडीबरहुकूम ती वर्षातील सर्वोत्तम इंग्रजी कथा आहे. शास्त्री अकेला यांची पहिली कादंबरीदेखील ‘क्वीअर’ आहे. अमेरिकेतील विद्यापीठांच्या मानाच्या लेखन- शिष्यवृत्त्यांद्वारे त्यांच्यातील लेखनकला बहरत आहे.
बाकी ‘बातमी’ इतकीच की, कथेतला तृतीयपुरुष हरवला आहे काय, याचा विचार करायला भाग पाडणाऱ्या सर्वोत्तम प्रस्तावनेचा यंदाचा खंड गेल्या पंधरवड्यापासून उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा...
‘व्हर्जिनिया क्वार्टर्ली रिव्ह्यू’चा ताजा अंक अकथनात्मक साहित्याचा आहे. साराच निबंध आणि लेख, आत्मकथनांनी भरलेला. ओरहान पामुक यांच्यापासून ते इतर दिग्गजांचा समावेश असलेला हा संपूर्ण अंक खाली नमूद केलेल्या लिंकवर वाचता येईल.
https://shorturl. at/0 FzsF
नाटक आणि कथा-कादंबऱ्यांत रमणाऱ्या ब्रिटिश लेखिका डेबोरा लेव्ही वाचकाला पकडून ठेवणारे लिखाण करतात. त्यांनी सरधोपट स्त्रैण अभिव्यक्तीस तिलांजली देत ‘चांगले लेखन’ कसे आत्मसात केले, हे सांगणारी मुलाखत.
https:// shorturl. at/nF4C9
कॅनडामधील बुकर म्हणून ओळखले जाणारे ‘स्कॉटिया बँक गिलर प्राइज’ वादंगामुळे आता ‘गिलर प्राइज’ एवढेच नाव धारण करेल. लघुयादी येथे वाचता येईल. दीपा राजगोपालन यांचा भारतीय महिलांवरच्या कथांचा ‘पिकॉक्स ऑफ इन्स्टाग्राम’ हा संग्रह या लघुयादीत आहे.