जात समूह, भौगोलिक समूह आणि झोपडपट्टीवासी अशी ‘आप’विरोधात त्रिसूत्री रणनीती भाजप राबवत असल्याचे दिसते. एकुणातच ‘आप’साठी २०२५ ची विधानसभा निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही असे म्हणता येऊ शकते. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे अगदी गेल्या आठवड्यापर्यंत सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या हातात असल्याचे दिसत होते. पण, आता निवडणुकीच्या प्रचाराची दिशा भाजप ठरवू लागला आहे. त्यामुळे ‘आप’च्या हातातून वाळू हळूहळू निसटणार तर नाही, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. २०२०मध्ये ‘आप’ला ५३ टक्के मते मिळाली होती, भाजपला ३८ टक्क्यांवर समाधान मानावे लागले होते. दोन्ही पक्षांमधील मतांच्या टक्केवारीतील फरक १५ टक्के आहे. हा फरक मोठा असला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघ लहान असतात, अगदी पाचशे-हजार मतांचा फरक त्या मतदारसंघाचे भवितव्य निश्चित करत असतो. त्यामुळे ‘आप’ला ५० टक्क्यांच्या आत रोखणे हे भाजपचे पहिले लक्ष्य असेल. १५ टक्क्यांतील पाच-सात टक्के मते काँग्रेसकडे वळली तरी ‘आप’ची मते सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत सीमित करता येतील. या रणनीतीतील दुसरा भाग असा की, ‘आप’ने मतांचे आणि विजयाचे शिखर गाठले असल्याचे मानले जाते. ‘आप’ला दिल्लीकरांनी सलग तीन वेळा निवडून दिले असून ते पर्याय शोधू शकतात. असे झाले तर, भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते. मग, भाजपसाठी दिल्ली विधानसभा निवडणूक तुल्यबळ झालेली असेल. ‘आप’साठी २०२५ ची विधानसभा निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही असे म्हणता येऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा