ओडिशात कमळ फुलल्यावर मोहन चरण माझी या आदिवासी समाजातील नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड करून भाजपने धक्कातंत्राची परंपरा कायम ठेवली. ओडिशा विधानसभेच्या १४७ पैकी ७८ जागा जिंकलेला भाजप पूर्वेकडील राज्यात एकहाती सत्तेत आला आहे. ओडिशात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा होती; पण गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांप्रमाणेच प्रस्थापित नेत्यांना डावलून भाजपने नवीन चेहरा पुढे आणण्याची परंपरा कायम ठेवली. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाची २४ वर्षांची सद्दी संपवून भाजपला यश मिळाले. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्थापित नेत्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी वा गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय धर्मेेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा होती. आतापर्यंत प्रधान हेच ओडिशातील भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जात. पण केंद्रीय मंत्रिमंडळात प्रधान आणि आदिवासी नेते ज्युएल ओरम यांचा समावेश झाला तेव्हाच मुख्यमंत्रीपदाकरिता नवीन चेहरा असेल हे संकेत मिळाले होते. मुख्यमंत्रीपदी अनपेक्षित नेत्यांना ‘नेमण्या’ची नवी परंपरा भाजपच्या शीर्षस्थांनी कायम ठेवली. चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेल्या माझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. याआधी अशाच प्रकारे, गुजरातमध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याची खेळी यशस्वी झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा