‘३७० : अनडूइंग द अनजस्ट’ हे पुढल्या शुक्रवारी (३० ऑगस्ट) प्रकाशित होणारं पुस्तक ५४४ पृष्ठांचं आणि मुळात ८९९ रुपये किमतीचं असलं, तरी काही पुस्तकविक्री संकेतस्थळांवर २५ वा ३५ टक्के सवलतीत विक्री सुरू आहे. पुस्तकाला प्रस्तावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. पुस्तकावर लेखकाचं नाव- आडनाव मात्र नाही! ‘ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशन’ हे या छापील पुस्तकाचे ‘लेखक’ असल्याचं ‘अॅमेझॉन’च्या संकेतस्थळावर नमूद आहे… ‘याच लेखकाची अन्य पुस्तके’ विकायला अॅमेझॉनवाले तयारच असतात, त्या पुस्तकांची यादी पाहिल्यावर बराच उलगडा होऊ शकेल.‘मोदी अॅट २०’ हे मोदींना मुख्यमंत्रीपद स्वीकारून २० वर्षं पूर्ण झाल्यानंतरचं पुस्तक, मोदींच्या ‘मन की बात’ भाषणांचे २०१७, २०१९ आणि २०२३ मध्ये निघालेले संग्रह… ‘आंबेडकर अॅण्ड मोदी’ तसंच ‘फुलफिलिंग बापूज ड्रीम्स’ अशी- त्या दोन्ही नेत्यांचे विचार मोदींच्या प्रशासनात कसे दिसून येतात याची प्रचीती देणारी पुस्तकं, मोदी यांच्या आपत्ती-व्यवस्थापन कौशल्याबद्दलचं पुस्तक… अशी पुस्तकं हितेश जैन आणि अखिलेश मिश्रा यांच्या या ‘ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशन’नं सिद्ध केली आहेत. यापैकी मोदी-भाषणांचे संग्रह वगळता कोणत्याही पुस्तकावर लेखकाचं नाव नाही. स्वत:ला ‘नॉनप्रॉफिट ऑर्गनायझेशन’ म्हणवून घेणाऱ्या या फाउंडेशनची अनेक पुस्तकं ‘पेन्ग्विन एंटरप्राइज’मार्फत प्रकाशित करवण्यात आलेली आहेत. ‘पेन्ग्विन रॅण्डम हाउस’ या बलाढ्य, बहुराष्ट्रीय प्रकाशन कंपनीची ‘पेन्ग्विन एंटरप्राइज’ही शाखा जरी ऑर्डरप्रमाणे पुस्तकं बनवून देण्याचं सशुल्क काम करत असली, तरी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘पेन्ग्विन’चा (भगव्या पार्श्वभूमीवर) परिचित लोगोच छापला गेल्याने हे प्रचारपुस्तक ‘ना तोटा’ तत्त्वावर प्रकाशित झाल्याचा वाचकांचा ग्रह होऊ शकतो!

हेही वाचा...

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

अखील शर्मा हे दिल्लीत जन्मले असले, तरी अमेरिकी लेखक. न्यू यॉर्करच्या या आठवड्याची ‘द नारायण्स’ ही कथा भारतीय स्थलांतरितांच्या अमेरिकेतील जगण्यावर बेतलेली. न्यू जर्सी विभागात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषत: सांगणारी.

https:// shorturl. at/ N8 hZy

डॅनी चेरी ज्युनिअर हा कृष्णवंशीय लेखक. कादंबरी, कथा आणि लेख लिहिणारा. न्यू ऑर्लिन्स या परिसरात १०० वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यावर त्याची कादंबरी याच वर्षी आली. त्याने न्यू ऑर्लिन्समधील काळ्यांच्या वस्तीत राहून गोऱ्यांच्या मानसिकतेवर लिहिलेला ‘व्हाइट लाइक मी’ हा आत्मलेख येथे वाचता येईल.

https:// shorturl. at/ WViT5

रॉबर्तो बोलानो हा चिली देशाचा ‘प्रचंड’ लेखक. कविता त्याने लिहिल्याच पण ठोकळ्याच्या आकाराच्या कादंबऱ्या आणि लांबच लांब चालणाऱ्या कथाही प्रसवल्या. हरवलेले कवी, लेखक, पुस्तके अनेकदा त्याच्या गोष्टींमध्ये सापडतात. त्यांच्या अनुवादिका नताशा विमर यांनी समाजमाध्यमांवर बोलानोची लघुतम कथा अनुवादित करून समाजमाध्यमांवर जाहीर केली. ‘द बेस्ट गँग’ नावाच्या या तुकड्यात पाच कवींना घेऊन बँकेवर दरोडा टाकण्याची योजना आहे…

https:// shorturl. at/ qyVMu

Story img Loader