सध्या ‘एआय’ (आर्टिफिशिअल इण्टेलिजन्स) तंत्रज्ञानाला ‘कथालेखन कसे करावे’ हे शिकवणाऱ्या स्टीव्हन किंग यांनी ‘हॉली’ ही आपली नवीकोरी डिटेक्टिव्ह कादंबरी प्रसिद्ध करतानाच पुढच्या कादंबरीचे सुतोवाच केले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच्या महिन्याभराने तिकडे अमेरिकेत जन्मलेल्या स्टीव्हन किंग या लेखकाला त्याच्या लिहित्या काळापासून सात समुद्र अल्याडच्या आपल्या देशातून आणि पल्याडच्या पूर्वेकडील देशातून गेली पन्नासेक वर्षे सारखीच मागणी आहे. कारण त्याच्या कादंबऱ्या-कथांवर धडाधड निघणारे आणि गाजणारे चित्रपट. ‘ग्रीन माईल’,‘स्टॅण्ड बाय मी’, ‘इट’, ‘द शायिनग’, ‘शॉशन्क रिडम्प्शन’ आणि कितीतरी सिनेमांची नावे घेता येतील. साठ-सत्तरच्या दशकापासून भूत-भय-विज्ञान आणि सर्व प्रकारची कथानके रचून हा लेखक खुपविक्यांचा ‘किंग’ बनला. या लेखकाची अकथनात्मक पुस्तके सध्या ‘एआय’ (आर्टिफिशिअल इण्टेलिजन्स) तंत्रज्ञानाला ‘कथालेखन कसे करावे’ हे शिकवीत आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान या शिकवणीवर गोष्टी रचण्याचे शिको किंवा न शिको. किंग मात्र दरवर्षी एखादी कादंबरी घेऊन येण्याचा शिरस्ता मोडत नाही. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वेगातच त्याच्या कथानक इमारतीचे बांधकाम सुरू असते. या आठवडय़ात मंगळवारी त्याची ‘हॉली’ ही कादंबरी प्रकाशित झाली. तिच्या पुस्तक वितरणासाठी ऑनलाइन विक्री यंत्रणेचा जगभरातून जोर होता. अमेरिका-ब्रिटनसह भारतातही त्याचे चाहते प्रचंड संख्येने असल्याने इथल्या ग्रंथदालनांमध्ये आठवडाअखेरीपासून हे पुस्तक ऐटीत मिरवले जाणार आहे. त्यापूर्वी पायरसी जगताने मंगळवारी रात्रीच त्याची ‘ऑडियो’ आणि ई-बुक वायुवेगाने ‘महाप्रसादा’सारखी वाटण्यास सुरुवात केली. ‘हॉली गिबनी’ या डिटेक्टिव्ह पात्राला मुख्य व्यक्तिरेखा करणारी ही कादंबरी उग्र असलेल्या करोनाकाळातील संदर्भाना घेऊन लिहिली गेली आहे. ‘मिस्टर मर्सिडीज’ या तीन कादंबऱ्यांमध्ये हॉली ही दुय्यम व्यक्तिरेखा अत्यंत चलाख म्हणून समोर येते. पण ‘ओसीडी’ व्याधीने ग्रस्त असल्यामुळे घरकोंबडी-तुसडी हा तिचा स्वभाव प्रत्येक कादंबरीत कायम राहतो. ‘फाइण्डर्स कीपर्स’ या हरवलेल्या कुत्रे-मांजरी शोधणाऱ्या डिटेक्टिव एजन्सीचा आरंभ केल्यानंतर पुढे गुन्हे-गुन्हेगार आणि माणसे शोधण्यापर्यंत या संस्थेचा कार्याचा पसारा वाढतो आणि हॉली गिबनीच्या जबाबदाऱ्यांचाही. करोनाकाळात ‘मिस्टर मर्सिडीज’ ही मालिका लोकप्रिय झाली आणि हॉली गिबनी ही व्यक्तिरेखादेखील सिने-सीरिजने बिंजाळलेल्या लोकांमध्ये सुपरिचित झाली. तब्बल पाच कथानकांमध्ये दुय्यमपणा वाटेला आलेल्या हॉलीला प्रमुख करून किंगने आपल्या पुढल्या कादंबरीचा पायाही रचला असल्याचे ‘हॉली’ पुस्तकानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमधून समोर आले.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!

पंचाहत्तरीतही किंग कणखर शरीरमनाचा आहे. या वयात आपल्याकडील लेखकांसारखे वानप्रस्थाश्रमी छापाचे न प्रसवता समांतर काळाशी एकरूप लिहिण्याकडे त्याचा कल असतो. करोनाकाळात या ‘हॉली’च्या नव्या कथेची सुरुवात होते. करोनावर विश्वास नसलेल्या हॉलीच्या आईचा लस न घेतल्याने मृत्यू होतो. त्यानंतर अंत्यसंस्कारही ती ‘झूम’वरून आटोपते. काही दिवस सुट्टी घेण्याचा तिचा इरादा हरवलेल्या मुलीच्या शोधाची नवी मोहीम हाती आल्यानंतर बारगळतो. मग या शोधाच्या दरम्यान अघोरी कर्म करणाऱ्या दाम्पत्याची दिनचर्या हॉलीला पाहायला मिळते. अमेरिकेतील शहरगावांतील सांस्कृतिक-आर्थिक आणि सामाजिक ऱ्हासाच्या कहाण्यांत भूत-प्रेत-जारणमारणतंत्र खुबीने वापरत फॅण्टसीचा बादशाह म्हणून किंगची ओळख कैक वर्षे आहे. पुढेही राहणार यात शंका नाही. ‘हॉली’ खुपविक्या पुस्तकांची आंतरराष्ट्रीय यादी पुढले काही आठवडे गाजवणार आहे. बातमी ही नसून त्याने या पुस्तकाच्या निमित्ताने पुढल्या पुस्तकाचा काही तपशील उघड केला त्याची आहे. ‘हॉली’च्या डिटेक्टिव्ह एजन्सीत काम करणारे जेरोम आणि बार्बरा रॉबिन्सन हे नव्या पुस्तकात धडाडीच्या भूमिकेत आहेत. पण जेरोम या व्यक्तिरेखेला पुढल्या कादंबरीत आणखी महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आहे. सध्या ‘हॉली’च्या प्रसिद्धीत गर्क असलेला किंग ही कादंबरी पूर्ण करण्याच्या वाटेवर आहे. त्या कादंबरीचे नाव ‘जेरोम’ असेल काय? याबाबतचे वाचकांमधील रहस्य मात्र किंग कायम राखू इच्छित आहे.

अधिक वाचनासाठी..
हॉली कादंबरीनिमित्ताने रोलिंग स्टोनने घेतलेली किंगची मुलाखत.
https:// www. rollingstone. com/ culture/ culture- features/ stephen- king- interview- holly- anti- vaxxers-1234816605/
एआय तंत्रज्ञानावरील किंगने लिहिलेला लेख.
https:// www. theatlantic. com/ books/ archive/2023/08/ stephen- king- books- ai- writing/675088/