‘वेस्टर्न’ देमार चित्रपटांना अमेरिकी पश्चिम प्रांतावर (अमेरिकन वेस्ट) लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांनीच सगळा कच्चा माल पुरवला. लुई लामोर या लेखकाने या भागावर ८९ कादंबऱ्या, शेकडोंनी कथा उतरविल्या. साऱ्या ‘काऊबॉय’ आणि ‘काऊभाय’ लोकांच्या पिस्तूलफेकी कौशल्यांना सामावणाऱ्या ज्यांची ५०-६० च्या दशकातील सिनेरूपांतरे गाजली. जगातील लोकप्रिय लेखकांत लुई लामोर यांची आजही गणना होते, परंतु त्यांना या प्रांतातील सर्वोत्तम कादंबरीकार म्हणण्यास कुणीच धजावत नाही.

लुई लामोर यांच्याप्रमाणेच लॅरी मॅक्कमट्री यांनीदेखील याच कर्मभूमीवर कसदार कादंबऱ्यांची भरपूर निर्मिती केली. त्यांच्या आरंभीच्या काळात ‘मायनर रिजनल नॉव्हेलिस्ट’ अशी संभावना एका टीकाकाराने केली. पुढे ‘लोनसन डव्ह’, ‘लास्ट पिक्चर शो’सारख्या कित्येक डझन कादंबऱ्या आणि त्यांवरील चित्रपट गाजून, वर ‘ब्रोकबॅक माऊंटन’ चित्रपटाच्या पटकथेचा ऑस्कर पुरस्कार मिळवून उतारवयापर्यंत लॅरी मॅक्कमट्री यांनी आपल्यावरील टीका ‘बिरुद’ म्हणून मिरवली. थेट ‘मायनर रिजनल नॉव्हेलिस्ट’ लिहिलेले शर्ट छापून. ‘अमेरिकी वेस्ट’वर सक्षम कादंबऱ्या लिहूनही या दोन महान लेखकांच्या वाटेला त्या परिसरावर परमोच्च हुकमतीसह लिहिणारा साहित्यिक म्हणून कधीच मान्यता मिळाली नाही. पण ती केवळ काहीशा कादंबऱ्या लिहिणाऱ्या कॉरमॅक मॅक्कार्थी यांना समीक्षकांसह साहित्यवर्तुळाने बहाल केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनानंतर ‘ग्रेट रायटर ऑफ अमेरिकन वेस्ट’ या शीर्षकाच्या बातम्या आणि लघुलेखांचा जगभरच्या आंग्ल माध्यमांवर सुळसुळाट राहिला. या परमोच्च उपाधीने आधीच गौरव झालेल्या तसेच हरमन मेलविल आणि विल्यम फॉकनर या दिग्गजोत्तम अमेरिकी लेखकांच्या पंगतीत बसविल्या गेलेल्या लेखकाचा वकूब समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…

कॉरमॅक मॅक्कार्थी यांच्या कादंबऱ्या विरामचिन्हे नसलेल्या. म्हणजे पात्रांचा संवाद कुठे, कसा आणि काय होतो ते पडताळायला वाचकाला कष्टच पडायला हवेत. अर्धविराम हा निव्वळ मूर्खपणा आहे, असे जाहीरपणे सांगायला अजिबात न कचरणाऱ्या आणि मानसिक द्वंद्व किंवा जादूई वास्तववादाचा अंतर्भाव हे आपल्याला न उमजणारे कोडे आहे, असे सांगत त्या सर्व साहित्याला बाद करण्याची धमक दाखविणाऱ्या मॅक्कार्थी यांनी आपल्या तिरसटी व्यक्तिमत्त्वाला कायम जपले. मॅक्कार्थी यांचा लेखनकाळ पाहिला, तर अमेरिकी कथा जोरकसपणे जागतिक व्हायला लागलेल्या. कथालेखनाच्या खासगी कार्यशाळा आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमातून ‘फिक्शन’ शिकून लेखक म्हणून राष्ट्रीय कौतुक मिळविण्याचा प्रवाह रुजलेला असतानाचा. सत्यकथाकालीन राम पटवर्धनांचे अमेरिकी संपादक अवतार गॉर्डन लीश आणि रेमण्ड काव्‍‌र्हर यांच्या समकालातच मक्कार्थी यांची लेखणी चालली. पण आपल्या तंद्रगतीच्या मस्तीत. सडलेल्या, किडलेल्या आणि पोखरलेल्या अमेरिकी नागरिकांच्या कथा रेमण्ड काव्‍‌र्हरही सांगत होतेच. त्यापुढे जाऊन मॅक्कार्थी यांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये रसातळाला गेलेल्या पिढीच्या प्रतिनिधींना रंगविले.

‘ब्लड मेरिडियन’ या अठराव्या शतकातील कादंबरीत नेटिव्ह माणसे मारून त्यांचे टाळू जमवणारी टोळी. ‘चाइल्ड ऑफ गॉड’मधील हिंसोत्कट व्यक्ती. ‘नो कण्ट्री फॉर ओल्ड मेन’मधील अमली पदार्थाचा व्यवहार आणि पैशांच्या बाजारात फसणारा व्यक्तिसमूह पाहिला की याची प्रचीती येते. ऱ्होड आयलंड येथे जन्मलेल्या मॅक्कार्थी यांना कुटुंब टेनिसी प्रांतात स्थलांतरित झाल्यामुळे ‘अमेरिकन वेस्ट’चा परिचय झाला. अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्रातील विद्यापीठीय अपयशामुळे त्यांनी १९५३ साली वायुदलात नोकरी धरली. तीन वर्षांनी पुन्हा त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा घाट घातला. या दरम्यान विद्यापीठीय मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. ते त्यांचे पहिलेवहिले लेखन. पुढे दुसऱ्यांदा शिक्षण सोडून त्यांनी कादंबरी लिहिण्याकडे मन वळविले. सत्तरीच्या दशकात लेखनाचा आरंभ करून त्यांना जगन्मान्यता मिळत गेली, ती नव्वदीनंतरच. ‘नो कण्ट्री फॉर ओल्ड मेन’, ‘द रोड’ या गाजक्या चित्रपटांनी त्यांच्या सगळय़ा लेखनाची पुनर्मोजणी झाली. आपल्या कोणत्याही पुस्तकाची प्रसिद्धी करण्यापासून लांब राहणारा, कोणत्याही साहित्यिक समारंभाच्या जवळपासही न फिरकणारा असा शिरस्ता मॅक्कार्थी यांनी अखेपर्यंत पाळला. स्टीव्हन किंगपासून कित्येक लेखकांनी त्यांच्या मृत्यूनंतर मानवंदना दिली, यात मॅक्कार्थी किती मोठे लेखक होते, हे स्पष्ट होते.

Story img Loader