प्रसाद मोकाशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई ही इच्छापूर्ती करणारी नगरी.. गाव सोडून आलेल्या तात्याला इथे खरोखरच सारे मिळतेदेखील, पण इच्छा आणखी मिळवण्याची असते, तिथे मात्र कलाटणी मिळते..

मुंबई शहराची ओळख वेगवेगळय़ा प्रकारे करून देता येते. कुणी म्हणतात हे शहर कधीही झोपत नाही; कुणी म्हणतात या शहरामध्ये आलेल्या व्यक्तीला हे शहर भुलवते आणि चकवा लागल्याप्रमाणे या शहराच्या गर्दीत तो हरवून जातो. कोणी सांगतात की या शहरामध्ये कोणीही कधी भुकेला म्हणजे उपाशी राहत नाही. तर आणखी कोणी काही काही सांगत असतात. या शहराच्या दैनंदिन हालचालीची सर्वानाच भुरळ पडते यात शंका नाही. हे शहर प्रत्येकाला आपलेसे वाटते आणि जे काही व्हायचे आहे ते या शहरातच व्हावे असेही अनेकांना सतत वाटत असते. कदाचित म्हणूनच या शहरामध्ये आलेल्या प्रत्येकाला त्याच्या नजरेतून हे शहर भावते, आवडते किंवा नावडते आणि तो या शहराच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही.

या शहराच्या निर्मितीपासूनच अनेकांनी आपल्या नजरेतून मुंबईचा इतिहास, भूगोल, वास्तव-अभ्यासवजा ग्रंथांतून किंवा ललितरम्य कथाकादंबऱ्यांतून मांडला आहे. अनेक पुस्तके या शहरावर लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या आहेत. या शहराच्या प्रेमात अनेक जण पडले आहेत. तेजस्विनी आपटे-राह्म ही तरुण लेखिकाही या शहराच्या प्रेमात पडली आणि तिने तिच्या आजी-आजोबांच्या काळातल्या एका व्यक्तिरेखेची निर्मिती केली. यातूनच तिला एका कादंबरीचे सूत्र मिळाले आणि या शहराच्या स्वप्नवत दुनियेचा प्रवास रेखाटला. त्या प्रवासात, या शहराच्या बदलाचे वास्तव दाखवितानाच या शहरातील व्यक्तींची स्वप्नेही लेखिकेने दाखवली आहेत. एके काळी ‘गिरण्यांचे शहर’ म्हणून ओळखले गेलेले हे शहर आता कॉर्पोरेट, झगमगत्या मायावी दुनियेतील शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील लोकांचे जीवनमान बदलत कसे गेले आणि त्यांची स्वप्ने जशी साकारली तशीच ती उद्ध्वस्त कशी झाली हे या कादंबरीमधून वाचायला मिळते आणि या कॅलिडोस्कोपिक शहराची ओळख आपल्याला नव्याने होते.

जवळपास शतकाच्या या शहराच्या आणि तेथील जनतेच्या जीवनाची ओळख करून देणाऱ्या या कादंबरीची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी होते. १८९९ चा काळ. जेव्हा या शहरात कापूस िपजून सोन्याची निर्मिती होत होती. धनगढ (एक काल्पनिक शहर) येथून दोन भाऊ मुंबईतल्या मुळजी जेठा मार्केटमध्ये एका शेठजीच्या पेढीवर कामाला लागतात. तात्या हा अवघा १७ वर्षांचा तरुण आपल्या मोठय़ा भावासह मुंबईच्या या मोहात पाडणाऱ्या शहरात येतो तेव्हा त्याच्याही डोळय़ांत या शहराची चमक येते. आपल्या हुशारीच्या जोरावर तात्या एके दिवशी आपल्या मालकाचा चांगलाच फायदा करून देतो आणि त्याच्या स्वप्नांच्या वास्तवतेला सुरुवात होते. तो आपल्या अक्कलहुशारीवर स्वतंत्र व्यवसाय सुरू करतो. हळूहळू त्याचा धंद्यात जम बसतो आणि त्याची व्यावसायिक मंडळींमध्ये ऊठबस सुरू होते. तात्याचा उत्कर्ष सुरू होतो तेव्हाच मुंबईचे स्वरूपही बदलू लागलेले असते. स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागलेले असतात. तात्या या सर्वातून तावून सुलाखून निघत असतो. त्याच वेळी तात्याचे वैवाहिक जीवनही भरात असते. त्याची पत्नी राधा त्याला जीवनातील विविध आव्हाने स्वीकारायला मदत करते आणि त्याला यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिकास आणते. पारंपरिक वळण टिकवून आधुनिकतेकडे वेगाने जाणाऱ्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व तात्याचे कुटुंब करत असते. तात्याची ऊठबस केवळ व्यावसायिकांमध्येच नाही तर विविध क्षेत्रांतील मंडळींमध्ये होऊ लागते.

कापडउद्योगातील यशस्वितेनंतर तात्याला अन्य क्षेत्रेही खुणावू लागतात. पण त्याची पत्नी त्याला त्यातील खाचखळगे दाखवत असते. पण त्याच वेळी त्याला काही जणांकडून चित्रपट व्यवसायात गुंतवणूक करण्याबाबत सुचवले जाते. तात्या त्याविषयी माहिती घेतो आणि चित्रपट व्यवसायामध्ये आपले नशीब अजमाविण्याचा प्रयत्न करतो. त्या काळात चित्रपट व्यवसाय हा नवा असतो. त्यात यशस्वितेचे गणित जमवणे अवघड असते. मूक चित्रपटांच्या जमान्यात तो थोडा बावचळतो, पण कुटुंबाच्या पाठिंब्याच्या आणि त्याच्या अक्कलहुशारीच्या जोरावर त्यात तो यशस्वीही होतो. त्याच्या नव्या चित्रपटनिर्मिती कंपनीवर लोकांच्या उडय़ा पडतात आणि त्याचे चित्रपट लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरतात. पण त्याच वेळी तो चित्रपटातील नायिकेच्या प्रेमात पडतो आणि दुसरा संसार थाटू लागतो. पण ते अळवावरचे पाणी असते. त्याच्या चित्रपटाची नायिका कमल हिच्यावरील प्रेमामुळे त्याच्यावरचा सर्वाचा विश्वास उडतो आणि त्याचे सारे जग हादरते. त्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहू लागते. दुसऱ्या प्रेमामध्ये आंधळा झालेल्या तात्याचे आर्थिक गणित कोसळते आणि तात्या पुन्हा आपल्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये येतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

या मोहमयी शहराचे हेच वैशिष्टय़ असते. स्वप्ने रंगवली जातात, वास्तवात येतात आणि तशीच ती पुन्हा स्वप्नांच्या पातळीवरच येतात. मुंबई आणि त्या शहरातील व्यक्तींचे जीवनसार सांगणारी ही कथा तरुण लेखिका तेजस्विनीने त्या काळच्या एकेका तारखेचा संदर्भ घेत, तपशीलवारपणे अप्रतिम रेखाटली आहे.

मूळची मुंबईचीच असलेली तेजस्विनी लहान मुलांसाठी लिहिण्यात आलेल्या पर्यावरणविषयक शैक्षणिक पुस्तकाची सहलेखिका आहे. पर्यावरण संशोधक आणि पत्रकार म्हणून ओळख असलेल्या या लेखिकेने जगप्रवास केला आहे. सिंगापूर आणि इंग्लंडमध्ये तिने शिक्षण घेतले असून सर्बिया, इस्रायल, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, बांगलादेश आणि फिजी या देशांमध्ये तिचे वास्तव्य झाले आहे. सध्या अझरबैजानमध्ये राहात असलेल्या तेजस्विनीची ही पहिलीच कादंबरी आहे. अनेक लहान कथांची पुस्तके लिहिलेल्या तेजस्विनीची ही पहिलीच स्वतंत्र कादंबरी असूनही, इतका नवखेपणा तिच्या कादंबरीमध्ये आढळत नाही. ही कादंबरी मुंबईकर वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असे वाटते.

द सीक्रेट ऑफ मोअर

लेखिका : तेजस्विनी आपटे-राह्म

प्रकाशक : अलेफ बुक कंपनी

पृष्ठे : ४५१, किंमत : ९९९ रु.

prasad.mokashi@expressindia.com