जेम्स बाँडचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला १९६२मध्ये. तो ज्या १९५० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकावर आधारित होता, ते पुस्तक तोवर कालबाह्य वाटू लागले होते. तेव्हापासून पुढे प्रत्येक बाँडपट पुस्तकापासून दूर जात राहिला. आता बाँडपटांचे हक्क अॅमेझॉनने विकत घेतले आहेत. त्यामुळे या लोकप्रिय पात्राचे व्यापारीकरण होणार हे निश्चित,’ हे मत आहे ब्रिटिश हेरकथा लेखक विलियम बॉइड यांचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज ज्यांना जेम्स बाँडचे मूळ पात्र समजून घ्यायचे असेल, त्यांना इयान फ्लेमिंग यांची पुस्तकेच वाचावी लागतील. कारण त्यावर आधारित चित्रपट हे जगभर प्रदर्शित होणारे थरारपट आहेत. साहजिकच त्यात लांबलचक संवाद असणे शक्यच नाही, असे बॉइड यांचे मत आहे. यापुढे बाँडपटांचे लेखन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने केले जाईल का, याविषयी बॉइड सांगतात, ‘एआयचे तंत्र केवळ एक साचेबद्ध कथा लिहू शकते. त्याच्या सहाय्याने रोमकॉम लिहिणे शक्य आहे. वर्षभरापूर्वी मी हे तंत्र वापरून पाहिले तेव्हा ते पूर्णपणे निरुपयोगी असल्याचे दिसले. अर्थात भविष्यात कदाचित एआय अधिक सक्षम होईल आणि त्यातून काहीतरी चांगले हाती लागेल, अशी आशा आहे. मात्र गंभीर साहित्याच्या जवळपास पोहोचणे एआयला कठीणच जाईल, असेच सध्या तरी दिसते. गुंतागुंतीचा मानवी स्वभाव, त्यातील वैविध्य, वैचित्र्य यातूनच वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्माण होऊ शकते.’

बॉइड हे पटकथा लेखक आणि कादंबरीकार आहेत आणि त्यांनी ‘सोलो’ हे जेम्स बाँडवर आधारित पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक खास ठरते कारण त्यात बाँड ६०च्या दशकाच्या उत्तरार्धातील बदलत्या राजकारणाशी झुंजताना दिसतो. त्यात पश्चिम आफ्रिकेतील परिस्थितीचेही प्रतिबिंब आहे. बॉइड यांचे बालपण नायजेरियात गेले असल्यामुळे यातील वर्णने अधिक परिणामकारक ठरतात.

अॅमेझॉनने हक्क खरेदी केल्याच्या मुद्द्यावर बॉइड म्हणतात, ‘उद्या कदाचित बाँडचे आफ्टरशेव्ह येतील, डिनर जॅकेट्स येतील, त्याच्या नावाची व्होडका येईल, बाँड या संकल्पनेवर आधारित थीम पार्क आणि नाइट क्लब्जही स्थापन होतील. अब्जावधी रुपयांना खरेदी केलेल्या या पात्रातून लाभ मिळविण्याचे शक्य ते प्रयत्न नवे मालक करणारच.’ एकंदर यातून बाँड या लोकप्रिय पात्राचे व्यापारीकरण होणार असल्याचे बॉइड निदर्शनास आणतात.

बुकनेट : मुंबईदिल्लीचे पुस्तक पर्यटन…

भारत आणि इथले पुस्तकविश्व जगामध्ये ‘पायरसी किंग’ या नावाने बदनाम. कारण कुठल्याही आंतराष्ट्रीय बेस्टसेलरला तातडीने रस्त्यावरच्या पुस्तक व्यवहारात स्थान मिळते. लोकसंख्येतील अगदी त्रोटक टक्का पुस्तक खरेदी करीत असला तरी ती संख्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनगृहांना मोठी वाटते. पहिला व्हिडीओ ‘कार्ल रॉक’ या प्रसिद्ध भटकबहाद्दराने मुंबईच्या हुतात्मा चौकाजवळील पुस्तक बाजारावर मारलेल्या शेऱ्याचा. तर दुसरा दिल्लीमधील पुस्तक दुकानाची सहल करणाऱ्या जेन-झी पिढीच्या ‘व्लॉगर’चा. या मुलीचे पुस्तकभटकंतीचे आणखी चांगले व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनलवर सापडतील.

https://tinyurl.com/bdhkjyeu

https://tinyurl.com/bdz57aa3

जेन ऑस्टेन : नवे तपशील…

यंदा ब्रिटिश कादंबरीकार जेन ऑस्टेन यांचे २५० वे जन्मवर्ष जगभरात जोमात साजरे होत आहे. त्यात जिल हॉर्नबी (निक हॉर्नबी यांची भगिनी) यांच्या जेन ऑस्टेनवरील कादंबरीवर आधारित टीव्ही मालिकाही सध्या पाहिली जात आहे. ही जिल हॉर्नबी यांची मुलाखत. जेन ऑस्टेन यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांसह इतरही अधिक नवी माहिती पुरवणारी.

https://tinyurl.com/mavhk8ba

महिला दिन विशेष लेख…

चेन हुई पूर्व चीनमधील प्रांतात दिवसा किराणा आणि गृहोपयोगी वस्तूंचे सायकल-स्कूटरवरील फिरते दुकान सांभाळणारी विक्रेती. शहरभर फिरून घरी आल्यानंतर उरणाऱ्या वेळेत लेखन करणारी. तिची प्रकाशित पुस्तके इंग्रजीत अद्याप तरी आली नाहीत. मात्र करोनानंतरच्या काळात तिचा लेखनप्रवास मात्र जगाला कळला. आजच्या महिला दिनानिमित्त तिचा लेखनप्रवास.

https://tinyurl.com/4u4fambr