रवींद्र कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
योम किप्पुरच्या लढाईत इस्रायलला मदत करणाऱ्या डबल एजंटबद्दल किती जणांना माहीत असते?
इंटेलिजन्स फेल्युअरचा अर्थ हेरखात्याकडे माहिती नसते वा चुकीची असते असा नसून राजधानीतल्या धोरण ठरवणाऱ्या राजकीय धुरीणांना आपले म्हणणे पटवून देण्यात त्यांना आलेले अपयश असा आहे. वर्तमानात गाझामधून इस्रायलवर झालेल्या हल्ल्याबद्दल असेच घडले असण्याची शक्यता मोठी आहे. ज्या योम किप्पुर लढाईच्या ५० व्या वर्षी हा कल्लोळ सुरू झालेला आहे त्या युद्धातही असेच घडले होते. २००९ साली उघड केलेल्या सीआयएच्या कागदपत्रात म्हटले आहे की युद्ध होईल हे सांगणारी पुष्कळ माहिती हेरखात्याकडे होती, पण त्यावरून काढलेल्या चुकीच्या निष्कर्षांमुळेच १९६७ युद्धात जिंकलेल्या प्रदेशावर पाणी सोडायची वेळ इस्रायलवर आली आणि या देशाचे २५०० सैनिक मरण पावले. असे इतिहासात अनेकदा झाले आहे. कायम तारेवरची कसरत करत जगणाऱ्या इस्रायलसारख्या देशांचे या बाबतीतले यश आणि अपयश दोन्ही टोकाचे असते. अशा परिस्थितीत समजा शत्रुराष्ट्राच्या अध्यक्षांचा जावईच हेर असेल तर त्या घडामोडी वाचणे नक्कीच आकर्षक असते. ‘द एजंल’ हे उरी बार जोसेफ यांचे पुस्तक असेच आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध: रोझ लेके
२७ जून २००७ रोजी दुपारी अश्रफ मरवान हा अतिश्रीमंत इजिप्शियन उद्योगपती लंडनमधल्या कॅल्र्टन हाऊस या राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मरण पावला. काही लोकांनी त्याला उडी मारताना पाहिले होते. त्याने उडी मारली की त्याला तसे करण्यास भाग पाडले गेले, त्या वेळी त्याच्या घरात आणखी कोणी होते की नाही, याविषयी संदिग्धता आहे.
मध्यमवर्गीय असलेल्या अश्रफ मरवानने गमाल अब्देल नासेर या इजिप्तच्या सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्राध्यक्षाच्या मुलीशी लग्न केले होते. नासेरला हे लग्न मान्य नव्हते, पण सलाउद्दीननंतरचा सर्वशक्तिमान समजला जाणारा हा राष्ट्राध्यक्ष मुलीपुढे झुकला. नासेरने अश्रफ मरवानला आपला जावई म्हणून स्वीकारले, पण त्याला विशेष वागणूक दिली नाही. नासेरपुढे काही बोलायची अश्रफची हिंमतही नव्हती. नासेरने त्याला, शमी शरीफ या आपल्या अंतर्गत सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये काम दिले. त्याच्यावर लक्ष राहील, हा हेतू होताच. तिथे अश्रफ सहाव्या दर्जाचा अधिकारी होता. तेथे त्याला फारसा पगार नव्हता. सर्वशक्तिमान सासरेबुवा व आपल्यावर लक्ष ठेवणारा त्यांचा खमक्या अधिकारी यांच्या हाताखाली अश्रफ गुदमरू लागला. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी पत्नीसह लंडनला जायचा आग्रह त्याने नासेरकडे धरला. वडील परत मुलीपुढे झुकले. अश्रफ लंडनमध्ये वाहवत गेला. तिथे त्याने केलेले कर्ज कतारच्या राजघराण्याने फेडले. ही बातमी समजताच नासेरने त्याला परत बोलावून ते पैसे ताबडतोब परत करायला लावले व मुलीस घटस्फोटाचा सल्ला दिला. तो तिने धुडकावून लावला. शेवटी नासेरने अश्रफला केवळ परीक्षा देण्यासाठी अध्येमध्ये लंडनला जाण्याची परवानगी दिली. पण त्याच्या दुर्गुणाबरोबरच त्याचे काही गुणदेखील नासेरच्या नजरेस आले. त्यामुळे जावयाला तो अधूनमधून राजकीय वाटाघाटींत सामील करून घेऊ लागला.
१९७० मध्ये नासेरच्या मृत्यूनंतर अध्यक्ष बनलेल्या अन्वर सादात यांनी अश्रफला आणखी जवळ केले. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने बहर आला. त्याच्याकडे पैसे मिळवून देऊ शकेल अशी माहिती गोळा होत होती. अश्रफने लंडनमधील इस्रायलच्या दूतावासात प्रत्यक्ष जाऊन पैशांच्या बदल्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तो नासेरचा जावई असल्याने इस्रायलने सावध भूमिका घेतली. कारण हा सापळा असण्याचीही शक्यता होती. बराच खल झाल्यावर मोसादने धोका पत्करायचे ठरवले.
हेही वाचा >>> चिंतनधारा: सत्ता की आयु न बडमी..
१९७३ चे योम किप्पुरचे युद्ध हा अश्रफच्या कारकीर्दीचा कळस असे म्हटले पाहिजे. इस्रायलच्या दोन संस्थांवर माहिती गोळा करण्याचे काम असते. पहिली मोसाद, जी सर्व परदेशी घडामोडींवर लक्ष ठेवते व पंतप्रधानाच्या अखत्यारीत येते. दुसरी लष्करी गुप्तचर यंत्रणा. यात शत्रूच्या लष्करी हेतू व हालचालींची माहिती गोळा करण्याचे काम असते. या दोन्हींमधल्या संवादाची जबाबदारी युनिटला ११ ला दिली गेलेली होती. ऑगस्ट १९७० मध्ये मोसादबरोबर अश्रफ मेरवानची पहिली भेट झाली. १९६७ च्या पराभवानंतर इजिप्तच्या मनात काय आहे याचा माग मोसादला काढायचा होता. त्यासाठी अश्रफने दिलेल्या माहितीचा मोसादला बराच उपयोग झाला. इजिप्तच्या इतर अरब देशांबरोबर कोणत्या वाटाघाटी सुरू आहेत हेही इस्रायलला समजू लागले. अर्थात अश्रफ मेरवानकडून मिळणारी माहिती दुसरीकडून तपासली जात असे. या सगळय़ावर इस्रायलने १० लाख डॉलर्स खर्च केले.
इस्रायलवरच्या हल्ल्याच्या वेळी इजिप्शियन सेना सुवेझ कालवा कसा ओलांडणार आहे, पलीकडच्या किनाऱ्यावर कोणत्या तुकडय़ा असणार आहेत, त्यांचे प्रमुख कोण कोण असणार आहेत, युद्धाच्या वेळी सोव्हिएत रशियाची काय भूमिका असणार आहे, त्यांनी किती लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे इजिप्तला दिली आहेत, इजिप्तने त्यांच्याकडे कुठल्या शस्त्राचे किती सुटे भाग मागवले आहेत, इतर अरब राष्ट्रांबरोबर त्यांची काय बोलणी सुरू आहेत इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे अश्रफने त्यांना मिळवून दिली. ती बरोबर होती, पण त्याने हल्ल्याच्या दिलेल्या पहिल्या दोन तारखा मात्र खोटय़ा ठरल्या. असे असताना त्यानेच दिलेल्या तिसऱ्या तारखेला हल्ला झाला. युद्ध सुरू झाल्यावर इस्रायलला मोठे फटके इजिप्त व सीरियाच्या नेतृत्वाखाली गोळा झालेल्या अरब सेनेने दिले. शेवटी इस्रायलचा वेग व नशीब दोन्ही कामाला आले. या गोंधळाचे एकमेव कारण म्हणजे मिलिटरी इंटेलिजन्सचा प्रमुख मेजर जनरल इली झैरा. त्याचा स्वत:कडे असलेल्या माहितीवरच विश्वास नव्हता. त्याने काढलेल्या निष्कर्षांवर पंतप्रधान गोल्डा मायपर्यंत साऱ्यांनी विश्वास ठेवला. मेजर जनरल इली झैराची नंतर चौकशी झाली आणि त्याला राजीनामा द्यावा लागला.
अश्रफ मेरवान पुढे जवळपास २० वर्षे इस्रायलच्या संपर्कात होता. त्याने काही कंपन्या स्थापून व बहुधा शस्त्रांच्या व्यापारातून गडगंज पैसे मिळवले. इस्रायलला नंतर तो जी माहिती देत राहिला, त्याचे पैसेही त्याने घेतले नाहीत. त्याच्या हेरगिरीबद्दल मोसादच्या अगदी मोजक्या अधिकाऱ्यांना माहीत होते. कोणी तरी ३० वर्षांनंतर अश्रफ मेरवानबद्दल जाहीररीत्या बोलायला व लिहायला सुरुवात केली, ज्याची परिणती त्याचा जीव जाण्यात झाली. ती बोलणारी व्यक्ती कोण होती व तिचे हेतू काय होते, हे पुस्तक वाचल्यावरच समजेल. त्याचा मृत्यू हा अपघात होता, आत्महत्या होती किंवा खूनही असू शकेल अशी हास्यास्पद मांडणी स्कॉटलंड यार्डने केली. चौकशीअंती तो खून किंवा आत्महत्या होती या निष्कर्षांवर ते आले. नंतर त्याची फाइल बंद झाली. त्याच्या जीवनाप्रमाणे त्याचा मृत्यूही गूढ ठरला. त्याच्या दफनविधीला इजिप्तमधल्या मान्यवर व्यक्तीही उपस्थित होत्या. तो डबल एजंट होता का, त्याने इस्रायलला हल्ल्याच्या पहिल्या दोन खोटय़ा तारखा मुद्दामून दिल्या होत्या का या प्रश्नांची उत्तरे कोणालाच माहीत नाहीत.
इस्रायलचाच ली कोहेन, ब्रिटिश अधिकारी किम फिल्बी, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन पत्रकार रिचर्ड सोर्जे आणि लिओपोल्ड ट्रेपर या विसाव्या शतकातल्या गाजलेल्या हेरांच्या नामावलीत अश्रफ मेरवानचे नाव घ्यायला हवे.
द एजंल लेखक : उरी बार जोसेफ प्रकाशक : हार्पर कॉलिन्स इंडिया पृष्ठे : ४००; किंमत : ४९९ रुपये
kravindrar@gmail.com