हल्ली निवडणूक आली की प्रकाशकांचाही जणू ‘सीझन’ सुरू होतो.. देशातल्या आणि राज्योराज्यीच्या नेत्यांची चरित्रं/ आत्मचरित्रं किंवा या नेत्यांनी स्वत: काही लिखाण केलं असल्यास त्याची संपादित पुस्तकं, भारतीय निवडणुकांविषयीची पुस्तकं किंवा मग त्या-त्या राज्यातल्या राजकारणाविषयीची पुस्तकं असं साहित्य प्रकाशित करून बाजारात आणण्याचा हंगाम निवडणुकांच्या आधीच्या काळात जोरात असतो. यापैकी अनेक पुस्तकं निवडणुकीनंतर विस्मृतीतही जातात- पण म्हणून ती अनावश्यक नसतात! उदाहरणार्थ, जानेवारी २०१५ मध्ये- म्हणजे आसाम विधानसभेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या हंगामात त्या वेळचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आत्मचरित्र हार्पर कॉलिन्स इंडियानं प्रकाशित केलं. मात्र २००१ ते २०१६ असा दीर्घकाळ आसामचं नेतृत्व करणारे- विकाससुद्धा करणारे गोगोईच या निवडणुकीनंतर विस्मृतीत गेले. त्यांच्या पुस्तकाला आज संदर्भमूल्य आहेच.. हिमंत बिस्वा सरमा किंवा त्यांच्याआधीचे सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वापेक्षा गोगोईंचं नेतृत्व किती/ कसं निराळं होतं, हे त्या पुस्तकातून दिसेल.. कुणी पाहिलं तरच!

आता यंदाच्या हंगामात, राजस्थानच्या १९४७ पासूनच्या राजकारणाचा साद्यंत आढावा घेणारं पुस्तक ‘मॅकमिलन’ या प्रकाशनगृहातर्फे येतंय. दि इंडियन एक्स्प्रेसचे जयपूरमधले पत्रकार दीप मुखर्जी आणि मुक्त पत्रकार असलेल्या तबीना अंजुम या दोघांनी मिळून ते लिहिलं आहे. तबीना या मूळच्या जम्मू-काश्मीरच्या आणि राजकीय पत्रकारितेच्या दिल्लीतल्या अनुभवानंतर आता राजस्थानात- जयपूरमध्येच सहकुटुंब स्थायिक झालेल्या. दीप मुखर्जी यांनी आजवर केवळ राजकीय पत्रकारिता न करता, सरकारला अडचणीत आणू शकतील अशा सामाजिक अत्याचारांच्या बातम्याही उघड केल्या आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा आलेख ते कुठल्याही पक्षाकडे झुकलेले नसल्याची खात्री पटण्यास पुरेसा आहेच, पण त्यांच्या अभ्यासूपणाचीही साक्ष देणारा आहे. मात्र पुस्तक प्रत्यक्ष प्रकाशित होण्यासाठी जानेवारी २०२४ उजाडेल, असं प्रकाशकांचं म्हणणं आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Traditional political opponents Shankar Jagtap and Rahul Kalate are fighting for fourth time in Chinchwad Assembly Constituency
‘या’ मतदारसंघात पारंपरिक विरोधकांतील चौथी लढत अस्तित्वाची
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
rahul gandhi rally in gondia maha vikas aghadi
Gondia Assembly Election 2024 : गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?
maharashtra assembly Election 2024 shekap fights for survival alibag assembly constituency
अलिबागमध्ये शेकापची प्रतिष्ठा पणाला
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
pune samyukta Maharashtra movement
त्यागी लोकप्रतिनिधी आणि पदनिष्ठ राजकारणी

राजस्थानबद्दल अशा पुस्तकाची गरज होतीच. एक तर या राज्याच्या राजकारणात जातींचा पगडा गेल्या काही वर्षांत (उदा.- १५ वर्षांपूर्वी प्रखर झालेला मीणा-गुज्जर वाद) दिसू लागला. ‘दोनच पक्ष- तेही आलटून पालटून’ हे वैशिष्टय़ मात्र राजस्थाननं कायम ठेवलं. यापूर्वी- म्हणजे १९६७ मध्ये के. एल. कमल यांचं ‘स्पॉटलाइट ऑन राजस्थान पॉलिटिक्स’ हे दीडेकशे पानांचं अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झालं होतं, त्याचा भर जयपूरवरच असला तरी ‘स्वातंत्र्यपूर्व काळात राजपुतान्यातली सारीच संस्थाने काँग्रेसी राजकारणाला थारा न देणारी असल्याने १९४७ नंतर इथली परिस्थिती निराळी होती’ यासारखं पायाभूत निरीक्षण त्यात सापडतं. पहिल्या वीस वर्षांत काँग्रेसनं या राज्यात कसा जम बसवला, यावरच त्या पुस्तकाचा भर असणं स्वाभाविक होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे ती का बदललली आणि कसकशी बदलत गेली, हे दीप मुखर्जी आणि तबीना अंजुम यांच्या पुस्तकातून कळेल! राजस्थानसाठी २०२४ ची निवडणूक अनेकार्थानी महत्त्वाची आहे, तिच्या आधीच हे पुस्तक वाचकांहाती येईल.