अ‍ॅनी टेलर ही ८३ वर्षांची लेखिका. गेली चार-पाच दशके अमेरिकी मध्यमवर्गाच्या जगण्यावरील कादंबऱ्या लिहिते. अमेरिकी राजकारण हा तिच्या लेखनातून (मुलाखतींतूनही) कायम वर्ज्य असलेला भाग. नुकत्याच आलेल्या तिच्या २५ व्या पुस्तकानिमित्ताने ‘द गार्डियन’ने घेतलेल्या मुलाखतीत तिने ‘निवडणुकीनंतर आलेल्या नैराश्या’चा संदर्भ आणलाय. बाकी तिच्या पाचेक कादंबरी संकल्पाबाबत आणि जगण्याबद्दल वाचनीय तपशीलदेखील सापडू शकेल.

https://tinyurl.com/yzuw8fbv

एक दुर्लक्षित मुलाखत

दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना नोबेल मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचंड संख्येने मुलाखती झाल्या. ही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नोेबेल पारितोषिकानंतर स्टॉकहोममध्ये घेण्यात आलेली. सहा दिवसांपूर्वी अधिकृतरीत्या, ती प्रकाशित झाली. हा उल्लेख यासाठी की सुमार यूट्यूबर्स आणि इन्फ्लूअन्सर्सदेखील दिवसाला लाखांत प्रेक्षक मिळवत असताना ही मुलाखत आठवड्यात जगभरातील फक्त १८ हजार जणांनीच पाहिली आहे.

https://tinyurl.com/3f7kc2wd

जेनझीचा ग्रंथसंग्रह…

ब्रिटन – अमेरिकेमध्ये ‘बुक्स ऑन बुक्स’ म्हणजेच पुस्तकांविषयीच्या पुस्तकांची कमतरता कधीच नव्हती. त्यामुळे दरएक पिढीमध्ये ग्रंथांच्या पहिल्या आवृत्त्या जमविण्याचे महत्त्व आपसूक झिरपले गेले. हा लेख ‘जेनझी’ पिढीचे ग्रंथसंग्रह- वेड गाण्यांच्या तबकड्या जमवण्यासारखा कसा होता त्यावर. आपल्याकडे पुस्तकांवरील पुस्तके येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. पण काय हे असे चित्र जेनझीबाबत होईल काय?

https://tinyurl.com/398ysmnf

नोबेल-मानकरी… बहुचर्चित कादंबरी!

अब्दुलरझाक गुर्ना हे मूळचे टांझानियाचे, पण उच्चशिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेले आणि तिथलेच झालेले लेखक. त्यांना २०२१ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले, त्यानंतर ‘डॉटी’ या त्यांच्या जुन्या कादंबरीची नवी आवृत्ती आली; आणखी दोन कादंबऱ्यांचे अनुवाद स्वाहिली भाषेत प्रकाशित झाले… पण ‘नोबेल’नंतरची नवी कादंबरी गेल्या चार वर्षांत आली नव्हती, ती आता येते आहे. ‘थेफ्ट’ या कादंबरीच्या प्रती १८ मार्चपासून मिळू लागतील. झांजिबारमध्ये घडणारी, दोन तरुण आणि एक तरुणी यांची आयुष्ये आणि त्यांतले टप्पे मांडणारी. वसाहतकाळाचे थेट चटके भोगण्यापासून ही नवी पिढी अलिप्त राहू शकली असली, तरी वसाहतवादाचे ओरखडे अद्याप अवतीभोवती आहेत, हे या कादंबरीचे सूत्र. न्यू यॉर्क टाइम्समध्ये मुलाखत, वॉशिंग्टन पोस्टमध्ये कादंबरीबद्दल दीर्घ परिचयलेख, ब्रिटनमध्ये तर अगदी ‘ईव्हिनिंग स्टॅण्डर्ड’ कडूनही दखल, अशी पाश्चात्त्य देशांत या कादंबरीची चर्चा आहे. या निमित्ताने गुर्ना हे ‘सेलेब्रिटी’ आहेतच, असे मानून त्यांच्याशी झालेली ही झटपट प्रश्नोत्तरे

https://tinyurl.com/59xafxda