बी. एन. गोस्वामींच्या नावातली ‘बीएन’ ही अक्षरं ब्रिजेन्द्रनाथ या त्यांच्या नावाची आहेत, हे त्यांच्या मृत्यूनंतरच अनेकांना कळलं असणार. या नावाचा संबंध कृष्णलीलांच्या व्रजभूमीशी आहे आणि ती भूमी किती प्राचीन हे सांगायला नकोच. गोस्वामींची कर्मभूमी असलेलं चंडीगढ मात्र नव्यानं वसवलं गेलेलं (तेही फ्रेंच वास्तुविशारदाकडून वगैरे) शहर.. या शहराचा सांधा प्राचीन कलाप्रवाहांशी जोडण्यात गोस्वामींचा मोठा वाटा होता. चंडीगढच्या पंजाब विद्यापीठातलं कला संग्रहालय गोस्वामींमुळे नावारूपाला आलं. राज्यस्तरीय ललित कला अकादम्या अनेक आहेत, पण पंजाबच्या ललित कला अकादमीचं नाव संशोधनासाठी अधिक झालं ते गोस्वामींच्या अनेक शिष्यांमुळे. गोस्वामी यांनी किमान २७ पुस्तकं, भारताच्या दृश्यकला-वारशाबद्दल लिहिली. त्यातही चित्रांबद्दलची पुस्तकं अधिक, हे विशेष. कारण प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अभ्यास पुरातत्त्वशास्त्राच्या अंगानं होतो आणि त्याला कलेतिहास म्हणूनही मान्यता मिळते. पण हातात धरून पाहाता येण्याजोगी (या चित्रांना ‘लघुचित्रं’ म्हणून ओळखलं जातं, पण गोस्वामींना या शब्दानं चित्राच्या आशयावर अन्याय होतो असं वाटे, म्हणून ‘हॅण्ड हेल्ड पेंटिंग्ज’) चित्रं कागद अथवा कापडावर रंगवण्याच्या कितीतरी शैली भारतात सोळाव्या शतकापर्यंत विकसित झालेल्या होत्या. या चित्रांचे चित्रकार मात्र अज्ञात होते, किंवा चित्रावर कुठंतरी नावाचा उल्लेख असूनही त्या गतकालीन चित्रकारांना स्वत:ची अशी काही ओळखच नव्हती.. ही ओळख मिळवून देण्याचं काम पहिल्यांदा बी.एन. गोस्वामी यांनी केलं. ते कसं?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा