‘आनंदनाम संवत्सर’ २६ ऑक्टोबरपासून सुरू झाले, त्याच दिवशीपासून गुजरातच्या मोरबी या जिल्ह्याच्या ठिकाणी संस्थानी काळापासून असलेला पूल ‘दुरुस्तीनंतर’ पुन्हा खुला करण्यात आला. चारच दिवसांनी त्यावर १४० बळी जाणे अनपेक्षित होते हे निश्चित. पण मग प्रशासनाला काय अपेक्षित होते? हा पाच फुटांहूनही कमी रुंदीचा आणि २३३ मीटर लांबीचा, १४३ वर्षांपूर्वी तत्कालीन संस्थानिक वाघजी ठाकोर यांनी बांधून घेतलेला हा पूल ‘पर्यटकांचे आकर्षण’ म्हणून ओळखला जात होता, दुरुस्तीनंतर तर पुलावर जाण्यासाठी तिकीट विक्री करण्यात येत होती, मग फार तर १२५ जणांचे वजन पेलू शकेल अशा या पुलावर एकाच वेळी २५० हून अधिक जणांनी जाणे कुणाला अपेक्षित होते? हा दोष खासगी कंत्राटदाराच्या माथी मारला तरी, गर्दीचे नियोजन हीदेखील कंत्राटदाराचीच जबाबदारी असल्याचा उल्लेख करारामध्ये तरी होता का? यापूर्वी पश्चिम बंगालातला पूल कोसळताच भ्रष्टाचाराचा आरोप करणारे नेते या गुजराती कंत्राटाबद्दल पारदर्शकतेचा आग्रह कितपत धरतील? ‘पूल वापरास योग्य असल्याचे प्रमाणपत्र दुरुस्तीनंतर मिळाले नव्हते’ हा तपशील कुणाला किती अस्वस्थ करणार, हे राजकीय रंगांवरूनच ठरणार का? अखेर ‘काही तरुणांनी पूल जोरजोराने हलवण्याचा प्रयत्न केला’ हे एवढय़ा मोठय़ा दुर्घटनेचे कारण ठरू शकते याची कल्पनाच कुणाला नव्हती? की ज्या गुजरातने ‘दिवाळीचे सर्व दिवस, वाहतूक-नियम शिथिल’ केले होते, तिथे दिवाळीनंतर या ऐतिहासिक पुलाशी वाट्टेल तसे प्रकार करण्याचीही अलिखित मुभा होती? एरवी एखादा पूल कोसळला की लष्कराला नागरी कारणांसाठी राबवून, ‘१६ दिवसांत नवा पूल उभारला’ याचे श्रेय घेण्यास सत्ताधारी पुढे येऊ शकतात, पण इथे मोरबीतला पूल हा एक वास्तु-वारसा होता, एक प्रेक्षणीय स्थळ होता, कुणा संस्थानिक राजाला तेव्हाच्या अभियांत्रिकीविषयी वाटलेल्या आदराची खूण ठरणारा हा पूल होता.. हे सारेच आता विसरायचे आणि ‘नेत्यांनी लगेच मृत व जखमींसाठी आर्थिक मदत दिली’ यातच समाधान मानायचे?

दक्षिण कोरियातील सोल या राजधानीच्या शहरात, ‘हॅलोवीन’ हा अमेरिकी सण साजरा करण्याचा अतिउत्साह तरुणांनी दाखवल्यामुळे १५३ जणांना प्राण गमवावे लागले, काहींना घुसमटून, तर काहींना चेंगरून. त्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच ही गुजरातची बातमी. अनावर गर्दी, त्या गर्दीला आळा घालण्यासाठी पुरेशी व्यवस्थाच नसणे, त्यात काही तरुणांचा टारगटपणा.. हे तीनही घटक मोरबीसारख्या कमी विकसित लघुशहरात आणि दक्षिण कोरियासारख्या विकसित देशाच्या राजधानीमध्ये समसमान. दोन्हीकडे ‘लोकांना आनंद साजरा करू देण्या’चा प्रशासनांचा उदात्त वगैरे हेतू. पण चित्रवाणी व समाजमाध्यमांतील प्रचारतंत्राने माणसांचेच रूपांतर झुंडीमध्ये केलेले असताना, ‘आनंद’ ही जणू काही वस्तू आहे आणि ती सर्वाप्रमाणे आपल्यालाही मिळालीच पाहिजे असा हेकटपणा बोकाळत असताना या आनंदेच्छूंचे नियोजन हीदेखील प्रशासनाची जबाबदारी ठरते. ती पार पाडताना अधिक बळ वापरूनही चालत नाही, हे २ ऑक्टोबरला इंडोनेशियाच्या फुटबॉल स्टेडियममधील गर्दीवर अश्रुधूर सोडल्यानंतरच्या चेंगराचेंगरीतील १२५ बळींमुळे स्पष्ट झाले आहेच. मंदिरांच्या यात्रांमध्ये दुर्घटना होऊ नयेत म्हणून जशी काळजी घ्यायची, तशीच आता या ‘निधर्मी’ गर्दीसाठीही घ्यावीच लागेल.. नाहीतर आनंद ओरबाडणारे जीव जातच राहतील.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Story img Loader