किसान नेते युद्धवीरसिंग यांनी अर्थसंकल्पाबद्दल बोलताना ‘ढाक के तीन पात’ म्हणजेच झाडाची तीन पाने अशी टिप्पणी केली आहे. ती या अर्थसंकल्पाचे शेतकऱ्यांबाबतचे सार सांगणारी आहे, असे मला वाटते. या वेळी शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून आशा होती. ती यासाठी की सरकारनेच आर्थिक पाहणी अहवालात असे म्हटले होते की इतर सर्व क्षेत्रांपेक्षा कृषी क्षेत्र वेगाने वाढत आहे. सरकारला हे मान्य आहे की कोविडच्या महासाथीनंतर लोक पुन्हा शेतीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे शेतीवरचे अवलंबित्व वाढले आहे. कृषी उत्पादनांची किंमत वाढली आहे, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले नाही. ज्यात सत्ताधारी पक्षाचे बहुमत आहे, अशा संसदीय समितीने सहा आठवड्यांपूर्वी मांडलेल्या आपल्या अहवालात चार शिफारसी केल्या होत्या. त्यातली पहिली अशी की शेतकऱ्यांना सहा हजार रुपये किसान सन्मान निधी मिळतो, तो महागाई लक्षात घेऊन वाढवून दहाएक हजार रुपये केला गेला पाहिजे. दुसरी शिफारस म्हणजे एमएसपीची कायदेशीर हमी दिली गेली पाहिजे. तिसरी शिफारस म्हणजे शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. चौथी शिफारस म्हणजे पीक विमा योजना सुधारली पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा