आज आपण सांगू शकतो ती अचूक तारीख, ते दाखवणारी दिनदर्शिका निश्चित करण्यासाठी पूर्वीच्या काळात बराच खटाटोप करण्यात आला आहे. भूगोलाने काळाच्या संकल्पनेतून आपल्या आयुष्यालाच आकार दिला आहे.

क्त से दिन और रात

Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
loksatta kalachi ganit Sankranti Eclipse Zodiac
काळाचे गणित: संक्रांतीची तिथी?
Guru Gochar Astrology
१२ वर्षानंतर गुरू बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे येईल सोन्याचे दिवस, प्रचंड पैसे, पद व प्रतिष्ठेसह मिळेल प्रवासाची मोठी संधी
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी

वक्त से कल और आज

वक्त की हर शै गुलाम

वक्त का हर शै पे राज

साहिर लुधियानवी यांच्या या प्रसिद्ध ओळी. केवळ तत्त्वज्ञान म्हणूनच नव्हे तर इतरही अनेक अर्थाने माणूस काळाचा गुलाम आहे. जसे आज आपल्या आयुष्यावर घड्याळ आणि कॅलेंडर यांचे नियंत्रण आहे. पण काळ म्हणजे तरी काय? काही भौगोलिक घटितांचाच तो आविष्कार आहे.

पृथ्वीची स्वत:भोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे एक दिवस. सध्या आपण एका वर्षात ३६० दिवस, एका दिवसाचे २४ तास, एका तासात ६० मिनिटे आणि एका मिनिटात ६० सेकंद मानतो. ही पद्धत इ. स. पूर्व ४१०० ते १७५० या काळातील सुमेरियनांची. ते सध्याच्या इराकमधील युफ्रेटिस व टायग्रीस या नद्यांच्या बाजूला मेसोपोटेमिया परिसरात रहात. पण त्यांनी एका तासात ६० च मिनिटे का मानली ? १० किंवा १०० का नाही ? त्याचे कारण हे की सुमेरियन लोक दशमान नव्हे तर षटदशमान म्हणजे ६० किंवा ६० च्या पटीतील संख्या वापरत. ६० ही अशी एक संख्या आहे की तिला १, २, ३, ४, ५, ६, १०, १२, १५, २० आणि ३० यांनी नि:शेष भाग जातो. तसेच महिन्याचे ३० दिवस आणि दिवसाचे व रात्रीचे १२, १२ तास. त्या ३० व १२ नेही ६० ला भाग जातो. विशेष म्हणजे एका वर्षात ३६० दिवस होतात. त्या ३६० लाही ६० ने भाग जातो. त्यामुळे त्यांनी तासाचे व मिनिटांचे ६० – ६० भाग पाडले.

हेही वाचा >>> संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?

अवकाशात पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण सोळाव्या शतकात कोपर्निकसने सांगेपर्यंत ते लोकांना माहीत नव्हते. प्रत्यक्षात सूर्यच आकाशात एका ताऱ्याजवळून सरकत जाऊन अनेक दिवसांनी त्या ताऱ्याजवळ परत येताना दिसत असे. या कालावधीला एक वर्ष मानले गेले. या कालावधीत १२ अमावास्या किंवा १२ पौर्णिमा होतात. तसेच एका महिन्यात म्हणजे अमावास्या ते अमावास्या (किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा) या काळात ३० सूर्योदय होतात. यावरून एक वर्ष हे १२ गुणिले ३० म्हणजे ३६० दिवसांचे मानले जाई. प्रत्यक्षात एक वर्ष हे ३६५ दिवसांचे असते, हे पुढे लक्षात आले.

आजच्या कॅलेंडरचे मूळ इ. स. पूर्व आठव्या शतकातील रोमन राजा रोम्युलसपर्यंत पोहोचते. पण त्या काळात वर्षाचे दहा महिने व तेही ३० दिवसांचे असत. वर्षाची सुरुवात मार्चपासून होई आणि डिसेंबर हा दहावा म्हणजे शेवटचा महिना असे. डिसेंबरअखेर ते १ मार्च या ६० दिवसांच्या काळास फक्त ‘हिवाळा’ म्हणत. त्या प्रदेशात हिवाळा हा युद्धे, प्रवास, उत्सव इ. साठी निरुपयोगी असल्याने त्या ६० दिवसांची विभागणीसुद्धा दोन महिन्यांत केलेली नव्हती.

रोम्युलसनंतरच्या नुमा पोम्पेलिअस या राजाच्या काळात सूर्यवर्षाची सांगड १२ चांद्रमहिन्यांशी घालण्यात आली. मार्चपूर्वी जो हिवाळा मानला जाई त्याचे जानेवारी व फेब्रुवारी असे दोन भाग पाडून सुधारित कॅलेंडर लागू करण्यात आले. वर्षाचा पहिला महिना मात्र मार्चच राहू दिला होता. पुढे इ.स. पूर्व ४६ मध्ये जुलियस सीझरच्या आज्ञेनुसार जानेवारी हा पहिला महिना मानण्याचे ठरले. अर्थात शेवटचा महिना डिसेंबरच राहिला. जुलियस सीझरने केलेल्या या मोठ्या दुरुस्तीनंतर हे कॅलेंडर त्याच्या नावाने ज्युलियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले. ते १ जानेवारी इ. स. पूर्व ४५ पासून लागू केले गेले.

कॅलेंडरमधील ‘महिना’ या संकल्पनेस चंद्राचे भ्रमण किंवा चंद्राच्या कलांचा आधार आहे. मंथ ( Month) हा शब्दच मून (moon) वरून आलेला आहे. महिन्याची नावे ही मुख्यत: क्रमदर्शक होती. काही महिन्यांची नावे रोमन देवतेवरून आहेत, त्यांनाही भौगोलिक संदर्भ आहेत. उदा. जानेवारी हे नाव जानुस ( Janus) या रोमन देवतेवरून दिले गेले. ही द्वारदेवता असून तिचे एक मुख भूतकाळाकडे तर एक भविष्यकाळाकडे आहे असे मानले जाते. अर्थात पहिल्या महिन्यास हे अगदी प्रतीकात्मक नाव आहे. फेब्रुवारी हे नाव ‘फेब्रुआ’ या रोमन सणावरून आहे. स्वच्छता, शुद्धीचा मानला जाणारा हा सण. पूर्वी फेब्रुवारी हा वर्षाचा अखेरचा महिना होता. या महिन्यात शुद्ध होऊन मार्चमध्ये नववर्षात प्रवेश करावा अशी कल्पना होती. मार्च हा पूर्वी वर्षाचा पहिला महिना होता. मार्स या रोमनांच्या युद्धदेवतेवरून हे नाव दिले गेले. मार्च म्हणजे हिवाळा संपून वसंत ऋतूची सुरुवात. लॅटिनमधील ‘एपेरो’ म्हणजे ‘दुसरा’ यावरून एप्रिल नाव आले असावे. कारण सुरुवातीला एप्रिल हा दुसरा महिना होता. किंवा लॅटिनमधील अपेरिअर (म्हणजे उमलणे) वरून एप्रिल हे नाव आले असावे. कारण या महिन्यापासून कळ्या उमलू लागतात. मे हे नाव ‘मेया’ या ग्रीक देवतेवरून आले. ही वाढीची पृथ्वीदेवता. हेही नाव वसंत ऋतू सूचक आहे. जून हे नाव जुनो या रोमन देवतेवरून आले. जुपिटरची पत्नी जुनो ही देवांची राणी आणि लग्न व अपत्यजन्माची रक्षक मानली जाते. अर्थात जून हा रोमनांचा लग्नाचा महिना. जुलै महिन्याचे मूळ नाव क्वांटिलिस (Quantilis) म्हणजे ‘पाचवा’ असे होते. कारण पूर्वी तो पाचवा महिना होता. इ. स. पू. ४४ मध्ये जुलियस सीझरच्या मृत्यूनंतर या महिन्याला त्याचे नाव देण्यात आले. ऑगस्ट महिन्याचे नाव पूर्वी सेक्स्टिलीयस ( Sextilius) म्हणजे सहावा असे होते. पण पुढे त्याला रोमन सम्राट ऑगस्टसचे नाव देण्यात आले. सप्टेंबर ( Septa – सात), ऑक्टोबर (Octa – आठ), नोव्हेंबर ( Nova – नऊ) आणि डिसेंबर ( Deci – दहा) ही चारही महिन्यांची नावे अंकदर्शक आहेत. कारण जेव्हा वर्ष दहा महिन्यांचे होते, तेव्हा या महिन्यांचे हेच क्रमांक होते. पुढे जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने वाढवून वर्ष बारा महिन्यांचे करण्यात आले, तेव्हा या चार महिन्यांचा क्रम बदलला. पण त्यांची मूळ नावे मात्र अजूनही प्रचलित आहेत.

सुरुवातीला रोम्युलसच्या कॅलेंडरमध्ये ३० दिवसांचे दहा महिने व ६० दिवसांचा हिवाळा होता. नंतर नुमा पोम्पेलिअसने ३० दिवसांचे १२ महिने केले. पुढे ज्युलिअस सीझरच्या काळात जानेवारी हा पहिला महिना केला गेला, तेव्हा त्याला महत्त्व देण्यासाठी तो ३१ दिवसांचा केला गेला व त्यासाठी फेब्रुवारीतील एक दिवस कमी करून तो २९ दिवसांचा केला गेला. तसेच वर्षाचे दिवस ३६० ऐवजी ३६५ असल्याचे लक्षात आल्यामुळे जानेवारीसोबत मार्च, मे, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर असे ३१ दिवसांचे केले गेले. पुढे जुलियस सीझरच्या मृत्यूनंतर सम्राट ऑगस्टसने सेक्स्टिलीयस ( Sextilius) या महिन्याचे नाव बदलून जुलै केले, तेव्हा तोही ३१ दिवसांचा केला. त्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा अजून एक दिवस कमी करण्यात आला. अशा प्रकारे फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा झाला. पण पुढे १५८२ मध्ये पोप ग्रेगरी यांच्या काळात पुन्हा कॅलेंडरमध्ये दुरुस्ती करण्यात आली. कारण तोपर्यंत एक वर्ष हे बरोबर ३६५ नव्हे तर ३६५.२५ दिवसांचे आहे, हे निर्विवाद सिद्ध झाले होते. याचा अर्थ दर वर्षी पाव दिवस मोजला जात नव्हता. कालमापनात तो पाव दिवस समायोजित करणे आवश्यक होते. त्यामुळे दर चार वर्षांनी एक दिवस जास्तीचा धरण्यात यावा, त्यावर्षी फेब्रुवारी महिना २८ ऐवजी २९ दिवसांचा धरावा, तसेच त्यास लीप वर्ष म्हणावे असे ठरले. तेव्हापासून ते ग्रेगेरीयन कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले. हे ग्रेगेरीयन कॅलेंडर जगाने हळूहळू स्वीकारले. उदा. इंग्लंडने ते १७५२ मध्ये तर रशियाने १९१८ पासून स्वीकारले. आज आपलेही दैनंदिन आयुष्य त्याच्याशीच बांधलेले आहे.

एकूण काय तर आपले आयुष्य हे कॅलेंडर व घड्याळावर आणि ते दोन्ही चंद्र, सूर्य व पृथ्वीच्या गतीवर म्हणजे भौगोलिक घटितांवरच आधारित आहेत. म्हणजे आपले आयुष्यच नव्हे तर काळालाही आकार देणारा, नियंत्रित करणारा भूगोल हा सार्वभौम खेळिया आहे.

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

lkkulkarni@gmail.com

Story img Loader