फ्रेंचांच्या ग्वाडालूप या कॅरेबियन बेटाची अर्थव्यवस्था केळीव्यापार आणि काहीअंशी पर्यटनावर तगलेली. इथल्या सांस्कृतिक वातावरणात गुलामगिरीचा गंधही येऊ नये अशा वातावरणात जन्मलेल्या मारिस कॉण्डे यांनी जगाला कादंबऱ्या निर्यात केल्या. म्हणजे फ्रेंच भाषेत कथा-कादंबऱ्या लिहिणारे तिथे दीड-दोन डझन तरी लेखक असतील. पण कित्येक भाषांत अनुवादित झालेल्या आणि नोबेल पुरस्काराच्या शक्यतांमध्ये धरल्या गेलेल्या मारिस कॉण्डे एकमेव. पन्नास वर्षे त्या कादंबऱ्या लिहीत होत्या. एकुणनव्वदाव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या (गेली काही वर्षे अंधत्वाचा सामना करावा लागणाऱ्या कॉण्डे यांनी आपला नवरा, लेखनिक आणि अनुवादक रिचर्ड फिलकॉक्स यांना तोंडी सांगितलेल्या) ‘द गॉस्पेल अ‍ॅकॉर्डिग टू न्यू वल्र्ड’ या कादंबरीचा आंतरराष्ट्रीय बुकरच्या लघुयादीत गेल्यावर्षी समावेश होता. कॅरेबियन लोककथांना बायबलशी जोडणारी आजच्या काळातील कथा या कादंबरीत आहे. कॅरेबियन बेटांचा, आफ्रिकी गुलामगिरीचा इतिहास मारिस कॉण्डे यांनी आपल्या कादंबऱ्यांतून आणला. उतारवयीन मात्यापित्यांचे आठवे अपत्य असलेल्या मारिस यांचे आरंभिक शिक्षण घरातच झाले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: शहरयार खान

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
six year old daughter of labour Swallowed one rupee coin family seek help for treatment
अल्पवयीन मुलीने नाणे गिळले; गरीब कुटूंबापुढे उपचाराचा खर्च पेलण्याचे आव्हान

सोळाव्या वर्षी पॅरिसला उच्चविद्या ग्रहण करण्यासाठी आल्यानंतर त्यांना वांशिक भेदाची पहिली ओळख झाली. तिथले शिक्षण सोडून त्यांचा पॅरिसमधीलच सहाध्यायींकडून आफ्रिकी गुलामगिरी आणि इतिहासाचा अभ्यास सुरू झाला. साम्यवादी चळवळी आणि विचारांचा त्यांच्यावर पगडा बसला. आयव्हरी कोस्ट, गिनिआ, सेनेगल, माली, घाना या देशांमध्ये पुढील दशकभर त्यांनी वास्तव्य केले. चे गव्हेरा, माल्कम एक्स आणि कित्येक राजकारणी, कार्यकर्त्यांशी त्यांनी या काळात मैत्री केली. या दरम्यान प्रेम, लग्न आणि घटस्फोट यांच्या फेऱ्यात एकल मातृत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. फार पूर्वीच लिहिलेली कादंबरी वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रकाशित केली. ‘वेटिंग फॉर हॅपिनेस’ नावाने अनुवाद झालेली ही कादंबरी त्यातील सामाजिक आणि राजकीय संदर्भामुळे प्रचंड टीकेची धनी झाली. सहा महिन्यांत तिच्यावर बंदीचा प्रयोगही झाला. कादंबरीत गिनिआमधील अनुभवांना त्यानी चितारित केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र त्यांनी आपल्यावरील टीकेचे खंडन केले. मात्र राजकीय विषय-आशयासह मी लिहूच शकत नाही, हेही ठामपणे सांगितले. ‘सेगू’ हा आत्ताच्या माली देशातील काही भागात मोडणारा प्रदेश. या भागातील शंभर वर्षांची गुलामगिरी, इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचा तिथला वावर यांवर त्यांनी लिहिलेल्या ‘सेगू’ आणि ‘चिल्र्डन ऑफ सेगू’ या कादंबऱ्या गाजल्या. आफ्रिकेत राहून आफ्रिकी भाषांशी त्यांची गट्टी जुळली नाही; मात्र इथल्या अज्ञात इतिहास- भूगोलाला त्यांनी पहिल्यांदा कादंबऱ्यांतून अजरामर केले. २० कादंबऱ्या, अकथनात्मक साहित्यासह पठडीबाह्य आफ्रिकी लेखन हे त्यांचे संचित. त्यावर अभ्यासकांना पुढला बराच काळ संशोधनवाटा देऊन चार दिवसांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Story img Loader