फ्रेंचांच्या ग्वाडालूप या कॅरेबियन बेटाची अर्थव्यवस्था केळीव्यापार आणि काहीअंशी पर्यटनावर तगलेली. इथल्या सांस्कृतिक वातावरणात गुलामगिरीचा गंधही येऊ नये अशा वातावरणात जन्मलेल्या मारिस कॉण्डे यांनी जगाला कादंबऱ्या निर्यात केल्या. म्हणजे फ्रेंच भाषेत कथा-कादंबऱ्या लिहिणारे तिथे दीड-दोन डझन तरी लेखक असतील. पण कित्येक भाषांत अनुवादित झालेल्या आणि नोबेल पुरस्काराच्या शक्यतांमध्ये धरल्या गेलेल्या मारिस कॉण्डे एकमेव. पन्नास वर्षे त्या कादंबऱ्या लिहीत होत्या. एकुणनव्वदाव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या (गेली काही वर्षे अंधत्वाचा सामना करावा लागणाऱ्या कॉण्डे यांनी आपला नवरा, लेखनिक आणि अनुवादक रिचर्ड फिलकॉक्स यांना तोंडी सांगितलेल्या) ‘द गॉस्पेल अॅकॉर्डिग टू न्यू वल्र्ड’ या कादंबरीचा आंतरराष्ट्रीय बुकरच्या लघुयादीत गेल्यावर्षी समावेश होता. कॅरेबियन लोककथांना बायबलशी जोडणारी आजच्या काळातील कथा या कादंबरीत आहे. कॅरेबियन बेटांचा, आफ्रिकी गुलामगिरीचा इतिहास मारिस कॉण्डे यांनी आपल्या कादंबऱ्यांतून आणला. उतारवयीन मात्यापित्यांचे आठवे अपत्य असलेल्या मारिस यांचे आरंभिक शिक्षण घरातच झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा