पुरोगामी अशी प्रतिमा असलेल्या महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कधी नव्हे एवढे ढवळून निघाले आहे. जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार करतात तर त्याच वेळी दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेतात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात वाटेकरी करा किंवा वेगळा संवर्ग तयार करा, पण आरक्षण द्याच, अशी टोकाची भूमिका जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांनी घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षणात वाटेकरी करून घेण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. अनुसूचित जमातीत समाविष्ट करा म्हणून धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे, त्यावर धनगर समाजाला आमच्या आरक्षणात वाटेकरी करू नका म्हणून आदिवासी समाजाकडून इशारे दिले जात आहेत. सामाजिक विषय फार नाजूकपणे हाताळावे लागतात. पण आरक्षणाचा विषय हाताळण्यात शिंदे सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र आतापर्यंत बघायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाची मराठवाडा वगळता फारशी दखलही घेतली जात नव्हती. पण सप्टेंबरच्या सुरुवातीला जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
अन्वयार्थ : महाराष्ट्राच्या जातगणनेचा प्रश्न
लाठीमार झाला व त्याने सारेच चित्र बदलले. पोलिसांच्या लाठीमारामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संतापाची भावना निर्माण झाली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-10-2023 at 04:39 IST
TOPICSदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationमहाराष्ट्रMaharashtra
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste survey by maharashtra govt demand for caste census in maharashtra zws