दिल्लीवाला

सध्या प्रसारमाध्यमांमधून भाजपमधील तीन नेत्यांचं नाव सातत्याने घेतलं जातंय. मोदी, शहा आणि गडकरी! मोदी-शहांना कितीही नको असलं तरी वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘व्हायरल’ झालेले आहेत. गडकरींच्या रस्तेविकास मंत्रालयासंदर्भात महालेखापरीक्षकांनी (कॅग) दोन अहवाल दिले, मंत्रालयावर ताशेरे ओढले तरीही, गडकरींविरोधात राजकीय वातावरण तयार होऊ शकलेलं नाही. उलट, गडकरींना सहानुभूती मिळू लागली आहे! त्यामुळं ‘कॅग’च्या अहवालावरच शंका घेतली जाऊ लागली आहे. ईडी-सीबीआयपाठोपाठ आता ‘कॅग’चाही वापर केला जातोय का, असा प्रश्न हलक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे. गडकरींनी वेगवेगळय़ा व्यासपीठांवरून प्रत्युत्तर देऊन शांतपणे हल्ला परतवून लावला आहे. ‘कॅग’च्या अहवालावरून चर्चा होत असताना गडकरींच्या दोन चित्रफिती समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्या. समोर कोणीही असो, नमस्कार-चमत्कार न करताही विनम्र राहता येतं याचं भाजपच्या नेत्यांना शहाणपण देणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत असताना, ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांशी गडकरींनी फोनवरून साधलेल्या संवादाची चित्रफीतही लोकांपर्यंत पोहोचली. गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्वपक्षीय नेते, मुख्यमंत्री, मंत्री यांचा राबता असतो. राज्या-राज्यांतील नेत्यांसाठी त्यांचे दारे नेहमीच खुली असतात. दोन दिवसांपूर्वी गडकरींनी तेजस्वी यादव यांना हायड्रोजन कारमधून फिरून येण्यास सांगितलं. भेटीमध्ये गप्पांच्या ओघात गडकरींनी नव्या तंत्रज्ञानावर आधारित या कारचं महत्त्व समजावून सांगितलं. तेजस्वी यादवही या स्वस्त, मस्त आणि प्रदूषणमुक्त कारच्या प्रेमात पडले. त्यांनी लगेच प्रसारमाध्यमांना बोलावून हायड्रोजन कारचं कौतुक केलं आणि गडकरींना धन्यवाद दिले. या कारमुळं तेजस्वी आणि गडकरी दोघेही व्हायरल झाले. समाजमाध्यमांच्या जमान्यात कोणालाही व्हायरल होण्यापासून रोखता येत नाही हेच खरं.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

काँग्रेसचा एकमेव ‘इन्फ्लुएन्झर’

काँग्रेसला २०१४ आणि २०१९ मध्ये समाजमाध्यमांची ताकद कळलेली नव्हती, भाजपचा खेळही समजलेला नव्हता. तेव्हा काँग्रेसविरोधात अख्खा भाजप व्हायरल झाला होता. समाजमाध्यमांवरील भाजपचा हल्ला परतवून लावला पाहिजे, हा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलेला नव्हता. आता मात्र काँग्रेसला समाजमाध्यमांचं महत्त्व पटू लागलेलं आहे. वृत्तवाहिन्यांची विश्वासार्हता घटू लागल्याने भाजपनेही समाजमाध्यमांवरील तरुण इन्फ्लुएन्झर्सना हाताशी धरून नव्या सोंगटय़ा टाकलेल्या आहेत. भाजपला वृत्तवाहिन्यांची गरज उरली नसली तरी, वृत्तवाहिन्यांचं भाजपप्रेम कमी झालेलं नाही. त्यामुळं काँग्रेसने मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना चार हात दूर ठेवण्याचं धोरण राबवलेलं आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये वा त्यानंतरही राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांना एकही मुलाखत दिलेली नाही. राहुल गांधींचा प्रतिमाबदल समाजमाध्यमांवरून केला जात आहे. सामान्य लोकांमध्ये मिसळून राहुल गांधींनी साधलेल्या संवादाचे कव्हरेज काँग्रेस स्वत:च करत आहे. राहुल गांधींच्या भेटीगाठी व्हायरल केल्या जात आहेत. लडाखमधील राहुल गांधींचा दौरा काँग्रेसने समाजमाध्यमांवरून व्हायरल केला. १० सप्टेंबरला लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषदेची निवडणूक होणार असल्याने अचूक वेळ साधत राहुल गांधींचा दौरा आखला गेला. लडाखमध्ये बाइक-रॅली, जाहीर भाषण, स्थानिक लोकांशी संवाद हा जनसंपर्क अपेक्षित होता. पण, ‘ब्रिक्स’च्या बैठकीत मोदी आणि क्षी जिनिपग एकत्र आले असताना लडाखमध्ये चीनवरून भाजपच्या वर्मावर ठेवलेले बोट हे काँग्रेसचा अफलातून राजकीय डावपेच होते. काँग्रेसच्या या क्लृप्त्या जबरदस्त व्हायरल झाल्या. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या समाजमाध्यमांवरील मोदींच्या प्रतिमाबांधणीच्या क्लृप्त्या काँग्रेस नेत्यांच्या डोक्यावरून गेल्या होत्या. नंतरच्या काळात काँग्रेस भाजपच्या काकणभर पुढं सरकला असल्याचं दिसतंय. कदाचित त्यामुळंच समाजमाध्यमांवर स्टिफनी कटरचं नाव पुन्हा चर्चेत आलं असावं. राहुल गांधींशी तिची भेट २०२१ मध्ये झाली होती असं म्हणतात. त्यानंतर वायनाडच्या खासदाराच्या प्रतिमाबांधणीची आखणी झाली असावी!

अस्वस्थ नितीश!

नितीशकुमार यांनी कितीही नाकारलं, तरी त्यांना ‘इंडिया’मध्ये अपेक्षित जागा मिळवता आलेली नाही. बेंगळूरुच्या बैठकीत ते रुसून बसले होते असं म्हणतात. तिथं समन्वयक घोषित झाला नाही. मग, नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. विरोधकांच्या ‘इंडिया’च्या बैठकीचं यजमानपद फिरतं राहण्याची शक्यता आहे. बेंगळूरुनंतर मुंबईला बैठक घेण्याचा प्रस्ताव बिगरकाँग्रेस नेत्यानं उद्धव ठाकरेंसमोर ठेवला होता. या नेत्याची कल्पना उद्धव ठाकरेंनाही आवडली असावी. त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत बैठक आयोजित करण्याची तयारी दाखवली. मुंबईत बैठक घेण्याची सूचना करून या नेत्याने एका दगडात दोन पक्षी मारले. पण, त्यामुळं नितीशकुमार नाराज झाले असं म्हणतात. ते तडक पाटण्याला निघून गेले. चर्चा अशी की, ‘इंडिया’मध्ये दोन्ही दगडींवर हात ठेवणारे दोन नेते आहेत, त्यातील एक नितीशकुमार. गेल्या आठवडय़ात ते दिल्लीला आले, त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘सदैव अटल’ या स्मृतिस्थळाला भेट दिली. वाजपेयींच्या ‘एनडीए’मध्ये नितीशकुमार होते, त्यांच्यामुळंच नितीशकुमार यांचं एके काळी किनाऱ्याला लागलेलं राजकीय करिअर उजळून निघालं होतं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कदाचित नितीशकुमार दिल्लीला आले होते. पण, ‘सदैव अटल’चं दर्शन ‘इंडिया’वाल्यांना त्यांचा अप्रत्यक्ष इशाराही मानला जात आहे. नितीशकुमारांनी पाटण्याला परत जाऊन भाजपला विनाकारण डिवचलं आहे. त्यांनी पाटण्यातील अटलबिहारी वाजपेयी पार्कचं नाव बदलून टाकलं आहे. वाजपेयींच्या समाधीवर डोकं ठेवून आल्यावर त्यांचं नाव गायब करण्यामागं काय कारण असावं हे माहिती नाही. कदाचित नितीशकुमार यांची राष्ट्रीय जनता दलाने अडचण केली असावी. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे बंधू व मंत्री तेजप्रताप यादव यांनी या पार्कचं नाव कोकोनट पार्क केलं आहे. ‘एनडीए’मध्ये असताना भाजप तर आता ‘इंडिया’मध्ये लालूंचा पक्ष नितीशकुमार यांची कोंडी करतोय.

जावडेकरांच्या सहकाऱ्याचं भाग्य!

भाजपचे राधामोहन दास अगरवाल कोण हे माहिती करून घेण्याचं खरंच काही कारण नव्हतं. पण, नड्डांनी त्यांना अचानक राष्ट्रीय महासचिव केल्यामुळं माध्यमांचं लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं. केरळमध्ये ते इतक्या जोमाने सक्रिय झालेले आहेत की, प्रभारी प्रकाश जावडेकरांना काय करावं हे कळेनासं झालंय. राधामोहन हे केरळचे सहप्रभारी. केरळची मुख्य जबाबदारी जावडेकरांची, पण राधामोहन महासचिव बनले आहेत. त्यामुळं पक्षाला त्यांची उपयुक्तता अधिक असावी असं दिसतंय. काँग्रेसचे ओमन चांडी गेल्यामुळं पुथ्थुपल्ली मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तिथं राधामोहन यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. राधामोहन यांचं केरळशी कौटुंबिक नातं असल्यानंही त्यांना केरळचे सहप्रभारी पद दिलं असावं. जावडेकर महासचिव नसूनही ते केरळचे प्रभारी आहेत. आता त्यांच्याकडं तेलंगणाच्या निवडणुकीचीही जबाबदारी दिली गेली आहे. नड्डांच्या चमूमध्ये राधमोहन यांना स्थान देण्यामागे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनाही चाप लावण्याचा उद्देश असू शकतो असं म्हणतात. गोरखपूर शहर मतदारसंघातून राधामोहन चार वेळा आमदार झाले. हिंदू महासभेचे उमेदवार म्हणून त्यांनी हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल शिवप्रताप शुक्ल यांचा पराभव केला होता. मुख्यमंत्री योगींमुळे गोरखपूर शहर मतदारसंघ त्यांना सोडावा लागला. मग, त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं. पण, आता राधामोहन यांचं भाग्य उजळलेलं दिसतंय.