दिल्लीवाला

मोदींनी शिंदे गटाला संसदेत काही तरी दिले म्हणायचे. निष्ठेचे फळ कधी तरी मिळतेच. माहिती-तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीचे अध्यक्षपद शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना दिले गेलेय, पण त्यांच्यासमोर हे अध्यक्षपद म्हणजे आव्हान असेल. या समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. संसदीय समितींच्या नव्या रचनेत काँग्रेसकडून गृह आणि माहिती-तंत्रज्ञान या दोन्ही समित्यांची अध्यक्षपदे काढून घेण्यात आली आहेत. माहिती-तंत्रज्ञान समिती शशी थरुरांकडे होती, त्यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेण्यासाठी भाजपच्या निशिकांत दुबेंनी जंगजंग पछाडले होते. त्यांना कष्टाचे फळ मिळालेले दिसतेय. या समित्यांमध्ये विरोधक आक्रमक आहेत, महुआ मोईत्रा, कार्ती चिदंबरम, जॉन ब्रिटास हे सगळे सभागृहातही आक्रमक असतात. केंद्र सरकारने काँग्रेसला गृह समितीऐवजी वाणिज्य समिती आणि रसायने व खतांची समिती दिली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडे आता वाणिज्य समिती आलेली आहे. पूर्वी त्यांच्याकडे गृह समिती होती. रसायने व खतांच्या समितीचे अध्यक्षपद कोणाला मिळणार हे ठरलेले नाही. काँग्रेसकडे विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण या दोन्ही महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद आहे. पण, गृह समिती गेल्यामुळे काँग्रेस नाराज असला तरी, ज्या समित्या मिळतात, त्या तरी पदरात पाडून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे हा बदल स्वीकारलेला दिसतो.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
Chief Minister Eknath shinde understanding of independent parties in Thane print politics news
ठाण्यातील स्वपक्षीय नाराजांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत,प्रचाराला लागण्याचे आदेश; केळकर यांनाही कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्ला
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के

‘ट्रेड मिल’वर चाललेली यात्रा!

कितीही नाकारले तरी, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची भाजपला दखल घ्यावी लागली आहे. आत्ता तर ही यात्रा कर्नाटकमध्ये आहे, या राज्यात पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि हेच महत्त्वाचे राज्य आहे जिथून योग्य वेळी ही यात्रा निघालेली आहे. सोनिया आणि राहुल एकाच वेळी यात्रेत सहभागी झाले होते. वातावरण निर्मिती करण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल भाजपच्या एका नेत्याला विचारले की, तुम्ही ‘भारत जोडो’ला गांभीर्याने का घेत आहात? त्यावर, या नेत्याचे म्हणणे होते की, भाजपने या यात्रेकडे लक्ष दिलेले नाही. कुणालाही स्वत:चा पक्ष मजबूत करण्याचा हक्क आहे. भाजपही राज्या-राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करत आहे, जिथे अस्तित्व आहे, तिथे पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसही तेच करत आहे! भाजपच्या नेत्याचा हा युक्तिवाद योग्य होता. पण, त्यांनी अचानक काँग्रेसच्या यात्रेतील हवाच काढून घेतली. राहुल गांधी मैलोनमैल पदयात्रा करत आहेत हे खरे पण, त्यातून त्यांना मिळणार काय? काँग्रेस खरेच मजबूत होईल असे राहुल गांधींना वाटतेय का? राहुल गांधींची पदयात्रा म्हणजे ‘ट्रेड मिल’वरचे चालणे आहे. प्रत्यक्ष धावणे आणि ट्रेड मिलवर धावणे यामध्ये फरक आहे की नाही? ट्रेड मिलवर चालून माणूस कुठेच जात नाही, ना पुढे ना मागे. उलट नीट पावले उचलली नाहीत तर पडण्याचा धोका अधिक. राहुल गांधी ट्रेड मिलवर चालून कुठेही जात नाहीत, ते आहेत तिथेच राहणार आहेत. काँग्रेसही आपले आरोग्य सुधारण्यासाठी धावत नाही. मोदींची आगेकूच बघा. ते कुठून कुठे पोहोचले, राहुल गांधी कुठे पोहोचणार आहेत का? भाजपच्या या नेत्याच्या प्रश्नाचे उत्तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समजू शकेल.

काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तात्पुरते अभय देऊन गांधी कुटुंबाने काँग्रेसवरचे आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यांच्या पसंतीचा उमेदवार पक्षाचा अध्यक्ष बनेल पण, गांधीतर पक्षाध्यक्ष आला तर काँग्रेस संघटनेमध्ये काय बदल होऊ शकतील, याची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे भरपूर नावेही चर्चेत आलेली आहेत. खरगे पक्षाध्यक्ष झाले तर, राहुल निष्ठावानांना फारसा धक्का लागणार नाही असे म्हणतात. खरगेंना कदाचित मदतीची गरज भासेल. हे लक्षात घेऊन दोन कार्यकारी अध्यक्षही असू शकतील. नाही तरी, काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या मदतीला दोन-चार उपाध्यक्ष नियुक्त करण्याची पद्धत आहेच. काँग्रेसमध्ये उत्सुकता आहे की, कार्यकारी अध्यक्ष करायचे असतील तर कोणाला संधी मिळणार? काहींचे म्हणणे आहे की, शशी थरूर आणि कमलनाथ. एकाने दक्षिण भारत बघायचा, एकाने उत्तर भारत. पक्षाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पद देऊन सामावून घेतले पाहिजे. कमलनाथ यांना पक्षाध्यक्ष होण्यात रुची नव्हती पण, ते संघटनेचे काम नाकारणार नाहीत. संघटनेमध्ये बदल करण्यासाठी समिती नेमून सगळय़ांचा सल्ला घेतला जाईल असे खरगेंनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. कदाचित जी-२३ मधील नेत्यांनाही संघटनेत कुठली ना कुठली पदे देऊन सामावून घेतले जाऊ शकते. खरगेंनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या जागी कोण, हाही प्रश्न विचारला जात आहे. कोणी म्हणते की, दिग्विजय सिंह यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून खरगेंसाठी माघार घेतली, खरगेंच्या जागी दिग्विजय यांना संधी दिली जाऊ शकते. कोणी म्हणते की, पी. चिदंबरम ज्येष्ठ आहेत, त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे. पण, चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालय अधिक महत्त्वाचे असते असे सांगतात. मोदी हिंदीत बोलत असताना चिदंबरम इंग्रजीतून काय उत्तर देणार आणि भाजपवाल्यांना त्यांचे इंग्रजी कळणार तरी किती? विरोधी पक्षनेते पदासाठी शक्तिसिंह गोहिल वगैरेंचीही नावे चर्चेत आहेत. पण, राज्यसभेतील नवा विरोधी पक्षनेता ठरवण्यास अजून वेळ आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत काँग्रेसमध्ये नव्या पक्षाध्यक्षाचे राज्य सुरू झालेले असेल.

थरुरांचे कोणाला आकर्षण?

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. नंतर अनौपचारिक गप्पांमध्ये काँग्रेस नेत्याचे म्हणणे होते की, खरगे पक्षाध्यक्ष होतील पण, शशी थरुरांकडे तगडी लढत देण्याची क्षमता आहे. खरगेंकडे अनुभव आहे, रस्त्यावर उतरून राजकारण कसे करायचे हेही त्यांना माहिती आहे. पण, काँग्रेसमधील तरुण कार्यकर्त्यांना थरुरांबद्दल कमालीचे आकर्षण आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे इंग्रजी, मिश्किलपणा, ते लोकसभेतील खासदार आहेत, राज्यसभेतील नव्हे म्हणजे त्यांना जनाधार आहे. मतदार त्यांना निवडून देतात, त्यांचा स्वत:चा मतदारसंघ आहे. खरगेंच्या तुलनेत ते तरुण आहेत. नव्या पिढीला आकर्षित करण्याचे सगळे गुण थरुर यांच्याकडे आहेत. गांधी कुटुंब खरगेंच्या पाठीशी आहे आणि काँग्रेसची यंत्रणा अप्रत्यक्षपणे खरगेंच्या मदतीसाठी उभी आहे हा भाग वेगळा पण, थरुरांना तरुणांचा पाठिंबा आहे हे नाकारता येणार नाही. काँग्रेस नेत्याचे हे म्हणणे खरेही असू शकेल. थरुरांच्या गुणांवर बोलणारे हे नेते प्रत्यक्षात खरगेंच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. हे नेते म्हणत होते की, थरुर यांनी ‘जी-२३’मधील नेत्यांशी नीट संपर्क साधला असता तर, ते खरगेंऐवजी थरुरांच्या बाजूने उभे राहिले असते. थरुरांनी बंडखोर ‘जी-२३’मधील नेत्यांना जवळ केले नाही. ‘मी जी-२३ गटाचा प्रतिनिधी नाही’, असे म्हणून थरुरांनी आपली ताकद कमी केली! जुन्या जाणत्या काँग्रेस नेत्यांचा थरुरांवर फारसा विश्वास नाही, थरुर बुद्धिजीवी आहेत पण, त्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे का, ते सामान्य लोकांचे नेते आहेत का, त्यांनी कधी घोषणा तरी दिल्या आहेत का, असे प्रश्न विचारून हे नेते भंडावून सोडतात. ‘थरुर यांची लोकप्रियता वेगळीच आहे’, असा टोमणा मारून एकप्रकारे नाराजी व्यक्त करत असतात. ‘जी-२३’ गट कदाचित संपलाही असेल पण, नव्या-जुन्या नेत्यांमधील मतभेद हे असे वाक्यावाक्यातून उघड होत असतात.