राजू केंद्रे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उपेक्षित समुदायातून येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या उच्चशिक्षणात सांस्कृतिक भांडवलाची भूमिका काय असते, यावर मी याआधी लिहिलेल्या लेखात काही भूमिका मांडली होती. मुळात सांस्कृतिक भांडवलाची संकल्पना मराठी वाचकांना काहीशी नवीन असल्याने त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांचा मागोवा घेत या लेखात सांस्कृतिक भांडवलाविषयी विस्ताराने लिहीत आहे.
म. जोतिबा फुलेंच्या क्रांतिकारी संघर्षांतून महाराष्ट्रात नव्या काळाला आवश्यक असणाऱ्या सांस्कृतिक लढाईची चांगली जाणीव झाली होती. मी स्वत: जेव्हा अप्रत्यक्षपणे सांस्कृतिक भांडवलाच्या या लढाईला सामोरे जात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्चशिक्षण घेण्यासाठी पोहोचलो, तेव्हा मात्र मला सांस्कृतिक लढाई आणि सांस्कृतिक भांडवल याचे गणित खऱ्या अर्थाने उलगडत होते. जोतिबांना अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक लढाईसाठी त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहे. परंतु, या विषयावर खूप कमी लोक चिंतन करत आहेत, त्याच वेळी स्वत:कडे सांस्कृतिक भांडवल नाही हेसुद्धा अनेक उपेक्षित घटकांना वेळोवेळी जाणवत असते.
१९३० साली एका सामान्य कामगार कुटुंबात जन्माला आलेल्या पिएर बोद्र्यू या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने सांस्कृतिक भांडवल हा विचार पहिल्यांदा मांडला. या संकल्पनेप्रमाणे, सांस्कृतिक भांडवलाचा पहिला घटक म्हणजे विशिष्ट सामाजिक वर्गाचा भाग असणे. अन् दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्तीने विशिष्ट समाजाचा भाग म्हणून प्राप्त केलेली कौशल्ये, कपडे, सांस्कृतिक पद्धती, संसाधने, लोकसंग्रह वगैरे. या दोन्ही प्रकारातून सांस्कृतिक भांडवल म्हणजे काय हे समजून येते. याच मांडणीच्या आधारे जर उपेक्षित समूहातून येणाऱ्या व्यक्तीचे सांस्कृतिक भांडवल पहिले तर, त्याचा उच्च शिक्षणातल्या प्रवासावर होणारा परिणाम उमगेल.
मी एका उपेक्षित समाजातून पुणे, टाटा इन्स्टिटय़ूट व पुढे इंग्लंडमध्ये शिकायला गेलो. तिथले राहणीमान व विशिष्ट सांस्कृतिक पद्धती यांमुळे मला वेळोवेळी माझ्या आर्थिक कमकुवतपणाची जाणीव होत होती. दिवसातल्या वेळेनुसार आणि सीझननुसार कपडे, चपला, शूज बदलणारे एलीट विद्यार्थी सोबत असताना माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांस्कृतिक धक्के बसत असतात. यातून कमालीचे नैराश्य, भीती, न्यूनगंड आणि परात्मभाव येऊन अभ्यास व करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
ग्रामीण भागातून, उपेक्षित समाजातून येणारे तरुण/ तरुणी हे ‘उपेक्षित’ समाजाचे घटक म्हणून भारतात आणि जगभरात जात असतात. त्यांची सांस्कृतिक ओळख हेच त्यांचे सांस्कृतिक भांडवल ठरते. कोणत्याही सत्तेत असलेल्या समाजाचे कित्येक पिढय़ा आपण घटक नसणे, हे स्वत:च्या कमकुवत अस्तित्वाची त्यांना सतत जाणीव करून देत असते. उपेक्षित समाजाचा घटक म्हणून कोणत्या पद्धतीचे सांस्कृतिक भांडवल आपल्याला मिळाले आहे अन् जगाच्या बाजारात त्याची किंमत काय याची जाणीव मनात ठेवूनच त्यांचा शिक्षणप्रवास सुरू होत असतो.
‘सांस्कृतिक भांडवला’तला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वत:कडे असलेले कौशल्य, स्वत:चे सामाजिक आणि व्यावसायिक नातेसंबंध इत्यादी. सांस्कृतिक भांडवलातल्या या सर्व घटकांमधून नक्की कोणत्या प्रकारची माहिती उपेक्षित समाजातल्या विद्यार्थ्यांकडे येत असते आणि त्याचा ते कोणत्या पद्धतीने वापर करू शकतात, हे सर्वज्ञात आहे कारण बहुतेक उपेक्षित विद्यार्थ्यांचे खडतर प्रवास आपल्या डोळय़ासमोर आहेत. कित्येक उपेक्षित समूहांतल्या विद्यार्थ्यांना साधी इंटर्नशिप मिळवणे आव्हान असते. याउलट प्रस्थापित समूहातले विद्यार्थी पटकन अशा संधी माहीत करून त्याचा फायदा घेऊन जॉब मार्केटमध्ये सहज पोहोचू शकतात. यालाच मेरिट किंवा स्पर्धात्मक कौशल्य वगैरे समजले जाणार असेल तर काही प्रस्थापित मंडळींचे ‘मेरिट’ हे नेपॉटिझम आहे असे नक्कीच म्हणता येते.
उपेक्षित समूहातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य या वेगवेगळय़ा अनुभवामुळे सतत बाधित होत असते. मनावर विशिष्ट पद्धतीचा ताण असतो. आपल्या बाजूला मोठय़ा ब्रॅण्डचे कपडे घालून बसलेली व्यक्ती आपली सहाध्यायी आहे. आणि आपल्याला याच्यासोबत शिकायचे आहे आणि यासोबतच जॉब मार्केटमधल्या स्पर्धेला सामोरे जायचे आहे या जाणिवेतून मनावर मोठा ताण तयार होतो. एका बाजूला गरिबीची प्रचंड जाणीव आणि दुसऱ्या बाजूला इतरांच्या श्रीमंतीतून होणारा प्रतीकात्मक मानसिक अत्याचार असे शैक्षणिक वातावरण उपेक्षित विद्यार्थ्यांला मिळते. अर्थात, श्रीमंत मुलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे कपडे घालू नयेत असे अजिबात म्हणायचे नाही. मला फक्त हा मुद्दा अधोरेखित करायचा आहे की उपेक्षित व्यक्तीचे सांस्कृतिक भांडवल त्याच्या शैक्षणिक अनुभवावर दरक्षणी परिणाम करत असते. ही लढाई पुढे जॉब मार्केटमध्येसुद्धा आलेली असते.
शैक्षणिक धोरणात्मक पातळीवर या दृष्टीने अजूनही अंधार आहे. ‘सांस्कृतिक भांडवल’ हा काहीतरी समाजशास्त्रीय प्रकार म्हणून अजूनही फक्त अकॅडमिक चौकटीतच पाहिला जातो. सांस्कृतिक भांडवलाच्या फरकामुळे उपेक्षित विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये असतानाही उच्च शिक्षणाचा पुरेसा फायदा घेऊ शकत नाही, हे वास्तव मान्यच केले जात नाही. एकलव्यसारखी संस्था शिक्षण व्यवस्थेतली मोठी दरी दूर करण्यासाठी सकस काम करते; पण सामाजिक संस्था म्हणून मनुष्यबळ, अर्थपुरवठा, दूरवर पसरलेल्या उपेक्षित समूहांतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता नसणे, हे घटक आमच्या कामात नव्या प्रकारची आव्हाने तयार करत असतात. यासाठी सांस्कृतिक भांडवलाविषयी शिक्षणाच्या धोरणात्मक पातळीवर विचारमंथन होणे आवश्यक आहेच, पण त्यापुढला धोरणात्मक बदल करण्याकडे राजकारणी, समाजकारणी, विचारवंत, संशोधक यांनी एकत्रितपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
सांस्कृतिक भांडवलाच्या संदर्भात आणखी एक मोठा घटक म्हणजे भाषा. बहुतेक उपेक्षित समाजातून येणारे विद्यार्थी हे सरकारी शाळांत, मराठी माध्यमात शिकतात. अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची मोठी अडचण असते. जेव्हा मोठय़ा शहरांमधल्या मध्यमवर्गीय/ श्रीमंत , उच्चवर्णीय विद्यार्थ्यांच्या भाषेसमोर उपेक्षित समूहांतल्या विद्यार्थ्यांला उभे राहावे लागते तेव्हा समस्या तयार होतात. उपेक्षित समूहांतल्या विद्यार्थ्यांकडे वैशिष्टय़पूर्ण विचार आणि अनुभव असले तरी त्यांना भाषेच्या क्षमतेमुळे व्यक्त होता येत नसते. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये, विद्यापीठांत नक्की कोणत्या पद्धतीची भाषा वापरली पाहिजे? किंवा उपेक्षित समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता गृहीत धरून कोणत्या पद्धतीने शैक्षणिक कामकाज पुढे नेले पाहिजे? याविषयी फार कमी चिंतन दिसते. विशिष्ट समूहातून आलेले काही शिक्षक, प्राध्यापक उपेक्षित समाजातल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणतात आणि त्या पद्धतीने भाषेची अट लवचीक करून विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल, व्यक्त होता येईल, आणि शैक्षणिक संस्थांचा भाग आहेत अशी आपलेपणाची जाणीव त्यांच्या मनात होईल, अशी भूमिका घेतात.
याउलट, काही शिक्षक आणि शिक्षणसंस्था भाषेच्या आधारे, अगदी कठोर पद्धतीने उपेक्षित समाजातून आलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांवर दबाव तयार करतात. यामुळे, सुरुवातीच्या दिवसांतच मानसिक खच्चीकरण होऊन उपेक्षित समाजातील विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत मागे पडतात. कोणताही वंचित विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाची घृणा करत नाही. किंबहुना इंग्रजीमध्ये बोलता यावे यासाठी आग्रही असतो. आणि त्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न करण्याची तयारी असते. इथे फक्त प्रश्न असतो सुरुवातीच्या काळात शिकणे आणि सराव होणे यासाठी लागणारा वेळ त्यांना मिळण्याचा. जोपर्यंत मुख्य प्रवाहातले धोरणनिर्मितीवर प्रभाव असणारे लोक उपेक्षित समूहांतील विद्यार्थ्यांच्या दुर्लक्षित समस्यांकडे लक्ष देऊन, धोरणात्मक बदल करत नाहीत. तोपर्यंत उच्च शिक्षणाचा प्रवास हा खडतरच राहणार आहे. सांस्कृतिक भांडवलाचा अभाव किंवा वेगळय़ा भाषेत सांगायचे तर ग्रामीण उपेक्षित विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक भांडवलाला दिलेली शून्य किंमत यामुळे सामाजिक न्यायाची वेगळी गरज उच्च शिक्षणात तयार झालेली आहे आणि त्यावर धोरण बदल होणे आवश्यक आहे.
उपेक्षित समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘एकलव्य’मार्फत वर्षभराचे प्रशिक्षण, मेंटरशिप दिले जाते तेव्हा सांस्कृतिक भांडवलातून तयार होणारा न्यूनगंड, भाषा, वेगवेगळय़ा पद्धतीच्या भीती, आत्मविश्वासाचा अभाव या घटकांवर मुख्य लक्ष द्यावे लागते. तथाकथित स्पर्धात्मक शहरी शैक्षणिक वातावरणात आमचा पहिल्या पिढीतील शिकणारा विद्यार्थी कसा टिकून राहील? ही एक मोठी चिंता आमच्यासमोर नेहमी असते. सांस्कृतिक भांडवलात असलेले भेद लगेच मिटवता येणे अशक्यच. परंतु त्याची तीव्रता कमी करून शैक्षणिक अनुभव आनंददायक करणे, उपेक्षित समाजातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांच्या विकासाकडे पूर्ण लक्ष देणे हे प्राधान्याने बघावे लागते. आणि तशीच अपेक्षा शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांच्याकडूनही असते.