अमृत बंग

आजच्या युवांपुढचे खरे ‘स्वातंत्र्य’ कुठले – दारू पिण्याचे की दारूपासूनचे? लवकरच येऊ घातलेल्या सत्त्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आपल्या देशाच्या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग असलेल्या युवा पिढीने या प्रश्नावर विचार करणे आणि स्वत:ची निश्चित अशी भूमिका बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दारूविषयी वैयक्तिक व सामाजिक नीती काय असावी हा निव्वळ मतांचा विषय मानू नये. त्यापेक्षा, याबाबतचे विज्ञान व पुरावे काय सांगतात ते बघायला हवे :

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
cool motherhood for new generation children
इतिश्री : कूल मॉमगिरी

(१) ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस’ हा अख्ख्या जगातला सार्वजनिक आरोग्यावरील आजतागायतचा सर्वात मोठा अभ्यास असं सांगतो की, मृत्यू आणि अपंगत्वास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वात वरच्या कारणांपैकी, दारू पहिल्या सातमध्ये आहे. दारूशी निगडित कारणांमुळे प्रत्येक दहा सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

(२) जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल अँड हेल्थ’ अहवालानुसार जगभरामध्ये दरवर्षी सुमारे ३३ लक्ष लोक दारूमुळे मृत्युमुखी पडतात. काळजीची बाब म्हणजे प्रौढांच्या तुलनेत तरुणांवरच दारूचे जास्त परिणाम होतात. २० ते ३९ वर्षे वयोगटातील एकूण सर्व मृत्यूंपैकी १३.५ टक्के मृत्यू दारूमुळे होतात. दारूचा वापर हा दोनशेहून अधिक रोग आणि अपघात परिस्थितींना कारणीभूत ठरतो. दारूचे दुष्परिणाम फक्त पिणाऱ्यापुरते मर्यादित राहत नाहीत तर त्यापलीकडे व्यापक समाजावर देखील होतात, जसे की स्त्रियांवरील अत्याचार, गरिबी वाढणे किंवा रस्त्यांवरील अपघात. एकंदरीत, वैयक्तिक ग्राहक आणि इतर सगळय़ांसाठी, दारू हा बाकी कुठल्याही ड्रगपेक्षा अधिक हानिकारक पदार्थ आहे.

(३) इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने वर्गीकृत केल्यानुसार, दारू हा एक टॉक्सिक, सायकोअ‍ॅक्टिव्ह आणि अवलंबित्व निर्माण करणारा पदार्थ आहे आणि ‘ग्रुप वन् कार्सिनोजेन’ आहे. कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या अतिघातक पदार्थाच्या या गटात अ‍ॅस्बेस्टोस, तंबाखू आणि चक्क रेडिएशन यांच्या जोडीने दारूचा समावेश आहे. अन्ननलिका, यकृत, कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगासह सात प्रकारचे कर्करोग दारूमुळे संभवतात आणि जगात दरवर्षी ७.५ लाख नवीन कॅन्सर केसेस दारूमुळे होतात. दारू असलेले कोणतेही पेय, त्याची किंमत आणि गुणवत्ता काहीही असो, हे कर्करोग होण्याचा धोका निर्माण करतात.

(४) वंचित आणि आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा मागास लोकसंख्येमध्ये दारू-संबंधित मृत्यू, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि होणारे नुकसान हे जास्त आहे. त्यामुळे दारू ही सर्वसमावेशक विकासाची शत्रू आहे आणि वाढत्या सामाजिक विषमतेला कारणीभूत ठरते. म्हणूनच दारूच्या वापरावर मर्यादा आणणे याचा समावेश आता संयुक्त राष्ट्रांच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’मध्येही करण्यात आला आहे.

(५) अल्प प्रमाणात दारू घेतल्यानंतरही रोग आणि दुखापतीचा धोका वाढतो हे लक्षात घेता, विशेषत: तरुणांच्या आरोग्यासाठी दारू वज्र्य असणे हे सर्वोत्तम आहे असे आता वैज्ञानिक निर्देश आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ’मध्ये विधान प्रकाशित केले आहे की दारूच्या सेवनाचा विचार केला असता कुठलीही पातळी ही सुरक्षित नाही. ‘देअर इज नो सेफ लिमिट टू ड्रिंकिंग अल्कोहोल एक्सेप्ट झीरो’. ‘तुम्ही किती प्याल याने काही फरक पडत नाही – मद्यपान करणाऱ्यांच्या आरोग्याला धोका दारूच्या कोणत्याही पेयाच्या पहिल्या थेंबापासून सुरू होतो.’ असे जागतिक आरोग्य संघटनेच्या दारूविषयावरील सल्लागार डॉ. कॅरिना फेरेरा-बोर्जेस म्हणतात. दारू पिणे/न पिणे हा आता निव्वळ वैयक्तिक पसंतीचा किंवा नैतिकतेचा मुद्दा राहिलेला नाही. दारूच्या सेवनाचे समर्थन करणारे आणि कोविडची लस न घेणारे हे दोघेही सारखेच अवैज्ञानिक आहेत.

(६) दारूबाबतचे अद्यतन विज्ञान हे सांगत असताना भारतात, आपल्या अवतीभवती, आणि विशेषत: युवा पिढीमध्ये काय चित्र दिसते? आपण स्वतंत्र झाल्यापासूनच्या काळात प्रौढ भारतीयांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण हे सध्या सर्वोच्च पातळीवर आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अशा भारतीय प्रौढ पुरुषांमध्ये ‘हेवी एपिसोडिक मद्यपानाचे’ प्रमाण हे २८ टक्के  आहे. आपल्या देशात महिलांवर इतके बलात्कार आणि हिंसाचार का होतात याचे कारण समजणे अवघड नाही. ‘निर्भया’सारख्या अनेक निर्घृण घटनांतील गुन्हेगार हे दारू पिऊन तर्र होते असे आढळते. ‘लॅन्सेट’मधला एक अहवाल सांगतो की भारतामध्ये रुग्णालयांतील एकूण भरतीपैकी जवळपास २० टक्के रुग्णभरती दारूशी संबंधित समस्यांमुळे होते तसेच आपत्कालीन कक्षात नोंदवल्या जाणाऱ्या सर्व दुखापतींपैकी ६० टक्केंचे कारण दारूशी संबंधित असते. दारूच्या दुष्परिणामांचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवर किती मोठा भार पडतो याचं हे दर्शक आहे.

(७) दारू हा निव्वळ एक ‘फन प्रॉडक्ट’ वा ‘प्लेझर गुड’ नसून गंभीर सार्वजनिक धोका आहे, आधुनिक कॉलरा आणि प्लेग आहे. हे सत्य आपल्याला सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. हे वैज्ञानिक तथ्य आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि आपले मत दारूविरोधी बनू नये यासाठी महाकाय दारू कंपन्या जीव तोडून प्रयत्न करत असतात. दारूविषयी खोटी वा अर्धवट माहिती देणे, आणि समाजातील प्रचलित चालीरीती व समज बदलून मद्यपानाला ‘ग्लॅमरस’ रूप प्राप्त करून देणं हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. त्यातूनच दारू पिणे हे ‘कूल’ आहे, मॉडर्न आहे आणि जगण्याचा ‘नॉर्मल’ भाग आहे असा भास सगळीकडे आणि मुख्यत: तरुणाईमध्ये पैदा करण्यात मद्य कंपन्या कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. भारतासारख्या विशाल देशात, त्यातही युवा पिढीत (दीर्घकाळाचे गिऱ्हाईक हवे ना!) आणि मुले व मुली अशा दोघांतही दारूसेवनाचे प्रमाण वाढवावे ही आंतरराष्ट्रीय मद्य कंपन्यांची ठरवलेली मार्केटिंग नीती आहे. म्हणूनच खेळाडू, अभिनेते, सोशल मीडिया, चकचकीत जाहिराती, प्रायोजकत्व, इ.च्या माध्यमातून ‘दारू प्या – इट्स युअर लाइफ, मेक इट लार्ज’, असे सातत्याने भिनवले जाते आहे. फस्र्ट इयर असो वा फस्र्ट जॉब, ट्रिप असो वा फेस्ट, होळी असो वा थर्टीफस्र्ट, नैराश्य असो वा जल्लोष, लग्न असो वा ब्रेक-अप, कुठल्याही प्रसंगात दारू पिणे हे उत्तर व उत्सव साजरा करण्याची पद्धत असे आता सर्रास चालू झाले आहे.

(८)  मद्य कंपन्या करत असलेल्या ‘कल्चरल कन्डिशिनग’चे यशोशिखर म्हणजे लोकांना दारू पिता येणे हा त्यांच्या वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे अशा प्रकारे मांडणी करून मद्यसेवनाला स्वातंत्र्याच्या मुद्दय़ाशी, ‘फ्रीडम ऑफ चॉईस’शी जोडणे हा आहे. १९३० च्या दशकात जसे सिगारेट कंपन्यांनी स्त्रीवादाच्या ‘स्वातंत्र्याची मशाल’ असे म्हणून सिगारेटचे ब्रँडिंग केले व महिला धूम्रपानाला प्रोत्साहन दिले, तसेच मद्य कंपन्या आज अख्ख्या युवा पिढीच्या बाबतीत करताहेत. आणि दुर्दैवाने कॉलेज, नोकरी वा दैनंदिन जगण्यात पुरेसा आव्हानात्मक आणि अर्थपूर्ण ‘पर्पज’ सापडत नसलेले असंख्य युवा या बेगडी प्रचाराला भुलत आहेत.

(९) व्यक्तीच्या कुठल्याही निवड स्वातंत्र्याचे बौद्धिक कार्यान्वयन कोण करतो तर मेंदू. पण दारू ही नेमकी मेंदूवरच प्रभाव टाकते आणि फायदा-तोटा समजून घेऊन तर्कशुद्ध निवड करण्याच्या व्यक्तीच्या क्षमतेला पार खच्ची करते. पहिला पेग घेतल्यानंतर मेंदू नाही तर दारू निवड करते. दारूच्या बाबतीत, मुक्त निवडीची कल्पना एक मिथक आहे. मद्यसेवन करण्याआधी कंपन्यांच्या शक्तिशाली प्रचारतंत्राचा आणि त्यानंतर प्रत्यक्ष दारूचा आपल्यावर अंमल असतो. खरे निवडस्वातंत्र्य हे पिण्याचे नसून दारूपासून दूर राहण्यातच आहे. फिल्मस्टार्ससुद्धा जेव्हा मद्यपानाचे नसलेले स्वातंत्र्य वापरतात तेव्हा स्वत: तर त्याचे गुलाम बनतातच पण फूटपाथवर झोपणाऱ्या अनेकांना ‘थर्ड पार्टी डॅमेज’ करतात. मात्र अशा प्रसंगी अत्यंत चलाखीने दारू कंपन्या या दारूमुळे होणारे नुकसान हे जणू काही पिणाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे असे दर्शवतात आणि स्वत: नामानिराळे राहू पाहतात. जणू ‘दारू’ या उत्पादनामध्ये कोणतीही समस्या नाही, तर समस्या ही व्यक्तीच्या चारित्र्याची किंवा मद्यपचनक्षमतेची किंवा जबाबदारीने कसे प्यावे हे माहीत नसल्याची आहे,’ असे या कंपन्या भासवतात. ‘लॅन्सेट’चा रिपोर्ट मात्र सांगतो की भारतातील अध्र्याहून जास्त दारू पिणारे हे ‘धोकादायक मद्यपान’ या श्रेणीत मोडतात. दारू ही या पारतंत्र्याची केमिकल एजंट आहे.

(१०) वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबतीत दारूमुक्ती हेच खरे स्वातंत्र्य आहे! जिथे लोकांनी एकत्र येऊन दारूबंदी लागू केली अशा महाराष्ट्रातील पहिल्या जिल्ह्यात मी राहात असल्याने अनेक अंशांनी हे स्वातंत्र्य मी अनुभवतो. त्या आंदोलनाचा भाग म्हणून १९९३ साली, इ. तिसरीत असताना, आमच्या कुटुंबाच्या तीन पिढय़ांसोबत तुरुंगामध्ये जायची संधी मिळाली हा माझ्या आयुष्यातल्या सर्वात अभिमानाच्या प्रसंगांपैकी एक! दारूविषयी माझी नेमकी मनोभूमिका त्या दिवशी निश्चित झाली, मी स्वतंत्र झालो.

दारूबाबतचे विज्ञान समजल्यानंतर आता आपले युवा काय ठरवणार?

सुप्रसिद्ध हिंदी कवी  हरिवंशराय बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ कवितेपासून प्रेरणा घेऊन मी सर्व युवामित्रांना आवाहन करतो :

स्वास्थ्य का विनाश है, मृत्यु का ये पाश है,

नशासे दूर रहने की कर शपथ,

कर शपथ, कर शपथ,

मुक्तिपथ, मुक्तिपथ, मुक्तिपथ! 

Story img Loader