‘‘समाजात सर्वच लोक जातीयता नष्ट करा म्हणतात, मोठमोठी लांबलचक व्याख्यानेही देतात, पण त्याप्रमाणे वागताना दिसतात का? ते तर आपल्याच जाती, गट व पक्षाकरिता अहोरात्र काम करतात. आपलेच वर्चस्व असले पाहिजे नाहीतर आपल्याला समाजात कोणी विचारणार नाही, असे म्हणून समाजात भरमसाट खराखोटा व्यवहार करतात. मग आम्हीही तसेच का करू नये? काय आमचा जीव नव्हे की आम्हाला सुखदु:ख नाही की भोगलालसा नाही?’’ असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एका चिकित्सक व्यक्तीने सन १९४९ मध्ये केला.

त्यावर उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘तू म्हणतोस त्याहीपेक्षा निगरगट्ट लोक या दुनियेत आहेत. आपल्या इंद्रियपूर्तीसाठी, छानछौकीसाठी चोऱ्या करण्याचीही त्यांना शरम वाटत नाही. अशा स्थितीत आपल्या जाती व गटाकरिताच कार्य करणारे लोक आढळले तर त्यात काही नवल नाही. पण माणसाच्या बुद्धिमत्तेच्या पावित्र्याच्या व हृदयाच्या विकासाचा मात्र हा मार्ग नव्हे. तो जिवाच्या आकुंचिततेचा एक कप्पा आहे. अशी स्वार्थी व आकुंचित वृत्तीची माणसे मानवाच्या जातीतली समजली जात नसतात. हा मानवाचा आदर्श नव्हे. या अफाट देशात जो जो या देशाचा घटक म्हणून जन्माला येतो त्याने आपली मते गटापुरती, जातीपुरती मर्यादित ठेवावीत हा आपल्या विशाल ध्येयाच्या संस्कृतीचा अपमान आहे! मानवद्रोह आहे! ईश्वराशी विश्वासघात आहे. ज्यांचा आचार विशाल दृष्टीचा व विचारसरणी व्यापक असते तोच मोठा पुरुष गणला जातो. जे एकटय़ालाच आवडणारे स्वार्थी कृत्य असेल ते मोठे गणले जाणार नाही. आपली जात म्हणजे देश नव्हे, धर्म नव्हे व आपला विशिष्ट गट व पंथ म्हणजे विश्व नव्हे. त्यापुरतेच जेवढे कार्य असेल ते साधारण जिवाचे कार्य होय. ते जर देशाच्या आड येत असेल तर ते जिवंत ठेवणे मानव्यवृत्तीचे कार्य नव्हे.’’

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Muslims of Mumbra on streets to protect Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

‘‘जगात अशी कोणतीच मोठी वस्तू नाही की जी जात पाहून उपकार करते. जी गोष्ट स्वत:ला हवी तीच जगातील प्रत्येकाला मिळावी. ज्या माझ्या भावना आहेत त्याच जगालाही आहेत, असे समजून न्यायाने, सत्याने व मानव्याच्या अंत:करणाने वागणाराच सेवक समजला जातो. असे सेवक माझे आहेत व याविरुद्ध आचरण करणारे देशद्रोही समजले पाहिजेत. माणसाने स्वार्थी व आकुंचित वृत्तीच्या कार्यासाठी आपली बुद्धी कधीच गहाण ठेवू नये. नेहमी थोरांच्या वचनाप्रमाणे वागावे. त्यांच्याच सेवेकरिता मरावे व अमर व्हावे, यातच खरे सुख आहे. तेव्हा माझे ऐकावयाचे असल्यास आता जातीपातींच्या फंदात पडू नकोस. आपली जात मानवाची. आपला धर्म देश-संस्कृतीचे रक्षण करणे व आपले कर्म प्रत्येकाला पोटभर अन्न, अंगभर कपडा मिळून मानाने जगता येईल अशी स्थिती निर्माण करणे. याच गोष्टींची आज अत्यंत गरज आहे. महाराज ग्रामगीतेत म्हणतात-

सेवा नसावी प्रतिष्ठेपुरती।
सेवक नव्हे तो जो आपस्वार्थी।
बिघडविल जनजीवनाची शांती।
दुष्परिणामी सेवेने।।

राजेश बोबडे

Story img Loader