चिनी शासनानेही मग रिचर्ड चँगच्या चीनमध्ये ‘सिलिकॉन फाऊंड्री’ उभारण्याच्या प्रस्तावाचे महत्त्व ओळखून निर्णय घेण्यात जराही दिरंगाई केली नाही…
रिचर्ड चँग हा चीनमध्ये जन्मलेला, तैवानमध्ये वाढलेला आणि सेमीकंडक्टर उद्याोगातील अमेरिकी दिग्गज. टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये (टीआय) दोन दशकांपेक्षाही अधिक अनुभव असलेला चिपनिर्मितीमधला तज्ज्ञ. २१ व्या शतकाच्या पूर्वसंध्येला, २००० साली जेव्हा तो चीनमध्ये ‘सिलिकॉन फाऊंड्री’ उभारण्याचा प्रस्ताव घेऊन चिनी राज्यकर्त्यांकडे आला तेव्हा त्यांना चँगचा प्रस्ताव नीट समजून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर दिसत नव्हता. माओच्या कालखंडापासून थिजलेल्या अवस्थेत खितपत पडलेल्या चीनमधल्या सेमीकंडक्टर क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी हा प्रस्ताव सुवर्णसंधी ठरू शकेल अशी शिफारस या प्रस्तावाची छाननी करणाऱ्या समितीने केली होती.
१९८० ते २००० या दोन दशकांत नवे राष्ट्राध्यक्ष डेंग झ्याओपिंग यांच्या नेतृत्वाखाली आधुनिकीकरणाची कास धरून व आपली अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुली करून चीनने औद्याोगिकीकरणात पुष्कळ मजल मारली. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चीन उत्पादन क्षेत्रामधील एक जागतिक केंद्र बनला होता व शांघाय किंवा शेंझेनसारख्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जुळवणी – चाचणीचे (असेम्ब्ली – टेस्ट) मोठे कारखाने उभे राहत होते, पण एवढ्यावरच समाधान मानण्याची चिनी राज्यकर्त्यांची मानसिकता नव्हती. इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीच्या संपूर्ण शृंखलेत जुळवणी – चाचणी प्रक्रिया सर्वात शेवटच्या पायरीवर येत असल्यामुळे, रोजगारनिर्मिती पुष्कळ होत असली तरी संपूर्ण निर्मिती प्रक्रियेत होणाऱ्या नफ्याचा एक छोटा हिस्सा या केंद्रांना – आणि त्यावरच्या करांद्वारे सरकारला – मिळतो. या उपकरणांना कार्यक्षम बनवणाऱ्या घटकांची (विशेषत: सेमीकंडक्टर चिप) निर्मिती चीनमध्ये केल्याशिवाय या प्रक्रियेत अधिक मूल्य असणाऱ्या पायऱ्यांवर चढणं कधीही शक्य होणार नाही याची जाणीव चिनी राज्यकर्त्यांना होती.
हेही वाचा >>> चिप-चरित्र: माओनं चेपलेल्या चीनची चिपकथा
चिपनिर्मिती तंत्रज्ञान व क्षमतेच्या दृष्टीने विचार केला तर चीन अमेरिका तर सोडाच, पण त्याचे शेजारी दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर, मलेशिया यांच्याही कित्येक दशके मागे होता. अमेरिका किंवा जपानचे चिपनिर्मिती तंत्रज्ञान चीनमध्ये आणण्यासाठी चीनने बहुराष्ट्रीय चिपनिर्मिती कंपन्यांना चीनमध्ये कारखाने उभारण्यासाठी विविध प्रकारच्या करसवलती, सरकारी अनुदानं यांची खैरात करून पायघड्या घालायला सुरुवात केली, पण त्यातून मर्यादित स्वरूपाचेच यश मिळाले.
यातील उल्लेखनीय भागीदारी म्हणजे जपानच्या एनइसी कॉर्पोरेशनबरोबरच्या संयुक्त उपक्रमातून सरकारने शांघायमध्ये उभारलेला चिपनिर्मितीचा कारखाना (फॅब)! यातून चीनमध्ये खऱ्या अर्थाने घाऊक स्वरूपात चिपनिर्मिती तर सुरू झाली, पण त्याउपर काही विशेष लाभ पदरात पडून घेता आला नाही. एनईसीने चिपनिर्मिती तंत्रज्ञान तर चीनमध्ये आणले, पण कळीच्या जागांवर जपानी तंत्रज्ञांची नेमणूक करून आणि चिनी कामगारांना केवळ काही निम्नदर्जाचे, प्रथामिक काम सोपवून हे तंत्रज्ञान चिन्यांच्या हाती लागणार नाही याची खबरदारीही घेतली.
यातून बोध घेत मग चीनने कोणा एका कंपनीच्या मागे लागण्यापेक्षा देशी राजकारणी व परदेशस्थ उद्याोजकांची मदत घेण्याचे ठरवले. यातूनच पुढे ‘ग्रेस सेमीकंडक्टर’ ही कंपनी स्थापन झाली. तत्कालीन चिनी अध्यक्ष जिआंग झेमिन यांचे पुत्र जिआंग मियाचेंग, तैवानी उद्याोजक विन्स्टन वांग आणि तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे धाकटे बंधू नील बुश या महानुभावांना एकत्र आणून या कंपनीची निर्मिती करण्यात आली. सेमीकंडक्टर तंत्रज्ञान व उद्याोग जिथे सर्वात पुढारलेल्या स्थितीत आहेत अशा तैवान आणि अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणण्याचा राजकीय शहाणपणा चीनने दाखवला असला तरीही एका बाबतीत मात्र चीनने गल्लत केली. या तिघांपैकी एकालाही चिप कंपनी चालवण्याचा पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे पुष्कळ प्रयत्नांनंतरही ‘ग्रेस’ सेमीकंडक्टर चिपनिर्मितीत विशेष मजल मारू शकली नाही.
या पार्श्वभूमीवर रॉबर्ट चँग शतप्रतिशत चिनी सिलिकॉन फाऊंड्री उभारण्याचा प्रस्ताव घेऊन आला तेव्हा आपला प्रस्ताव चिनी धोरणकर्त्यांच्या गळी उतरवण्यात त्याला फारसे कष्ट पडले नाहीत. कारण तोपर्यंत त्यांना कळून चुकले होते की चीनला सेमीकंडक्टर क्षेत्रात भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी अमेरिकी, तैवानी किंवा जपानी कंपन्यांवर अवलंबून राहण्याने काहीही साध्य होणार नाही. एखाद्या चिनी कंपनीलाच ते कार्य हाती घ्यावं लागेल. आणि यासाठी रॉबर्ट चँगसारखा सर्वार्थाने योग्य माणूस चीनला शोधूनही सापडला नसता.
टीआयमध्ये चँगने आपल्या कामाचा श्रीगणेशाच इंटिग्रेटेड सर्किटचा (आयसी) शोध लावणाऱ्या जॅक किल्बीबरोबर केला होता. टीआयमधल्या आपल्या दोन दशकांच्या कारकीर्दीत चिप आरेखन व निर्मितीच्या सर्व प्रक्रियांमध्ये त्याने योगदान दिले होते, पण त्यातही त्याने विशेष प्रावीण्य संपादन केले होते, चिपनिर्मिती कारखान्याच्या (फॅब) उभारणीत व त्याच्या परिचालनात! केवळ अमेरिकाच नव्हे तर टीआयच्या जपान, सिंगापूर, युरोपमधल्या फॅबच्या मुख्य परिचालन अधिकाऱ्याचे (सीओओ) पद त्याने अनेक वर्षे भूषवले होते व त्याच्या आधिपत्याखाली त्या कारखान्यांनी तंत्रज्ञानात पुष्कळ प्रगतीही करून दाखवली होती. बालपणापासूनच आपला अधिकांश वेळ चँगने चीनबाहेरच व्यतीत केला असला तरीही आपल्या मायदेशाप्रति त्याला ममत्व नक्कीच होते. या क्षेत्रातील आपल्या कौशल्याचा आणि अनुभवाचा फायदा चीनला करून देण्याच्या भूमिकेतून त्याने फाऊंड्रीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला.
चिनी शासनानेही या प्रस्तावाचे महत्त्व ओळखून निर्णय घेण्यास जराही दिरंगाई केली नाही आणि २००० सालीच चँगने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन (एसएमआयसी) या सिलिकॉन फाऊंड्रीची स्थापना केली. फाऊंड्री उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवलापैकी ५० टक्के भांडवल विविध अमेरिकी व जपानी कंपन्यांनी (गोल्डमन सॅक्स, मोटोरोला, तोशिबा वगैरे) पुरवले होते, तर उर्वरित रक्कम चिनी शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळाली होती.
एसएमआयसीच्या कार्यक्षम परिचालनासाठी सुरुवातीपासूनच चँगने दोन घटकांवर भर दिला होता – १) इतर चिनी चिपनिर्मिती कंपन्यांप्रमाणे एसएमआयसीच्या परिचालनासाठी सरकारी मदतीवर अवलंबून राहायचे नाही, कारण फाऊंड्रीचे यश हे केवळ तांत्रिक श्रेष्ठतेवर ठरत असते. एसएमआयसी यशस्वी होणे हे चीनसाठी आत्यंतिक महत्त्वाचे असल्याने साहजिकच तिलाही विविध स्वरूपाची सरकारी मदत मिळाली. कंपनी करातून पाच वर्षांसाठी मुक्तता, विक्रीकरात सवलत, अनुदान स्वरूपात मिळालेले सुरुवातीचे भांडवल असा सरकारी मदतीचा हात एसएमआयसीला विविध प्रकारे मिळाला. कंपनीने त्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग नक्कीच करून घेतला, पण त्यावर अवलंबून कधीच राहिली नाही.
२) एसएमआयसीचे परिचालन हुबेहूब टीएसएमसी या सर्वात यशस्वी फाऊंड्रीप्रमाणे करायचे. चिपनिर्मिती क्षेत्राच्या परिभाषेत ‘कॉपी एक्झॅक्ट्ली’ हा वाक्-प्रचार बराच प्रचलित आहे. चिपनिर्मिती प्रक्रियेत तावूनसुलाखून निघालेल्या एखाद्या अत्यंत यशस्वी उप-प्रक्रियेची हुबेहूब नक्कल सर्व कारखान्यांत सर्व प्रकारच्या चिपनिर्मितीसाठी करायची असा याचा ढोबळ अर्थ आहे. एसएमआयसीने ‘कॉपी एक्झॅक्ट्ली’ पद्धतीचा तंतोतंत अवलंब पूर्ण कंपनीच्या परिचालनासाठी केला. टीएसएमसीप्रमाणेच मग एसएमआयसीने आपलं किमान एक तृतीयांश मनुष्यबळ तैवान, दक्षिण कोरियामधून (विशेषत: ज्यांना टीएसएमसी, युएमसी, सॅमसंगसारख्या फाऊंड्रीमध्ये पूर्वानुभव होता) नियुक्त केलं. एएसएमएल, अप्लाईड मटेरिअल्सकडून सर्वोत्कृष्ट उपकरणं आयात केली आणि स्थानिक चिनी तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर प्रचंड मेहनत घेतली. सरकारी अनुदानं व करसवलतींमुळे मिळणाऱ्या पैशाचा कंपनीने वरील सर्व कारणांसाठी विनियोग केला.
२०१० पर्यंत चँगच्या वरील धोरणांचा यथायोग्य परिणाम दिसून यायला सुरुवात झाली. चिप उत्पादनामध्ये अत्युच्च गुणवत्तेचा आग्रह, अद्यायावत तंत्रज्ञान व ते वापरू शकणाऱ्या कुशल स्थानिक मनुष्यबळाचा अवलंब आणि किफायतशीर पद्धतीने घाऊक प्रमाणातील चिपनिर्मितीची क्षमता या त्रिसूत्रीवर एसएमआयसी जगातील आघाडीच्या सिलिकॉन फाऊंड्रीमध्ये गणली जाऊ लागली. आज एसएमआयसी चीनमधील सर्वात मोठी फाऊंड्री आहे व तिचा चिपनिर्मितीमधला जागतिक बाजारहिस्सा हा जवळपास आठ टक्क्यांकडे आहे. फाऊंड्री उद्योग, जो आज अनेक देशांतील विविध कंपन्यांमध्ये विखुरलेला आहे, तिथे या उद्याोगात पुष्कळ उशिरा प्रवेश करूनही एसएमआयसीची कामगिरी उल्लेखनीय आहे.
पण चीनची चिपकथा इथेच पुरी होत नाही. २०१३ मध्ये विद्यामान अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची निरंकुश सत्ता स्थापन झाल्यापासून चीनच्या सर्वच क्षेत्रांतील महत्वाकांक्षेला नवे आयाम प्राप्त झाले तिथे सेमीकंडक्टरसारखे हाय-टेक क्षेत्र कसे काय अपवाद ठरेल? जग पादाक्रांत करायला निघालेल्या या नव्या चीनचे चिप-उद्योगावर भू-राजकीय परिप्रेक्ष्यातून आजवर काय परिणाम झाले व भविष्यात काय होऊ शकतील याची चर्चा पुढील सोमवारी!
चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.