सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गुरुकुंज आश्रमाला भेट दिली, तेव्हा शैक्षणिक सुधारणांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्याशी विचारविनिमय अनेकदा केला. नैतिक शिक्षणाचा ठरावीक तास आजच्या शिक्षणक्रमात समाविष्ट करण्यात आला असला, तरी केवळ त्याने विद्यार्थ्यांवर परिणाम होईलच असे म्हणता येत नाही असे स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : त्यासाठी अध्यापकाचा उज्ज्वल व प्रभावी आदर्शच विद्यार्थ्यांसमोर राहिला पाहिजे. म्हणूनच या दृष्टीने आधी शिक्षकांनाच शिक्षण देण्याची तीव्रतेने गरज भासत आहे. आजच्या शिक्षणात काही भाग चांगला असला तरी बराचसा भाग अनावश्यक आहे – जीवनास निरुपयोगी आहे. त्याऐवजी स्वीकाराव्यात अशा गोष्टी कोणत्या आहेत? गुरुदेवमंडळाने ठरवलेले कार्यक्रम यांचा या दृष्टीने उत्तम उपयोग होऊ शकतो; जरी त्यांचे खोल शास्त्र अद्याप लिहिले गेलेले नसले तरी जीवनावर संस्कार घडविणाऱ्या दिनचर्येवर जोर देणे प्रथम आवश्यक आहे. त्या गोष्टी लहान वाटतात, पण एकदा ते चुकले की सर्वच चुकत जाते, एवढे त्यांचे महत्त्व आहे! सरळपणा, सात्त्विक राहणी यांची शक्ती अशी आहे की, त्यांचा प्रभाव न बोलताच इतरांवर पडतो. शिवाय राष्ट्रजीवनावर त्याचे फार इष्ट परिणाम होतात. सध्या जगच उपभोगाकडे धाव घेत आहे. दुसरीकडे, उत्पादक व्हायला-श्रम करायला कोणीच तयार नाही. काही अर्थशास्त्रवेत्ते देखील या दृष्टीने चिंतेत आहेत.
चिंतनधारा: ‘शिक्षक म्हणजे गुरू’ – हे कसे घडेल?
सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गुरुकुंज आश्रमाला भेट दिली, तेव्हा शैक्षणिक सुधारणांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्याशी विचारविनिमय अनेकदा केला.
Written by राजेश बोबडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-09-2023 at 02:42 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhar teacher is guru how will this happen rashtrasant tukdoji maharaj amy