राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जनमानसावरील प्रभाव पाहता विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंपसाठी महाराजांकडे सहकार्य मागितले. भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढींचा नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाल्याने सर्वधर्मसमभाव मानत असतानाही महाराजांनी याला होकार दिला. महाराजांना १९६४ मध्ये पवईच्या सांदिपनी आश्रमातील संस्थापकीय सभेत विश्व हिंदू परिषदेचे सल्लागार म्हणून निवडण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना महाराज म्हणतात : मी सर्व धर्माना मानतो. पण याचा अर्थ माझ्या धर्माचा अभिमान मी सोडून द्यावा असा मुळीच नाही. हिंदू धर्माचा गाभा मानवता आहे. पूर्वीच्या काळातील वर्णव्यवस्था आता टिकणारी नसून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा काळ आला आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी घालवून चांगल्या प्रथा पाडण्याचा चंग बांधला पाहिजे. हिंदूंमध्ये एकतेची भावना दृढ होण्यासाठी सर्वाना सारखे संस्कार आले पाहिजेत. शास्त्रे आणि विद्या मुलांना सोप्या पद्धतीने शिकविण्यात यावे. श्रद्धा, भक्ती, विश्वास व आपापले कर्तव्यकर्म हाच श्रेयस्कर वर्णाश्रमधर्म आहे याचे आवाहन करण्यात यावे. हिंदू धर्म व्यक्तिनिष्ठ नसून समाजनिष्ठ आहे. त्यानुसार हिंदू धर्मशास्त्राचे संदर्भ लक्षात घेऊन आवश्यक तो बदल करायला पाहिजे. हे काम विश्व हिंदू परिषदेने करावे. या विचारांच्या संकल्पानेच मी या संघटनेचे सल्लागारपद स्वीकारले.
चिंतनधारा: विश्व हिंदू परिषदेने हे काम करावे..
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जनमानसावरील प्रभाव पाहता विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंपसाठी महाराजांकडे सहकार्य मागितले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-12-2023 at 02:36 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhara rashtrasant tukdoji maharaj influence on the public mind amy