एका माणसाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रश्न केला ‘‘महाराज, निद्रा/ भूक/ पैसा वगैरे गोष्टी अशा आहेत की, त्याशिवाय माणसाचे भागत नाही आणि त्यांच्या अभावी जीवाला त्रास होतो. तुम्ही ‘प्रार्थना करा’ म्हणता, पण प्रार्थना न केल्याने माणसाला त्रास होत नाही; तेव्हा ती मूलभूत गरजेची गोष्ट आहे असे का समजावे?’’ त्यावर महाराज म्हणतात : विशिष्ट तऱ्हेच्या भोजनाचाही विषय, ही तू लावलेली सवयच आहे. एखाद्याला दारूचे व्यसन लागले म्हणजे मग ते सुटणे फार कठीण असते; पण व्यसन हे सुरुवातीला लावावे लागते. विडीच्या उदाहरणावरून कित्येकांना हीच गोष्ट पटेल. प्रार्थनेची नितांत आवश्यकता, प्रार्थनेचे जीवनावश्यक तत्त्व माणसाला अंत:करणापासून पटले आणि त्याप्रमाणे त्याचे आचरण सुरू झाले की, मग ती सवय या सर्व व्यसनांपेक्षा अत्यंत बलवत्तर होते. स्नान न केल्याने जसा माणूस मरत नाही, पण स्नान केल्याशिवाय त्याला बरेही वाटत नाही म्हणजे शरीराला व मनाला बेचैनी वाटते, तसेच प्रार्थनेशिवाय साधकाला वाटत असते.

आपण म्हणाल की, सामुदायिक प्रार्थनेपासून आम्हाला असे कधी वाटले नाही. त्याला उत्तर असे आहे की, तुमची ही प्रार्थना अगदीच प्रारंभीच्या वर्गाची आहे. हा केवळ आरंभ आहे. अजून तुम्हाला प्रार्थनायोगात शिरावयाचे आहे. प्रार्थनेशिवाय आपण जगूच शकत नाही, असे वाटणे म्हणजेच खरी प्रार्थना साधणे होय! अशी मनाची परिस्थिती झाली म्हणजे माणूस कोणत्याही परिस्थितीत प्रार्थनेच्या वेळी त्या कार्यक्रमास सादर होतो. कित्येक लोक संस्थाप्रेमासाठी तर कित्येक व्यक्तीप्रेमासाठी प्रार्थना करतात; पण प्रार्थनेचे खरे मर्म लक्षात न घेता असे काही करणे ही भूल आहे. प्रार्थनेने खरी विश्रांती मिळते किंवा नाही, हे काही अनुभवाने ठरवा व मग आत्मसमाधानासाठी ते साधन अंगीकृत करा. प्रार्थनेचा विषय हा मानवाला जन्मोजन्मी सुख देणारा व त्याचा सर्वागीण विकास करणारा आहे हे विसरून चालणार नाही. मनुष्य हा जोपर्यंत विषयासक्त आहे तोपर्यंत तो देहाला विसरत नाही व जोपर्यंत देहविस्मृती होत नाही तोपर्यंत तो मुक्त होत नाही हा सिद्धान्त आहे. प्रार्थना करणे हा जीवाचा परमधर्म असून प्रत्येक जीवाचा तो हक्क आहे. त्याला जाती, वंश, धर्म व वर्ग आदीचे मुळीच बंधन नाही. दिव्यावर झडप घालून जसे पतंगाने आत्मसमर्पण करावे तसे या प्रार्थनेचे, त्यागाचे स्वरूप आहे, हे मात्र कोणीही विसरू नये. असा एक जरी ध्येयवादी मनुष्य एका मंडळात असला तरी ते मंडळ आपले ध्येय काही अंशी साधू शकेल. एरवी फार मोठी संख्या असली व त्यागी माणसांचा अभाव असला तर प्रार्थना श्रेयस्कर ठरणार नाही.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”

महाराज सामुदायिक प्रार्थनेत म्हणतात :
है प्रार्थना गुरुदेवसे,
यह स्वर्गसम संसार हो।
अति उच्चतम जीवन बने,
परमार्थमय व्यवहार हो ।।
तुझ में नहीं है पंथ भी,
ना जात भी, ना देश भी ।
तू है निरामय एकरस,
है व्याप्त भी और शेष भी।।

राजेश बोबडे

Story img Loader