एका माणसाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रश्न केला ‘‘महाराज, निद्रा/ भूक/ पैसा वगैरे गोष्टी अशा आहेत की, त्याशिवाय माणसाचे भागत नाही आणि त्यांच्या अभावी जीवाला त्रास होतो. तुम्ही ‘प्रार्थना करा’ म्हणता, पण प्रार्थना न केल्याने माणसाला त्रास होत नाही; तेव्हा ती मूलभूत गरजेची गोष्ट आहे असे का समजावे?’’ त्यावर महाराज म्हणतात : विशिष्ट तऱ्हेच्या भोजनाचाही विषय, ही तू लावलेली सवयच आहे. एखाद्याला दारूचे व्यसन लागले म्हणजे मग ते सुटणे फार कठीण असते; पण व्यसन हे सुरुवातीला लावावे लागते. विडीच्या उदाहरणावरून कित्येकांना हीच गोष्ट पटेल. प्रार्थनेची नितांत आवश्यकता, प्रार्थनेचे जीवनावश्यक तत्त्व माणसाला अंत:करणापासून पटले आणि त्याप्रमाणे त्याचे आचरण सुरू झाले की, मग ती सवय या सर्व व्यसनांपेक्षा अत्यंत बलवत्तर होते. स्नान न केल्याने जसा माणूस मरत नाही, पण स्नान केल्याशिवाय त्याला बरेही वाटत नाही म्हणजे शरीराला व मनाला बेचैनी वाटते, तसेच प्रार्थनेशिवाय साधकाला वाटत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा