आपला परिचय सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘तुकडय़ाने तुकडे जोडे ना जुदा देखा कोई।’’प्रमाणे मी सर्व लहान-मोठय़ा तुकडय़ांना जोडून त्यांना पूर्णत्व प्राप्त करून देण्याचा, प्रत्येक गोष्टीतून चांगले शोधण्याच्या आशेने उत्साहाने प्रयत्न करत असतो. म्हणूनच माझे नाव तुकडय़ादास आहे. मी सर्वाचा आहे, सर्वासाठी आहे.’’

‘‘काहींना मी राष्ट्रपती भवनात भारताच्या भवितव्यावर चर्चा करताना दिसलो, काहींना निष्पाप भक्तांमध्ये प्रेमाने वेडा झालेला दिसलो. मी विविध धर्म, पंथ आणि पंथाच्या लोकांसाठी किती कार्यक्रमांना हजेरी लावली आणि किती लोकांना भेटलो, बोललो किंवा खेळलो हे सांगता येणार नाही! हाच फक्त माझा परिचय आहे. शेवटी वाहत्या वाऱ्याचा परिचय दुसरा काय असू शकतो? प्रत्येक बागेतली झाडे डोलत राहावीत, पक्ष्यांनी किलबिलाट करत राहावे आणि फुलांनी बहरत राहावे, हेच तर तिला हवे असते.’’

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
pakistani celebrated diwali
Video : पाकिस्तानी सेलिब्रिटींनी ‘अशी’ साजरी केली दिवाळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
aishwarya narkar shares diwali padwa video
नारकर जोडप्याचा दिवाळी पाडवा! अविनाश यांनी बायकोला काय गिफ्ट दिलं? ऐश्वर्या व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
rajeshwari kharat new photo in wedding outfit netizens confused
“आम्हाला वेड्यात काढू नका”, जब्या-शालूचा लग्नाचा फोटो पाहून नेटकरी संभ्रमात; अनेकांनी केलं ट्रोल
Video : सायकलवरील ताबा सुटल्याने तरूणाचा मृत्यू

‘‘माझे जीवनही हे झरझर वाहणाऱ्या नदीप्रमाणे आहे, जिला आजूबाजूला लहान-मोठय़ा वृक्षलता उगवलेल्या पाहायची उत्सुकता आहे, सर्व प्राणिमात्रांना आनंदी पाहायचे आहे, नापीक मातीही हिरवीगार बनवायची आहे आणि काठोकाठचा खड्डाही तिला नम्रतेने भरायचा आहे. साऱ्या जगाची घाण धुतली जावी, काठावरील प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र व्हावे आणि आयुष्याचा प्रत्येक थेंब उपयुक्त ठरून देश समृद्ध व्हावा, अशी नदीची इच्छा असते. हे ध्येय गाठूनही ती सतत वाहतच राहते, सागराला भेटतच राहते. रात्रंदिवस गाऊन तिला सर्वाना जागवायचे असते. असेच माझे ध्यान व प्रवाही जीवन आहे. मी भारताचा प्रवासी आहे. माझा प्रवास माझ्या जन्मापासून सुरू झाला. या प्रवासात, मी नेहमी लहान तीर्थाना भेट दिली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला निषेध आणि प्रतिष्ठेचे अवडंबर मुळीच आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत सत्य शोधणे हे माझे काम आहे; मग ते मंदिर असो वा मशीद, तुटलेली मूर्ती असो किंवा प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती! प्रत्येक धर्माच्या खऱ्या मूल्यांकडे मी पाहतो. कोणी कोणत्याही पंथाचा प्रवासी असो वा नास्तिक, कोणत्याही धर्माचा प्रवर्तक असो वा परदेशातील नेता, देशभक्त असो वा योगी असो, मी त्याच्यातील सत्याचा शोध घेत असतो आणि सर्वाचा आदर करतो.’’

‘‘जेव्हा मी या देशातील संतांना पंथांच्या नावावर आपसात भांडताना पाहतो, तेव्हा मला वाटते की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संकुचित ठेवण्याचा स्वार्थ  साधला, मात्र त्यांना परमार्थाचे ज्ञान दिले  नाही. जेव्हा मी विविध धर्माच्या लोकांची भांडणे पाहतो, तेव्हा मला वाटते की हे एक कुटिल राजकारण आहे. खरा धर्म दोनपैकी एकालाही माहीत नाही.’’ महाराज आपल्या वचनात म्हणतात,

मेरे लिये निह साक्ष है,

मैं साक्ष का भी साक्ष हूँ।

सर्वज्ञ हूँ! सर्वत्र हूँ!

निह पथ, मै निरपेक्ष हूँ।

मेरे लिये निह  बंध है,

निह मोक्ष का भी है पता।।

राजेश बोबडे