अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील समर्थ आडकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू. आज (त्रिपुरारी पौर्णिमा) त्यांची १०२ वी पुण्यतिथी आहे. तुकडोजी महाराजांच्या आई मंजुळादेवी यांचे माहेर वरखेड असल्याने त्यांचे चौथ्या इयत्तेचे शिक्षण येथेच झाले. महाराजांचे बालपण आडकोजी महाराजांच्या सान्निध्यात गेले. पुढे १९२१च्या कार्तिकी पौर्णिमेला मुजाबुवांच्या मंदिरात ध्यानस्थ तुकडोजी महाराजांना, आडकोजी महाराजांनी आपली आठवण केल्याची चेतना झाली व लगबगीने ते आडकोजींना भेटण्यासाठी गेल्यावर आडकोजी महाराज प्राण त्यागत असल्याचे महाराजांनी जाणले. आडकोजी महाराजांनी निर्वाणसमयी तुकडोजी महाराजांकडे नेत्र केंद्रित करून निमिषमात्रात आपला देह त्यागला. सेवकांनी त्यांना समाधिस्थ केले. याचे वर्णन

समाधिस्थ सम्यक काली।

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

तुकडय़ाची आठवण केली ।

दिव्यदृष्टी स्थिरावली। अपुल्या वारसावरी।।

असे महाराज करतात. एकदा आडकोजी महाराजांसमोर तुकडोजी महाराजांनी अभंग म्हणताना शेवटी ‘तुका म्हणे’ अशा छापेचे भजन म्हटले, त्यावर आडकोजींनी ‘‘तुका म्हणे’.. तू का म्हणे? ‘तुकडय़ा म्हणे’ म्हण!’ अशी दिलेली प्रतिक्रिया हा गुरुमंत्रच आपल्यासाठी आहे हे जाणून महाराजांनी पुढे ‘तुकडय़ा म्हणे’ या छापाच्या रचना अजरामर  केल्या. तुकडोजी महाराज गुरुकृपेबद्दल भजनात म्हणतात.

गुरुदेव सद्गुरु आडकोजी ने कृपा-सिंचन किया।

‘तुम भी भजन लिखते रहो’ आशीष यह मुझको दिया ।।

तबसे भजन-लेखन बढा, इस हाथसे सम्हले नही।

गंगा-प्रवाहित वाक्यरचना सहजही होती गयी ।।

आडकोजी महाराजांचा स्मृतिदिन ‘प्रार्थना दिन’ म्हणून महाराज साजरा करत. स्मृतिदिनी महाराज म्हणतात श्रीसमर्थ आडकोजी महाराज म्हणजे ‘चैतन्यविद्युतचे केंद्र’ आहे. श्रीगुरुदेव सेवामंडळाचे स्फूर्तिकेंद्रही तेच आहेत. ते एक सिद्ध पुरुष होते. माझा अनुभव कार्याच्या कसोटीवर आधारित आहे. आमची मते भिन्न असू दे! पण श्रद्धा आणि हृदय या स्फूर्तिकेंद्रापासून अलग होता कामा नये. आम्ही कुठेही असू तरी आमचे संबंध श्रद्धेने एकच राहतील. आम्ही बेइमानी करू आणि श्रद्धेचे केवळ प्रदर्शन दाखवू तर त्यामुळे स्वत:ची फसवणूकच होईल. साधूच्या जवळ राहणारे सगळे लोक ज्ञानीच असतात, असे समजणे चूक होईल. एखाद्या गावात महापुरुषाची समाधी आहे म्हणून त्या गावातील लोकच फार पुण्यशील आहेत असे मानणे बरोबर नाही. हजारो मैल अंतरावर असलेला माणूसही आपल्या श्रद्धेच्या, सेवेच्या व कार्यनिष्ठेच्या आचरणाने पुण्यशील व अती जवळचा होऊ शकतो. महाराज गुरूंबद्दल लिहितात :

बहिरंग बोध नाही केला।

स्वयेचि श्रद्धाभावे घेतला।

अहंकार न हो म्हणोनि पूजिला।  सद्गुरुराजा ॥

परि अंतरीं कळलें मर्म।

गुरुशिष्यपण आहे भ्रम।

आहे एकचि वस्तु अगम्य।  दोघांमाजीं ॥

 राजेश बोबडे