केवळ जनतेसमोर भाषण देऊन मैदान गाजविण्याचा आजचा काळ आहे. १९६० साली एका चिकित्सक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांने उक्ती श्रेष्ठ की कृती असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारला त्याला समर्पक उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘निव्वळ बोलण्याचा आवाज लोकांना ऐकू येत नाही; त्याला कर्तव्याची, अंत:करणाच्या विशालतेची व चारित्र्याची जोड लागते. तुमच्या हेच नेमके लक्षात येत नाही. तुम्हाला वाटते, मी तर अगदी व्याकरण- शुद्ध बोलतो, विचारही शास्त्रशुद्ध मांडतो, माझी राहणी व कपडे अगदी उत्तम आहेत, माझ्या वागण्याचा थाटमाटही काही कमी नाही. असे असूनही मी म्हणतो त्याप्रमाणे लोक वागायला का तयार होत नाहीत?’’

महाराज म्हणतात, ‘‘प्रवचन- कीर्तनकार, नेते, पुढारी सतत गळा फाडून फाडून कान फुटेपर्यंत लोकांना सांगत आहेत; पण त्यांची मित्र मंडळी, शेजारी, त्यांच्या स्वत:च्या घरचे लोक तरी त्यांचे म्हणणे ऐकतात का? ‘नाही’, कारण त्यांची दिनचर्याही ते पाहतात, त्यांचा व्यवहार – व्यापार पाहतात, धारणा पाहतात. या सर्व बाबी त्यांना ज्या प्रमाणात दिसत असतील त्याच प्रमाणात त्यांच्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. ज्यांचा सहवास घडतो त्यांचे संस्कार अंगी बाणतात; त्यांचाच परिणाम टिकून राहत असतो. त्यामुळे फक्तच बोलणे काय कामाचे? हा प्रश्नच नाही काय? समाजावर परिणाम करावयाचा असेल तर दृढनिश्चयी लोक, शिक्षक, गुरू, संत – प्रथम लोकांमध्ये शिरले पाहिजेत, परंतु आज याचीच समाजात नेमकी उणीव आहे. आपल्या जातीचा, पंथाचा प्रचार करून राजकारण शिजविणारे हंगामी प्रचारक बरेच आहेत. धर्माच्या नावाखाली अवास्तव फायदा करून घेणारे धर्मगुरूही आज थोडेथोडके नाहीत; पण मानवतेच्या दृष्टीने सर्वानी सर्वावर प्रेम करावे, समभावाच्या व सहकार्याच्या विशाल दृष्टीने बघावे, तसेच धंदे-व्यवहार-व्यापार हे सर्व सहकारी भावनेने चालावेत; अशी इच्छा असणारे आज तरी बोटांवर मोजण्याइतकेही नाहीत. अधिकारी लोकांनाही याची फारशी कल्पना नाही. तेसुद्धा प्रांतवादाचा, जातीयवादाचा, धर्मवादाचा डोंगर लोकांच्या हृदयात उभा करतात. त्यामुळे परस्पर- कटुता व शत्रुत्व निर्माण होते.’’
महाराज म्हणतात, ‘‘या सर्वाना हे कळणे गरजेचे आहे की, ही प्रांतव्यवस्था भारतमातेचे तुकडे करण्यासाठी वा आपसात वैर वाढविण्यासाठी नाही. ही गोष्ट जर आम्ही विसरलो तर आमचे आम्हीच आपापली सत्ता कायम करण्याच्या मार्गात युद्धाला कारणीभूत होऊ- हे निश्चित. यासाठी प्रत्येकाची वागणूक थोरपणाची व जबाबदारीची असणे आवश्यक आहे. परंतु मला सध्या तरी ती तशी दिसत नाही. अल्पावकाशातच याचा जनतेलाही अनुभव आल्यावाचून राहणार नाही.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात,
लोकांसि जे जे शिकवावे।
ते आधी आपणचि आचरावे।
नुसते पुढारी म्हणोनि मिरवावे।
तेणे आदर न वाढे।।

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Various aspects of sounds that affect the mind and body
ध्वनिसौंदर्य : असह्य कलकलाटातून सुस्वरांकडे…

राजेश बोबडे

Story img Loader